एक्स्प्लोर

Anant Ambani : अंबानी कुटुंबाकडून लालबागच्या राजाला 20 किलोचा सोन्याचा मुकूट अर्पण, किंमत किती?

Anant Ambani : मयूरासनावर विराजित आणि सोन्याचं मुकूट परिधान केलेला राजा पाहून भाविकांच्या डोळ्याचं पारणं फिटलं.  

Anant Ambani : मुंबई: ज्यांच्या आगमनाची महाराष्ट्रातील गणेशभक्ताना उत्सुकता असते, त्या मुंबईतील लालबागच्या राजाचे आगमन आज झाले. मुंबईची शान म्हणत लागबागच्या राजाची पहिली झलक आज मुंबईकरांनी पाहिली. मयूरासनावर विराजमान यंदाचा लालबागचा राजा पाहून भाविकांनी एकच जल्लोष केला. गणपती बाप्पा मोरया.. लागबागचा राजा... मोरया.. अशा घोषणांनी लालबाग परिसर दणाणून गेला होता. या गणपती बाप्पांचे लाईव्ह दर्शन सोशल मीडियाच्या माध्यमातूनही भाविकांना घेतले. आपल्या मोबाईलमध्ये बाप्पांचे रुप साठवण्यासाठीही मंडळ ठिकाणी गणेशभक्तांची मोठी गर्दी झाली होती. विशेष म्हणजे यंदाच्या लालबागच्या राजाचा मुकूट सोनेरी असून देशातील गर्भश्रीमंत अंबानी कुटुंबीयांकडून हा मुकूट अर्पण करण्यात आला आहे. अनंत-राधिका यांच्या लग्नानंतरचा हा पहिलाच गणेशोत्सव असल्याने ही गणेशभक्ती अंबानी कुटुंबीयांनी दाखवल्याचं बोललं जात आहे. 

नवसाला पावणारा अशी ख्याती असलेला आणि जगभरात प्रसिद्ध असलेल्या लालबागच्या राजाच्या (Lalbaugcha Raja) चरणी नतमस्तक होण्यासाठी भाविक दरवर्षीच मोठी गर्दी करतात. अनेक सेलिब्रिटी देखील लालबाग राजाच्या चरणी लीन होण्यासाठी हजेरी लावतात. लालबाग राजाच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी देश-विदेशातील व्हीव्हीआयपी देखील उपस्थित राहतात. देशासह जगभरातील श्रीमंतांच्या यादीत मोठ्या दिमाखात स्थान मिळवणारं अंबानी (Ambani) कुटुंब देखील दरवर्षी मुंबईतील (Mumbai) लालबाग राजाच्या दर्शनासाठी आवर्जुन उपस्थिती लावतं. अशातच यंदाच्या वर्षी अंबानी कुटुंबातील एका सदस्याची लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळातील एका मानाच्या पदी नियुक्ती करण्यात आली आहे. लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या कार्यकारी मंडळात रिलायन्स समुहाचे सर्वेसर्वा मुकेश अंबानी यांचे धाकटे चिरंजीव अनंत अंबानी यांची मानद सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. साधारणतः महिन्याभरापूर्वी झालेल्या वार्षिक सर्वसाधारण सभेत मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी एकमतानं हा निर्णय घेतल्याची माहिती मिळत आहे. अंबानी कुटुंबाच्या धार्मिक आणि सांस्कृतिक क्षेत्रातील योगदानाची दखल घेत मंडळानं हा निर्णय घेतल्याची माहिती मिळत आहे. त्यानंतर, आज लालबागच्या राजाची झलक पाहायला मिळाली. त्यामध्ये, मयूरासनावर विराजित आणि सोन्याचं मुकूट परिधान केलेला राजा पाहून भाविकांच्या डोळ्याचं पारणं फिटलं.  

20 किलो सोन्याचा मुकूट

मयूरासनावर विराजमान यंदाचा लालबागचा राजाअसून राजाने परिधान केलेला सोन्याचा मुकूट हा अंबानी कुटुंबीयांकडून अर्पण करण्यात आला आहे. हा सोन्याचा मुकूट वीस किलो सोन्याचा आहे. आज मुंबईच्या लालबागच्या राजाचं प्रथम दर्शन झालं, लालबागच्या राजाची मनमोहक अशी 14 फुटाची  बाप्पाची मूर्ती यंदाच्या वर्षी मयूरासनावर विराजमान आहे. लालबागच्या राजाला यंदा मयूर महल केला असून मंडळाचे हे 91 वे वर्ष आहे. विशेष म्हणजे लालबागच्या राजावर यावर्षी वीस किलो सोन्याचा मुकुट  पाहायला मिळतोय. ज्याची किंमत तब्बल 15 कोटी रुपये आहे, त्यामुळे बाप्पांच्या मूर्तीमध्ये अधिकच सुंदरता  दिसून येते. 

हेही वाचा

गणेशोत्सव येताच सहा IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या; तेजस्वी सातपुतेंना पुण्यात मोठी जबाबदारी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

धक्कादायक! तपोवन एक्सप्रेससमोर ट्रक आडवा; लोको पायलटने शहाणपणा दाखवला, दुर्घटना टळली
धक्कादायक! तपोवन एक्सप्रेससमोर ट्रक आडवा; लोको पायलटने शहाणपणा दाखवला, दुर्घटना टळली
Palghar News: मोठी बातमी ! अखेर शिवसेना पदाधिकाऱ्याची कार तलावातून बाहेर, काळं जॅकेट अन् पांढरा हेडफोन मिळाला
मोठी बातमी ! अखेर शिवसेना पदाधिकाऱ्याची कार तलावातून बाहेर, काळं जॅकेट अन् पांढरा हेडफोन मिळाला
Kash Patel : आई वडिलांची ओळख करून दिली, जय श्री कृष्णा म्हणत अमेरिकन सिनेटमध्ये भाषण, लोकांनी जातीयवादी शिव्या दिल्या; एफबीआय संचालक काश पटेल काय काय म्हणाले?
आई वडिलांची ओळख करून दिली, जय श्री कृष्णा म्हणत अमेरिकन सिनेटमध्ये भाषण, लोकांनी जातीयवादी शिव्या दिल्या; एफबीआय संचालक काश पटेल काय काय म्हणाले?
... तर दिवसा मुदडे पडतील; नामदेव शास्त्रींच्या वक्तव्यावर धनंजय देशमुख संतापले, म्हणाले, आमची मानसिकता काय असेल
... तर दिवसा मुदडे पडतील; नामदेव शास्त्रींच्या वक्तव्यावर धनंजय देशमुख संतापले, म्हणाले, आमची मानसिकता काय असेल
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Sanjay Shirsat on Dhananjay Munde : कुणी भगवानगडावर गेलं म्हणून मुंडेंबाबत शिरसाटांची प्रतिक्रियाNamdev shastri Maharaj : Dhananjay Munde गुन्हेगार नाहीत हे 100 टक्के सांगू शकतो : नामदेवशास्त्रीGunaratna Sadawarte : राजकीय सूड भावनेतून धस आरोप करत असल्यास समज द्यावी : गुणरत्न सदावर्तेBajrang Sonawane On Dhananjay Munde : महाराजांकडून मुंडेंची पाठराखण,बजरंग सोनावणे संतापले, म्हणाले..

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
धक्कादायक! तपोवन एक्सप्रेससमोर ट्रक आडवा; लोको पायलटने शहाणपणा दाखवला, दुर्घटना टळली
धक्कादायक! तपोवन एक्सप्रेससमोर ट्रक आडवा; लोको पायलटने शहाणपणा दाखवला, दुर्घटना टळली
Palghar News: मोठी बातमी ! अखेर शिवसेना पदाधिकाऱ्याची कार तलावातून बाहेर, काळं जॅकेट अन् पांढरा हेडफोन मिळाला
मोठी बातमी ! अखेर शिवसेना पदाधिकाऱ्याची कार तलावातून बाहेर, काळं जॅकेट अन् पांढरा हेडफोन मिळाला
Kash Patel : आई वडिलांची ओळख करून दिली, जय श्री कृष्णा म्हणत अमेरिकन सिनेटमध्ये भाषण, लोकांनी जातीयवादी शिव्या दिल्या; एफबीआय संचालक काश पटेल काय काय म्हणाले?
आई वडिलांची ओळख करून दिली, जय श्री कृष्णा म्हणत अमेरिकन सिनेटमध्ये भाषण, लोकांनी जातीयवादी शिव्या दिल्या; एफबीआय संचालक काश पटेल काय काय म्हणाले?
... तर दिवसा मुदडे पडतील; नामदेव शास्त्रींच्या वक्तव्यावर धनंजय देशमुख संतापले, म्हणाले, आमची मानसिकता काय असेल
... तर दिवसा मुदडे पडतील; नामदेव शास्त्रींच्या वक्तव्यावर धनंजय देशमुख संतापले, म्हणाले, आमची मानसिकता काय असेल
Virat Kohli : 12 वर्षातून एकदा होणारच, म्हणून रणजीच्या नादाला लागला नाही, स्टम्प गेली काश्मीरमधून कन्याकुमारीला ते चिली पनीर; किंग कोहली आऊट होताच मीम्सचा महापूर!
12 वर्षातून एकदा होणारच, म्हणून रणजीच्या नादाला लागला नाही, स्टम्प गेली काश्मीरमधून कन्याकुमारीला ते चिली पनीर; किंग कोहली आऊट होताच मीम्सचा महापूर!
मला राज्यपाल करणं म्हणजे माझ्या तोंडाला कुलूप लावणं, मी मोकळा बरा; छगन भुजबळांची नाराजी पुन्हा उघड
मला राज्यपाल करणं म्हणजे माझ्या तोंडाला कुलूप लावणं, मी मोकळा बरा; छगन भुजबळांची नाराजी पुन्हा उघड
Amravati News :पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळेंचा सुवर्ण मुकुटाने गौरव! प्रविण पोटे पाटील अन् भाजपकडून अमरावतीत जंगी स्वागत
पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळेंचा सुवर्ण मुकुटाने गौरव! प्रविण पोटे पाटील अन् भाजपकडून अमरावतीत जंगी स्वागत
Prakash Mahajan: न्यायाचार्य म्हणवणाऱ्या शास्त्रींनी गरजेच्यावेळी पंकजा मुंडेंना गडाचे दरवाजे बंद केले, आता प्रतिज्ञाही मोडली, प्रकाश महाजनांची टीका
न्यायाचार्य म्हणवणाऱ्या शास्त्रींनी गरजेच्यावेळी पंकजांना गडाचे दरवाजे बंद केले, आता प्रतिज्ञाही मोडली: प्रकाश महाजन
Embed widget