एक्स्प्लोर

आयडीबीआय बँकेतील नोकरीची 'ही' संधी सोडू नका, मिळणार चांगला पगार; जाणून घ्या अर्ज कसा करावा? पगार किती?

आयडीबीआय बँकेत नोकरीची नामी संधी चालून आली आहे. या पदासाठी इच्छुक असणारे त्यासाठी अर्ज करू शकतात. अर्ज भरण्याची प्रक्रिया चालू झाली आहे.

IDBI Recruitment 2024: बँकेत नोकरी करणाऱ्याची इच्छा असणाऱ्याला आयडीबीआय बँकेने एक चांगली संधी दिली आहे. आयडीबीआय बँके मेडिकल ऑफिसर या पदासाठी भरती प्रक्रिया राबवत आहे. या पदासाठी इच्छुक असणारे उमेदवार आयडीबीआय बँकेच्या idbibank.in या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन त्यासाठी अर्ज करू शकता. अर्ज भरण्याची प्रक्रिया आता चालू झाली आहे. 

आयडीबीआय बँकेकडून मेडिकल ऑफिसर या पदाच्या एकूण 6 जागांसाठी भरती प्रक्रिया राबवली जात आहे. तुम्हालाही आयडीबीआय या बँकेत नोकरी करण्याची इच्छा असेल तर 3 जुलैपर्यंत तुम्हाला अर्ज करता येईल. बँकेन या जागेसाठी काही अटी ठेवल्या आहेत.

मेडिकल ऑफिसर पदासाठी नेमक्या योग्यता काय? 

आयडीबीय बँकने या पदासाठी काही अटी ठेवल्या आहेत. अर्जदाराकडे अॅलोपॅथिमध्ये मेडिकल काउन्सिल ऑफ इंडियाद्वारे दिली गेलेली कोणत्याही मान्यतप्राप्त विद्यापीठ, कॉलेजची  एमबीबीएस/एमडी ही पदवी असायला हवी. 

वयाची नेमकी अट काय? 

या पदासाठी अर्ज दाखल करणाऱ्या उमेदवारांचे वय 1 जून 2024 पर्यत 65 वर्षांपेक्षा अधिक नसावे.  

आयडीबीआय बँकेत अशी मिळणार नोकरी 

मेडकल ऑफिसर या पदासाठी निवड करताना योग्यत आणि अनुभवाचा विचार केला जाईल. शॉर्टलिस्ट झालेल्या उमेदवारांची मुलाखत होईल. मुलाखतीनंतर पात्र उमेदवाराच्या कागदपत्रांची तपासणी करून करून त्याची निवड केली जाईल.   

भरतीची जाहिरात आणि अधिसूचना येथे पाहा

IDBI Recruitment 2024 साठी अर्ज करायचा असल्यास येथे क्लिक करा 
IDBI Recruitment 2024 चे नोटिफिकेशन पाहण्यासाठी येथे क्लिक करा

अन्य माहिती 

आयडीबीआय बँकेत मेडिकल ऑफिसर या पदावर यशस्वीपणे निवड झालेल्या उमेदवाराला 1000 रुपये प्रतितास या प्रमाणे वेतन मिळेल. उमेदवाराला अन्य भत्तेदेखील मिळतील. यामध्ये प्रतिमहिना 2000 रुपये याप्रमाणे वाहन भत्ता दिला जाईल. तसेच कंपाउंडिंग फीसच्या रुपात (लागू असेल तर) 1000 रुपये प्रति महिना मिळेल. ही एक पार्ट टाईम कंत्राटी नोकरी आहे. या नोकरीसाठी कमीत कमी पाच वर्षांचा अनुभव गरजेचा आहे. 

अर्ज कसा करावा?

आयडीबीआय बँकेत मेडिकल ऑफिसर या पदासाठी अर्ज करणाऱ्या इच्छुक उमेदवाराला डेप्यूटी जनरल मॅनेजर, मनुष्यबळ विभाग, आयडीबीआय बँक, आयडीबीआय टॉवर, डब्ल्यूटीसी कॉम्प्लेक्स, कफ परेड, कुलाबा, मुंबई, महाराष्ट्र-400005 या पत्त्यावर अर्ज पाठवावा लागेल.

हेही वाचा :

टाटा समुहाच्या 'या' कंपनीने जाहीर केला मोठा लाभांश, गुंतवणूकदार होणार मालामाल!

भारतातील तरुणांना जर्मनीत नोकरी करण्याची संधी, थेट ड्रायव्हर म्हणून मिळणार जॉब!

10 वी पास असाल तरी मिळणार सरकारी बँकेत नोकरी; जाणून घ्या अर्ज कसा करावा? परीक्षा कधी होणार?

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

IPO : पैसे तयार ठेवा...अमेरिकन कंपनीची भागिदारी असलेल्या कंपनीचा 1600 कोटींचा आयपीओ येणार, कमाईची मोठी संधी
IPO: पैसे तयार ठेवा, 1600 कोटींचा आयपीओ येणार, गुंतवणूकदारांना मोठी संधी
Sanju Samson : चुकीला माफी नाही....! संजू सॅमसनला एकदिवसीय संघातून दाखवला बाहेरचा रस्ता; नेमकं काय घडलं? 
चुकीला माफी नाही....! संजू सॅमसनला एकदिवसीय संघातून दाखवला बाहेरचा रस्ता; नेमकं काय घडलं? 
Ajit Pawar : दोन दिवसांपासून गायब असलेले अजितदादा अधिवेशनात भाग घेणार, दिल्ली दौरा नव्हे तर 'हे' मोठं कारण समोर
दोन दिवसांपासून गायब असलेले अजितदादा अधिवेशनात भाग घेणार, दिल्ली दौरा नव्हे तर 'हे' मोठं कारण समोर
महायुतीचे खातेवाटप ठरलं! 'अर्थ' अजितदादांना तर शिंदेंच्या शिवसेनेच्या खात्यात बदल, गृहखात्यासह महत्त्वाच्या खात्यांवर भाजपचा वरचष्मा, सूत्रांची माहिती
महायुतीचे खातेवाटप ठरलं! 'अर्थ' अजितदादांना तर शिंदेंच्या शिवसेनेच्या खात्यात बदल, गृहखात्यासह महत्त्वाच्या खात्यांवर भाजपचा वरचष्मा, सूत्रांची माहिती
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines :  9 AM : 18 डिसेंबर 2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सShashikant Shinde meet Ajit Pawar : नागपुरातील निवासस्थानी शशिकांत शिंदे-अजित पवार भेटTOP 80 : सकाळच्या 8 च्या 80 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 80 न्यूज : 18 डिसेंबर 2024 : ABP MajhaTOP 70 : सकाळच्या 7 च्या 70 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 70 न्यूज :18 डिसेंबर 2024 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
IPO : पैसे तयार ठेवा...अमेरिकन कंपनीची भागिदारी असलेल्या कंपनीचा 1600 कोटींचा आयपीओ येणार, कमाईची मोठी संधी
IPO: पैसे तयार ठेवा, 1600 कोटींचा आयपीओ येणार, गुंतवणूकदारांना मोठी संधी
Sanju Samson : चुकीला माफी नाही....! संजू सॅमसनला एकदिवसीय संघातून दाखवला बाहेरचा रस्ता; नेमकं काय घडलं? 
चुकीला माफी नाही....! संजू सॅमसनला एकदिवसीय संघातून दाखवला बाहेरचा रस्ता; नेमकं काय घडलं? 
Ajit Pawar : दोन दिवसांपासून गायब असलेले अजितदादा अधिवेशनात भाग घेणार, दिल्ली दौरा नव्हे तर 'हे' मोठं कारण समोर
दोन दिवसांपासून गायब असलेले अजितदादा अधिवेशनात भाग घेणार, दिल्ली दौरा नव्हे तर 'हे' मोठं कारण समोर
महायुतीचे खातेवाटप ठरलं! 'अर्थ' अजितदादांना तर शिंदेंच्या शिवसेनेच्या खात्यात बदल, गृहखात्यासह महत्त्वाच्या खात्यांवर भाजपचा वरचष्मा, सूत्रांची माहिती
महायुतीचे खातेवाटप ठरलं! 'अर्थ' अजितदादांना तर शिंदेंच्या शिवसेनेच्या खात्यात बदल, गृहखात्यासह महत्त्वाच्या खात्यांवर भाजपचा वरचष्मा, सूत्रांची माहिती
Ind vs Aus 3rd Test : पहिल्या डावात टीम इंडिया 260 धावांवर ऑलआऊट! ऑस्ट्रेलियाकडे 185 धावांची आघाडी, तरीही तिसरी कसोटी होणार रद्द?
पहिल्या डावात टीम इंडिया 260 धावांवर ऑलआऊट! ऑस्ट्रेलियाकडे 185 धावांची आघाडी, तरीही तिसरी कसोटी होणार रद्द?
IPO : MobiKwik, विशाल मेगा मार्ट, साई लाइफ सायन्सेसचे आयपीओ लिस्ट होणार, गुंतवणूकदार मालामाल होणार,GMP कितीवर? 
शेअर बाजारात 3 मेनबोर्ड आयपीओचं लिस्टिंग, गुंतवणूकदार मालामाल होणार, GMP कितीवर?
EPFO :पीएफ खातेदारांसाठी गुड न्यूज, व्याजदराबाबत नवी अपडेट, ईपीएफओ मोठ्या निर्णयाच्या तयारीत 
मोठी बातमी, पीएफ खातेदारांना दिलासा मिळणार, व्याजदराबाबत मोठी अपडेट, ईपीएफओची विशेष रणनीती
SBI बँकेत मोठी भरती, 13735 जागांसाठी निघाली जाहिरात; लगेच करा अर्ज, जाणून घ्या डिटेल्स
SBI बँकेत मोठी भरती, 13735 जागांसाठी निघाली जाहिरात; लगेच करा अर्ज, जाणून घ्या डिटेल्स
Embed widget