(Source: ECI/ABP News/ABP Majha)
जुलै महिन्यात 'या' चार तारखा महत्त्वाच्या, आर्थिक व्यवहाराशी संबंधित अनेक नियम बदलणार!
जुलै महिन्यापासून आर्थिक व्यवहाराशी संबंधित अनेक नियम बदलणार आहेत. हे नियम नेमके काय आहेत? हे जाणून घेणे गरजेचे आहे.
मुंबई : आजपासून जुलै महिना चालू झाला आहे. या महिन्यात आर्थिक व्यवहाराशी संबंधित अनेक नियम बदलले आहेत. हे नियम माहिती नसतील तर तुमच्या खिशावर परिणाम होण्याची शक्यत आहे. याच महिन्यात 31 जुलैपर्यंत तुम्हाला आयटीआर भरता येणार आहे. 31जुलैपर्यंत तुम्ही आयटीआर न भरल्यास तुम्हाला दंडाची रक्कम भरून आयटीआर भरावा लागेल. 31 तारीख जशी-जशी जवळ येईल, तसे तसे आयटीआर भरणाऱ्यांची संख्या वाढत जाईल. विशेष म्हणजे फक्त आयटीआरच नाही तर पैशाच्या व्यवहारासंबंधी इतरही नियम बदलणार आहेत. यात प्रामुख्याने चार तारखा तुम्ही लक्षात ठेवणे गरजेचे आहे. या तारखा लक्षात न ठेवल्यास तुम्हाला आर्थिक भुर्दंड सोसावा लागू शकतो.
या चार तारखांची नोंद करून ठेवा
1 जुलैपासून एसीबीआय क्रेडिट कार्टचे नियम तसेच ICICI बँकेचे क्रेडिट कार्डचे नवे शुल्क लागू होणार आहे.
15 जुलैपर्यंत सिटीबँक क्रेडिट कार्डच्या अॅक्सिस बँकमधील मायग्रेशनची प्रक्रिया पूर्ण होणार आहे.
20 जुलैपासून पेटीएम पेमेंट्स बँक डिअॅक्टिव्हेट झालेले वॉलेट्स बंद करणार आहे.
31 जुलैपर्यंत तुम्हाला 2023-24 तुम्हाला आयटीआर भरता येणार आहे. त्यानंतर दंड भरावा लागेल.
पेटीएम वॉलेट होणार बंद
पेटीएमने एक मोठा निर्णय घेतला आहे. जे वॉलेट एका वर्षापेक्षा अधिक काळापासून सक्रिय नाीहीत, तसेच अशा वॉलेट्समध्ये शून्य बॅलेन्स आहे, त्या सर्व वॉलेट्सना 20 जुलैपासून बंद करण्यात येणार आहे. असे वॉलेट्स असणाऱ्यांना याबाबतची सूचना दिली जाईल. तसेच वॉलेट बंद करण्याआधी 30 दिवसांची नोटीस दिली जाईल.
एसबीआयच्या क्रेडिट कार्डसाठी नवा नियम
एसबीआयने क्रेडिट कार्डसंदर्भात नवा नियम लागू केला आहे. एसबीआयने काही क्रेडिट कार्ड्सव रिवॉर्ड पॉइंट्स न देण्याचा निर्णय घेतलाय. हा नवा नियम 1 जुलैपासून लागू होईल. एअर इंडिया एसबीआय प्लॅटिनम कार्ड, एअर इंडिया एसबीआय सिग्नेचर कार्ड, सेंट्रल एसबीआय सिलेक्ट+ कार्ड, चेन्नई मेट्रो एसबीआय कार्ड, क्लब विस्तारा एसबीआय कार्ड, क्लब विस्तारा एसबीआय कार्ड प्राइम, दिल्ली मेट्रो एसबीआय कार्ड, इतिहाद गेस्ट एसबीआय कार्ड, इतिहाद गेस्ट एसबीआय प्रीमियर कार्ड , Fabindia SBI कार्ड, Fabindia SBI कार्ड सिलेक्ट, IRCTC SBI कार्ड, IRCTC SBI कार्ड प्रीमियर, मुंबई मेट्रो SBI कार्ड, नेचर बास्केट SBI कार्ड, Nature Basket SBI Card Elite, Ola Money SBI Card, Paytm SBI कार्ड, Paytm SBI कार्ड सिलेक्ट, रिलायन्स एसबीआय कार्ड, रिलायन्स एसबीआय कार्ड प्राइम, यात्रा एसबीआय कार्ड या कार्ड्सना हा नियम लागू असेल.
आयसीआयसीआय बँकेच्या क्रेडिट कार्डसाठीही नवा नियम
1 जुलैपपासून आयसीआयसीआय बँकेच्या वेगवेगळ्या क्रेडिट कार्डच्या सेवा शुल्कात करण्यात आलेले बदल लागू होतील. एमराल्ड प्रायव्हेट मेटल क्रेडिट कार्ड वगळता अन्य सर्व क्रेडिट कार्डचे ट्रान्सफर शुल्क 200 रुपये करण्यात आले आहे.
(या लेखात देण्यात आलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. अधिक माहितीसाठी त्या-त्या संस्थांशी संपर्क साधावा व अधिक माहिती मिळवावी)
हेही वाचा :
Virat Kohli Net Wealth : टीम इंडियाला विजय मिळवून देणारा विराट कोहली किती कोटींचा मालक?