SBI ग्राहकांसाठी मोठी बातमी, आता पैसे काढण्यासाठी बँकेत जाण्याची गरज नाही, कारण....
स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये (state bank of India) खाते असेल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. कारण आता छोट्या कामांसाठी तुम्हाला बँकेत जावे लागणार नाही.
SBI : तुमचे जर स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये (state bank of India) खाते असेल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. कारण आता छोट्या कामांसाठी तुम्हाला बँकेत जावे लागणार नाही. SBI ग्राहक सेवा केंद्राचे एजंट वैयक्तिकरित्या तुमच्या घरी येतील आणि तुमच्या समस्या सोडवतील. कारण स्टेट बँकेने आपल्या ग्राहकांसाठी कियोस्क बँकिंग सुरू करण्याची योजना आखली आहे. म्हणजेच आता तुम्हाला पैसे काढण्यासाठी आणि जमा करण्यासाठी बँकेत जावे लागणार नाही, तर ग्राहक सेवा केंद्राचे एजंट बँकिंग सेवा देण्यासाठी तुमच्या घरी पोहोचतील.
वृद्ध आणि दिव्यांगांना मोठा फायदा होणार
कियोस्क बँकिंग सुविधा सुरू केल्याने वृद्ध आणि दिव्यांगांना मोठा फायदा होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. कारण दिव्यांगांना आता बँकेत जाण्यासाठी त्रास होणार नाही. एसबीआयचे अध्यक्ष दिनेश खारा यांनी दिलेल्या माहितीनुसार, या उपक्रमाचा उद्देश आर्थिक समावेश अधिक मजबूत आणि सुलभ करणे हा आहे. जेणेकरून बँकिंग सेवा सामान्य लोकांच्या घरापर्यंत पोहोचवता येतील. दिनेश खारा यांच्या मते, स्टेट बँकेच्या या नवीन उपक्रमामुळे आता ग्राहक सेवा केंद्राच्या एजंटना त्यांच्या ग्राहकांना घरपोच बँकिंग सेवा उपलब्ध करून देण्यात मदत होणार आहे. तसेच दिव्यांग, वृद्ध आणि आजारी व्यक्तींना बँकेत यावे लागणार नाही.
स्टेट बँकेने सुरुवातीला पाच बँकिंग सेवा सुरू केल्या
एसबीआयचे अध्यक्ष दिनेश खारा यांनी सांगितले की, या नवीन उपक्रमांतर्गत सुरुवातीला स्टेट बँकेने पाच बँकिंग सेवा सुरू केल्या आहेत. म्हणजेच ग्राहकांना आता घरबसल्या पैसे काढणे, पैसे जमा करणे, मनी ट्रान्सफर, बॅलन्स चेकिंग आणि मिनी स्टेटमेंट या सुविधांचा लाभ घेता येणार आहे. विशेष बाब म्हणजे बँकेच्या ग्राहक सेवा केंद्रांवर होणाऱ्या एकूण व्यवहारांपैकी या सेवांचा वाटा 75 टक्क्यांहून अधिक आहे. चेअरमन दिनेश खारा यांच्या म्हणण्यानुसार, बँक आपल्या सेवांचा अधिक विस्तार करेल. ग्राहकांना सामाजिक सुरक्षा योजनांतर्गत नावनोंदणी, खाते उघडणे आणि कार्ड आधारित सेवा देखील मिळतील.
भारतीय स्टेट बँक ही भारतातील सर्वात मोठी बँक आहे. सन 1921 मध्ये स्थापन झालेल्या इंपीरियल बँक ऑफ इंडियाचे नाव बदलून `स्टेट बँक ऑफ इंडिया' झाले. भाग भांडवल आणि गंगाजळी याचा विचार करता जगातील सर्वात मोठ्या 100 बँकांमध्ये या बँकेचा नंबर लागतो.
महत्त्वाच्या बातम्या: