एक्स्प्लोर
LIC IPO Allotment : आज होणार एलआयसीच्या शेअरचे वाटप, तुम्हाला शेअर्स मिळाले की नाही? असे पाहा
LIC IPO Allotment : बहुप्रतिक्षीत एलआयसीच्या शेअर्सचे आज वाटप होणार आहे. तुम्हाला शेअर्स मिळाले का हे पाहण्यासाठी जाणून घ्या सोप्या पद्धती....
LIC IPO Allotment : अनेकांनी गुंतवणुकीत चांगल्या परताव्या अपेक्षेसह एलआयसीच्या आयपीओसाठी बोली लावली आहे. आयपीओसाठी बोली लावल्यानंतर आज एलआयसी आयपीओद्वारे शेअर्सचे आज वाटप होणार आहे. एलआयसी आयपीओला एलआयसी कर्मचारी, पॉलिसीधारक आणि किरकोळ गुंतवणुकदारांनी मोठा प्रतिसाद दिला. तर, परदेशी गुंतवणुकदारांनी एलआयसीच्या आयपीओला अपेक्षे इतका प्रतिसाद दिला नाही.
आयपीओसाठी बोली लावलेल्या गुंतवणुकदारांना आज 12 मे रोजी शेअर्सचे वाटप होणार आहे. ज्यांनी आयपीओसाठी बोली लावली. मात्र, शेअर्स मिळाले नाहीत अशा गुंतवणुकदारांचे पैसे काही दिवसात त्यांच्या बँक खात्यात परत जमा होतील. एलआयसी शेअरचे वाटप 12 मे रोजी झाल्यानंतर 17 मे रोजी बाजारात लिस्टिंग होणार आहे. आयपीओद्वारे शेअर्स हे सोडतीच्या माध्यमातून गुंतवणुकदारांना मिळतात.
>> शेअर्स मिळाले की नाही? असे पाहा
मुंबई शेअर बाजाराच्या अधिकृत संकेतस्थळावर माहिती उपलब्ध होऊ शकेल.
- तुम्ही पहिल्यांदा www.bseindia.com या संकेतस्थळावर लॉगिन करा
- तुम्ही ‘equity’ या पर्यायावर क्लिक करा
- हा पर्याय निवडल्यानंतर ड्रॉपडाउनमध्ये ‘LIC IPO’ पर्याय निवडा
- आता नवीन पेज ओपन झाल्यानंतर तुम्हाला तुमचा अर्ज क्रमांक नमूद करावा लागेल
- त्याशिवाय तुमचा पॅन क्रमांक भरावा लागेल
- त्यानंतर 'I am not a robot' हा पर्याय निवडून व्हेरिफाय करा आणि सर्च बटणावर क्लिक करा
- त्यानंतर तुम्हाला LIC IPO चे शेअर अलॉटमेंट दिसतील
> त्याशिवाय, आयपीओसाठी रजिस्ट्रार असलेल्या केफिन टेक्नोलॉजीच्या संकेतस्थळावर तुम्हाला एलआयसी आयपीओ मिळाला की नाही याची माहिती मिळू शकते.
- तुम्हाला पहिल्यांदा रजिस्ट्रार लिंक ओपन करावी लागेल. kprism.kfintech.com/ipostatus/ या लिंकवर क्लिक करा
- त्यानंतर या ठिकाणी LIC IPO वर क्लिक करा
- आता तु्म्हाला तुमचा आयपीओ अर्ज क्रमांक अथवा DPID/Client ID अथवा पॅन कार्ड क्रमांकापैकी एक पर्याय निवडून त्याची माहिती भरावी लागेल.
- त्यानंतर तुम्हाला एलआयसी आयपीओचा अर्ज क्रमांक नमूद करावा लागेल
- त्यानंतर कॅप्चा पर्यायात सांकेतिक क्रमांक नमूद करा
- त्यानंतर सबमिट बटणावर क्लिक करा
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
जालना
भविष्य
भारत
कोल्हापूर
Advertisement