(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Star Health Insurance Ipo : 'या' दिवशी येणार स्टार हेल्थचा आयपीओ; राकेश झुनझुनवाला यांचीही आहे गुंतवणूक
Star Health Insurance Ipo : हा आयपीओ सध्याच्या चालू आर्थिक वर्षातील सर्वात मोठा तिसरा आयपीओ असणार आहे.
Star Health Insurance Ipo : या वर्षात नावाजलेल्या कंपन्या शेअर बाजारात सूचीबद्ध झाल्या आहेत. विमा क्षेत्रातील महत्त्वाची कंपनी असलेल्या 'स्टार हेल्थ अॅण्ड अलाइड इन्शुरन्स कंपनी'ने आपल्या आयपीओद्वारे समभागाची विक्री करण्याचे जाहीर केले होते. आता कंपनीने आयपीओचा कार्यक्रम जाहीर केला आहे. समभाग विक्रीतून कंपनी 7249 कोटी उभारणार असून प्रति शेअरसाठी 870 ते 900 रुपये इतकी किंमत निश्चित केली आहे.
'स्टार हेल्थ अॅण्ड अलाइड इन्शुरन्स कंपनी'चा आयपीओ 30 नोव्हेंबर रोजी 2021 खुला होणार आहे. शेअर खरेदीसाठी गुंतवणुकदार शेअर खरेदीसाठी 2 डिसेंबर 2021 पर्यंत अर्ज करता येणार आहे. हा आयपीओ क्यूआयबीसाठी 75 टक्के, एनआयआयसाठी 15 टक्के आणि किरकोळ गुंतवणूकदारांसाठी 10 टक्के समभाग राखीव ठेवण्यात आले आहेत.
बिग बुल झुनझुनवाला यांची भागिदारी
स्टार हेल्थ अँड अलाइड इन्शुरन्समध्ये बिग बुल राकेश झुनझुनवाला आणि त्यांची पत्नी रेखा झुनझुनवाला यांची 17.26 टक्के भागिदारी आहे. तर, सेफकॉर्प या कंपनीकडे सर्वाधिक 45.32 टक्के भागिदारी आहे. प्रति शेअरचे दर वाढल्यास झुनझुनवाला यांची गुंतवणूक मोठ्या प्रमाणावर वाढणार असल्याची चर्चा आहे. कंपनीच्या प्रमोटरकडे 62.80 टक्के हिस्सा आहे.
स्टार हेल्थ अँड अलाइड इन्शुरन्सचा आयपीओ हा या आर्थिक वर्षातील तिसरा मोठा आयपीओ असणार आहे. याआधी पेटीएमने 18300 कोटी आणि झोमॅटोचा 9375 कोटींचा आयपीओ बाजारात आला होता.
इतर महत्त्वाच्या बातम्या:
LIC IPO ची तयारी जोरात सुरू; 'या' महिन्यापर्यंत शेअर मार्केटमध्ये लिस्टिंग होणार!
म्युच्युअल फंड गुंतवणुकीचा 'हा' नियम ठाऊक आहे का? 15 वर्षात होऊ शकता करोडपती
स्टॉक गुरू गुजराल म्हणतात, पैसा सर्वस्व नाही, राकेश चालू शकत नाही आणि मी...
(Disclaimer: येथे दिलेली माहिती केवळ माहितीच्या उद्देशाने दिली जात आहे. बाजारातील गुंतवणूक ही बाजारातील जोखमीच्या अधीन आहे. गुंतवणूक करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. ABPLive.com च्या माध्यमातून येथे कोणालाही पैसे गुंतवण्याचा सल्ला दिला जात नाही.)