एक्स्प्लोर

बँकांचे व्यवहार करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, जुलैमध्ये किती दिवस बँका राहणार बंद? सविस्तर माहिती एका क्लिकवर

उद्यापासून जुलै (July) महिना सुरु होणार आहे. या जुलैमध्ये बँकांना (Banks) भरपूर सुट्ट्या राहणार आहेत. जुलैमध्ये बँकांना 12 दिवस सुट्टी राहणार आहे.

Bank Holiday in July: बँकांचे व्यवहार (Transactions of banks) करणाऱ्यांसाठी एक महत्वाची बातमी आहे. उद्यापासून जुलै (July) महिना सुरु होणार आहे. या जुलैमध्ये बँकांना (Banks) भरपूर सुट्ट्या राहणार आहेत. जुलैमध्ये बँकांना 12 दिवस सुट्टी राहणार आहे. त्यामुळं बँकांचे व्यवहार करणाऱ्यांनी यादी पाहूणच बँकेतील कामाचं नियोजन करावं.  
 
बँका ही एक महत्त्वाची वित्तीय संस्था आहे. बँकेत अनेकांची महत्त्वाची कामे असतात. सुट्टी असल्यामुळं अनेकांची कामं रखडतात. धनादेश जमा करण्यापासून ते एका खात्यातून दुसऱ्या खात्यात पैसे ट्रान्सफर करण्यापर्यंत रोखीच्या व्यवहारांसाठी बँकेत जावे लागते. पण बँक बंद राहिल्यास ग्राहकांचा वेळ वाया जातो. अशा समस्या टाळण्यासाठी, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया प्रत्येक महिन्याच्या सुरुवातीपूर्वी बँक सुट्ट्यांची यादी प्रसिद्ध करते. जुलैमध्ये येणाऱ्या सुट्ट्यांची माहितीही आरबीआयने दिली आहे. ही यादी पाहून तुम्ही तुमच्या कामाचे नियोजन करू शकता.

जुलैमध्ये 12 दिवस बँका बंद 

जुलैच्या 31 दिवसांपैकी एकूण 12 दिवस बँकांना सुट्टी असेल. यात दुसऱ्या आणि चौथ्या शनिवार आणि दर रविवारी सुट्टीचाही समावेश आहे. याशिवाय राज्यांमध्ये स्थानिक सण आणि मोहरममुळे बँकाही बंद राहणार आहेत. 

जुलैमध्ये कोणत्या दिवशी बँका राहतील बंद 

बेह दीनखलम सणानिमित्त शिलाँगमध्ये 3 जुलै 2024 रोजी बँकेला सुट्टी असेल.
एमएचआयपी दिनानिमित्त 6 जुलै 2024 रोजी आयझॉलमधील बँकांना सुट्टी असणार.
रविवार, 7 जुलै 2024
8 जुलै 2024 रोजी कांग रथयात्रेनिमित्त इंफाळमधील बँका बंद राहतील
9 जुलै 2024 रोजी द्रुकपा त्से-जीच्या निमित्ताने गंगटोकमध्ये बँकेला सुट्टी असेल
13 जुलै 2024 रोजी दुसरा शनिवार
14 जुलै 2024 रविवार सुट्टी
डेहराडूनमधील बँका 16 जुलै 2024 रोजी हरेलाच्या निमित्ताने बंद राहणार आहेत.
17 जुलै रोजी मोहरमच्या निमित्ताने अहमदाबाद, पणजी, भुवनेश्वर, चंदीगड, गंगटोक, गुवाहाटी, इंफाळ, इटानगर, कोची, कोहिमा आणि त्रिवेंद्रम वगळता संपूर्ण देशातील बँकांना सुट्टी असेल.
21 जुलै 2024 रोजी रविवारची सुट्टी
27 जुलै 2024 रोजी चौथ्या शनिवारची सुट्टी
28 जुलै 2024 रोजी रविवारची सुट्टी

सुट्टीच्या दिवशीही मोबाईल बँकिंग आणि नेट बँकिंगद्वारे व्यवहार करु शकता

दरम्यान, बदलत्या काळानुसार बँकिंग व्यवस्थेतही मोठे बदल झाले आहेत. आता ग्राहक सुट्टीच्या दिवशीही मोबाईल बँकिंग आणि नेट बँकिंगद्वारे एका खात्यातून दुसऱ्या खात्यात पैसे ट्रान्सफर करू शकतात. यासाठी तुम्ही UPI देखील वापरु शकता. पैसे काढण्यासाठी तुम्ही एटीएम वापरू शकता.

महत्वाच्या बातम्या:

सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! बँकेत 9995 पदांसाठी भरती, अर्ज करण्यासाठी उरले शेवटचे काही तास

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

वीज कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! तीनही कंपन्यांच्या वेतनात मोठी वाढ
वीज कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! तीनही कंपन्यांच्या वेतनात मोठी वाढ
जी चूक झाली ती झाली, भुजबळांवर निशाणा, सरकारला इशारा, मराठ्यांना आवाहन; जरांगेंचं परभणीतलं भाषण
जी चूक झाली ती झाली, भुजबळांवर निशाणा, सरकारला इशारा, मराठ्यांना आवाहन; जरांगेंचं परभणीतलं भाषण
Eknath Shinde on Uddhav Thackeray : गेटमधून कोणाला आत न घेणारे शेतावर पोहोचले याचा आम्हाला आनंद; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोला
गेटमधून कोणाला आत न घेणारे शेतावर पोहोचले याचा आम्हाला आनंद; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोला
उद्धव ठाकरेंचा मनोज जरांगेंना फोन, पण...; मराठा-ओबीसी बद्दल काय म्हणाले पाटील
उद्धव ठाकरेंचा मनोज जरांगेंना फोन, पण...; मराठा-ओबीसी बद्दल काय म्हणाले पाटील
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 05PM TOP Headlines 05PM 07 July 2024Raju Waghmare : Worli Hit and Run प्रकरण दुर्दैवी, CM Eknath Shinde कुणाला पाठीशी घालणार नाहीतNana Patole on Shikhar Bank Scam : भाजपने घोटाळेबाजांना सोबत घेतल्यामुळे जनतेच्या मनात उद्रेकMajhi Ladki Bahin Yojana Form | माझी लाडकी बहीण योजनेचा फॉर्म कसा भरायचा? A To Z प्रोसेस

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
वीज कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! तीनही कंपन्यांच्या वेतनात मोठी वाढ
वीज कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! तीनही कंपन्यांच्या वेतनात मोठी वाढ
जी चूक झाली ती झाली, भुजबळांवर निशाणा, सरकारला इशारा, मराठ्यांना आवाहन; जरांगेंचं परभणीतलं भाषण
जी चूक झाली ती झाली, भुजबळांवर निशाणा, सरकारला इशारा, मराठ्यांना आवाहन; जरांगेंचं परभणीतलं भाषण
Eknath Shinde on Uddhav Thackeray : गेटमधून कोणाला आत न घेणारे शेतावर पोहोचले याचा आम्हाला आनंद; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोला
गेटमधून कोणाला आत न घेणारे शेतावर पोहोचले याचा आम्हाला आनंद; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोला
उद्धव ठाकरेंचा मनोज जरांगेंना फोन, पण...; मराठा-ओबीसी बद्दल काय म्हणाले पाटील
उद्धव ठाकरेंचा मनोज जरांगेंना फोन, पण...; मराठा-ओबीसी बद्दल काय म्हणाले पाटील
योगी-मोदी आले, पण कुणीही टिकलं नाही, आता विधानसभेच्या कामाला लागा; प्रणिती शिंदेंच्या कार्यकर्त्यांना सूचना
योगी-मोदी आले, पण कुणीही टिकलं नाही, आता विधानसभेच्या कामाला लागा; प्रणिती शिंदेंच्या कार्यकर्त्यांना सूचना
Abhay Verma : 'मुंज्या' अभिनेत्याने आलिया भट आणि सुहाना खानसोबत काम करणं नाकारलं; मुलाखतीत केला खुलासा
मुंज्या फेम अभिनेत्याने आलिया भट आणि सुहाना खानसोबत काम करणं नाकारलं; मुलाखतीत केला खुलासा
शेतकरी पुत्रांचे आमरण उपोषण सातव्या दिवशी स्थगित; निलेश लंकेंच्या आंदोलनावर विखे पाटील काय म्हणाले?
शेतकरी पुत्रांचे आमरण उपोषण सातव्या दिवशी स्थगित; निलेश लंकेंच्या आंदोलनावर विखे पाटील काय म्हणाले?
Video : ठाणे जिल्ह्यात मुसळधारा, मुरबाड-वाशिंद रस्त्यावरील पूल पाण्याखाली; 18 गावांचा संपर्क तुटला
Video : ठाणे जिल्ह्यात मुसळधारा, मुरबाड-वाशिंद रस्त्यावरील पूल पाण्याखाली; 18 गावांचा संपर्क तुटला
Embed widget