स्टॉक गुरू गुजराल म्हणतात, पैसा सर्वस्व नाही, राकेश चालू शकत नाही आणि मी...
पैसा सर्वस्व नसल्याचे सांगत प्रकृती सांभाळण्याची महत्त्वाची 'टीप' स्टॉक गुरू अश्विनी गुजराल यांनी दिली आहे. सध्या त्यांचे ट्वीट व्हायरल होत आहे.
Share market stock guru शेअर बाजारातून कोट्यवधींची कमाई करण्याच्या उद्देशाने अनेकजण धडपड करत असतात. यामध्ये नवख्या गुंतवणुकदारांचा, ट्रेडर्सचा समावेश आहे. त्यांच्यासमोर शेअर बाजारील दिग्गज ट्रेडर्सचा आदर्श असतो. शेअर बाजारातील नावाजलेले गुंतवणूकदार आणि पोर्टफोलिओ व्यवस्थापक अश्वनी गुजराल यांचे एक ट्वीट सध्या व्हायरल होत आहे. 'स्टॉक गुरू' असलेल्या गुजराल यांनी पैसा सर्वस्व नसून प्रकृती हेळसांड करू नका असे त्यांनी म्हटले आहे.
अश्वनी गुजराल यांनी शेअर बाजारातून कोट्यवधींची कमाई केली आहे. काही वृत्तवाहिन्यांवर त्यांनी गुंतवणुकदारांना सल्लेदेखील दिले आहेत. त्यांच्या विश्लेषणाला मानणारा गुतंवणुकदारांचा एक वर्ग आहे.
गुजराल यांनी केलेले ट्वीट सध्या चर्चेचा विषय ठरला आहे. हे ट्वीट व्हायरल झाले आहे. गुजराल यांनी ट्वीटमध्ये आपल्या प्रकृतीबाबत चिंता व्यक्त केली आहे. त्यांनी म्हटले की, मागील सहा महिन्यांपासून खांद्याच्या दुखण्याने (फ्रोझन शोल्डर) बेजार आहे. राकेश चालू शकत नाही. प्रकृतीची हेळसांड करून पैसे कमवत असाल तर कोणताच फायदा नाही. आपल्या सर्वांच्या पलीकडे बाजाराचे स्वत:चे एक वेगळे जग आहे, असे त्यांनी म्हटले.
I have a frozen shoulder for last 6 months. Rakesh cannot walk properly. Health Gava kar paisa kamaya to koi fayeda nahi. Always remember this. Markets have a life beyond all of us
— Ashwani Gujral (@AshwaniGujral6) November 20, 2021
अश्वनी गुजराल यांच्या या ट्वीटवर युजर्सकडून त्यांना प्रतिसाद मिळाला आहे. काहींनी त्यांना प्रकृतीची काळजी घेण्याची विनंती केली आहे. काही युजर्सने या ट्वीटद्वारे सत्य परिस्थिती सांगितल्याबद्दल त्यांचे आभार मानले आहेत.
शेअर बाजारचे बिग बुल अशी ओळख असणारे राकेश झुनझुनवाला हे मधुमेह व इतर व्याधींनी आजारी असल्याचे वृत्त होते. काही दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेत असताना ते व्हिलचेअरवर बसून होते असे म्हटले जात होते.
इतर महत्त्वाच्या बातम्या:
म्युच्युअल फंड गुंतवणुकीचा 'हा' नियम ठाऊक आहे का? 15 वर्षात होऊ शकता करोडपती
'या' दोन सरकारी कंपन्याची मालमत्ता विक्रीला; मोदी सरकार उभारणार 1100 कोटी!
PayTM listing : शेअर बाजारात पेटीएमच्या 'Listing Loss'नंतर पुढे काय?