एक्स्प्लोर

आंबा उत्पादनात अग्रेसर असणारी 5 राज्य कोणती? महाराष्ट्र कितव्या स्थानी?

देशात सर्वात राज्यात आंब्याच उत्पादन कोणत्या राज्यात होतं? याबाबत तुम्हाला माहिती आहे का? जाणून घेऊयात आंबा उत्पादनात अग्रेसर असणाऱ्या राज्य कोणती? 

Mango Production : आंबा (Mango) म्हटलं की अनेकांच्या तोंडाला पाणी सुटते. कारण आंबा हे सर्रास सगळ्यांच्याच आवडीचं फळ आहे. आंब्याला फळांचा राजा असंही म्हणतात. सध्या आंब्याचा हंगाम सुरु झाला आहे. विविध ठिकाणच्या बाजारात आंबा दाखल होत आहे. मात्र, सुरुवातीचा काळ असल्यानं आंब्याची आवक कमी आहे, त्यामुळं बाजारात आंब्याच्या दरात सध्या तेजी पाहायला मिळतेय. दरम्यान, देशात सर्वात राज्यात आंब्याच उत्पादन कोणत्या राज्यात होतं? याबाबत तुम्हाला माहिती आहे का? जाणून घेऊयात आंबा उत्पादनात अग्रेसर असणाऱ्या राज्य कोणती? 

लोक आंब्याचा वेगवेगळा उपयोग करतात. फळ म्हणून आंबा खातात. त्याचबरोर रसापासून ज्यूस करतात. तसेच आंब्याची चटणी, लोणचेही तयार केले जाते. तसेच आंबा आरोग्यासाठी देखील चांगला आहे. दरवर्षी देशात मोठ्या प्रमाणात आंब्याचं उत्पादन होतं. भारतातून अनेक देशात आंब्याची निर्यातही केली जाते. 

आंबा उत्पादनात अग्रेसर असणारी पाच राज्य कोणती? 

उत्तर प्रदेश आंबा उत्पादनात प्रथम क्रमांकावर

भारत देशात सर्वात जास्त आंब्याचे उत्पादन हे उत्तर प्रदेशात होते. उत्तर प्रदेशमधील वातावरण आंबा उत्पादनासाठी पोषक आहे. तेथील माती आणि पाणी आंब्याच्या बागांसाठी चांगले आहे. त्यामुळं देशात सर्वात जास्त आंब्यात उत्पादन तिथं होतं. देशाच्या एकूण आंबा उत्पादनात 20.85 टक्के उत्पादन हे एकट्या उत्तर प्रदेशमध्ये होतं. दरवर्षी मोठ्या प्रमाणात आंब्याची निर्यातही उत्तर प्रदेशमधून केली जाते. 

आंध्र प्रदेश दुसऱ्या क्रमांकावर 

आंबा उत्पादनात उत्तर प्रदेशनंतर आंध्र प्रदेशचा दुसरा क्रमांक लागतो. आंध्र प्रदेशात देखील मोठ्या प्रमाणात आंब्याचं उत्पादन घेतलं जातं. आंध्र प्रदेशचा आंबा सुगंध आणि गोड चवीसाठी ओळखला जातो. देशाच्या एकूण आंबा उत्पादनापैकी 20.04 टक्के उत्पादन हे एकट्या आंध्र प्रदेशात होतं. 

बिहार तिसऱ्या क्रमांकावर

आंबा उत्पादनात उत्तर प्रदेश आणि आंध्र प्रदेशनंतर बिहारचा तिसरा क्रमांक लागतो. देशातील एकूण आंबा उत्पादनापैकी  11.19 टक्के उत्पादन हे एकट्या बिहारमध्ये होतं.

कर्नाटक चौथ्या क्रमांकावर 

बिहारनंतर आंबा उत्पादनात कर्नाटक राज्याचा चौथा क्रमांक लागतो. देशातील एकूण उत्पादनापैकी कर्नाटक राज्यात 8.06 टक्के उत्पादन होते.

तामिळनाडू आंबा उत्पादनात पाचव्या स्थानी

कर्नाटकनंतर आंबा उत्पादनात तामिळनाडू राज्याचा क्रमांक लागतो. तामिळनाडू आंबा उत्पादनात पाचव्या स्थानी आहे. येथील शेतकरी दरवर्षी 5.65 टक्के आंब्याचे उत्पादन घेतात.   

पाच राज्यात मिळून  65 टक्के आंबा उत्पादन

दरम्यान, उत्तर प्रदेश, आंध्र प्रदेश, बिहार, कर्नाटक आणि तामिळनाडू या पाच राज्यात देशाच्या एकूण आंबा उत्पादनापैकी 65 टक्के उत्पादन होते. म्हणजे फक्त 35 टक्के आंब्याचे उत्पादन हे इतर राज्यात घेतलं जातं. महाराष्ट्रात देखील आंब्याचं मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतलं जातं. कोकण विभागा आंबा उत्पादनात आघाडीवर आहे. दरम्यान, पहिला पाच राज्यात महाराष्ट्राचा नंबर लागत नाही. आंबा हा आरोग्याच्या दृष्टीनं देखील खूप फायदेशीर आहे. आंब्यात मुबलक प्रमाणात जीवनसत्ते असतात. 

महत्वाच्या बातम्या:

युवराज सिंहची अनोखी शेती, 26 जातींच्या आंब्याची लागवड, ऑनलाइन विक्रीतून कमावले लाखो रुपये  

 

महत्त्वाच्या बातम्या

Gold- Silver Price Today: आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सोने झाले स्वस्त, चांदीचाही भाव घसरला; जाणून घ्या तुमच्या शहरातील आजचे दर
आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सोने झाले स्वस्त, चांदीचाही भाव घसरला; जाणून घ्या तुमच्या शहरातील आजचे दर
Ladki Bahin Yojana: मोठी बातमी: लाडकी बहीण योजनेतून तब्बल 92 लाख महिलांची नावे वगळली, बीड जिल्ह्याला सर्वाधिक फटका, नेमकं कारण काय? जाणून घ्या A टू Z माहिती
लाडकी बहीण योजनेतून तब्बल 92 लाख महिलांची नावे वगळली, बीड जिल्ह्याला सर्वाधिक फटका, नेमकं कारण काय? जाणून घ्या A टू Z माहिती
Nitin Gadkari on Ethanol: इथेनॉलमुळे पेट्रोल-डिझेल आयात करणारी लॉबी माझ्यावर नाराज, माझ्याविरोधात पेड कँपेन चालवलं जातंय: नितीन गडकरी
इथेनॉलमुळे पेट्रोल-डिझेल आयात करणारी लॉबी माझ्यावर नाराज, माझ्याविरोधात पेड कँपेन चालवलं जातंय: नितीन गडकरी
Russian Crude Oil :  मध्य पूर्वेत तणाव वाढला, भारतानं घेतला मोठा निर्णय, रशियाकडून तब्बल 49 हजार कोटी रुपयांच्या तेलाची आयात 
Russian Crude Oil :  मध्य पूर्वेत तणाव वाढला, भारतानं घेतला मोठा निर्णय, रशियाकडून तब्बल 49 हजार कोटी रुपयांच्या तेलाची आयात 

व्हिडीओ

Ladki Bahin Yojana : 'लाडकी बहीण' योजनेतून 92 लाख लाभार्थी वगळले
Jejuri Warkari Accident : जेजुरीजवळ वारकऱ्यांच्या टेम्पोचा अपघात, तीन महिला वारकऱ्यांचा मृत्यू
Majha Sanman Award 2026: अरुण फिरोदिया यांचा उद्योगक्षेत्रातील अतुलनीय कामगिरीबद्दल ‘माझा सन्मान’ पुरस्काराने गौरव
Majha Sanman Award 2026: भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार सुनील गावस्कर यांचा एबीपी माझा कडून सन्मान
Majha Sanman Award 2026 : नितीन गडकरी, आशा पारेख अन् जॅकी श्रॉफ; माझा सन्मानमध्ये उलगडले रंजक किस्से

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ahilyanagar Shrirampur Band : श्रीरामपुरात गुन्हेगारीविरोधात जनक्षोभ! हॉटेल व्यावसायिकाच्या हत्येनंतर सलग दुसऱ्या दिवशी शहर कडकडीत बंद; मृतदेह पोलीस ठाण्यासमोर ठेवून आंदोलन, नेमकं काय घडलं?
श्रीरामपुरात गुन्हेगारीविरोधात जनक्षोभ! हॉटेल व्यावसायिकाच्या हत्येनंतर सलग दुसऱ्या दिवशी शहर कडकडीत बंद; मृतदेह पोलीस ठाण्यासमोर ठेवून आंदोलन, नेमकं काय घडलं?
Sanjay Raut: सोनम वांगचूक शरीराने कोसळले, सरकारला बळी हवाय, त्यांना लढणारे लोक नको आहेत, तुरुंगात टाकता येत नसल्याने असं मारू इच्छित; संजय राऊतांचा सडकून प्रहार
सोनम वांगचूक शरीराने कोसळले, सरकारला बळी हवाय, त्यांना लढणारे लोक नको आहेत, तुरुंगात टाकता येत नसल्याने असं मारू इच्छित; संजय राऊतांचा सडकून प्रहार
Eknath Khadse and Sudhir Mungantiwar: Eknath Khadse and Sudhir Mungantiwar: नाथाभाऊंच्या घरवापसीची चर्चा, मुनगंटीवार म्हणाले, 'जेव्हा भाजपकडे काहीच नव्हतं तेव्हा खडसेंनी पक्षासाठी जीव लावून काम केलंय'
नाथाभाऊंच्या घरवापसीची चर्चा, मुनगंटीवार म्हणाले, 'जेव्हा भाजपकडे काहीच नव्हतं तेव्हा खडसेंनी पक्षासाठी जीव लावून काम केलंय'
Sanjay Ghadi : दहिसरहून येताना ट्राफिकचा मानसिक-शारीरिक त्रास, मुंबई शहरात घर द्या, उपमहापौर संजय घाडींचे अश्विनी भिडेंना पत्र, नेमकं काय म्हटलंय?
दहिसरहून येताना ट्राफिकचा मानसिक-शारीरिक त्रास, मुंबई शहरात घर द्या, उपमहापौर संजय घाडींचे अश्विनी भिडेंना पत्र, नेमकं काय म्हटलंय?
Sachin Ahir on Omraje Nimbalkar: टीका करणाऱ्यांनी ओमराजेंचा संघर्ष बघावा; उपसभापती सचिन अहिर फुटीर खासदारांच्या मदतीला धावले
टीका करणाऱ्यांनी ओमराजेंचा संघर्ष बघावा; उपसभापती सचिन अहिर फुटीर खासदारांच्या मदतीला धावले
NCP on Chief Minister Post: 'फडणवीसांचा अडीच वर्षाचा कार्यकाळ पूर्ण होतोय, आता मुख्यमंत्रीपद राष्ट्रवादीला द्या'; महायुतीकडे राष्ट्रवादीच्या नेत्याची मोठी मागणी
'फडणवीसांचा अडीच वर्षाचा कार्यकाळ पूर्ण होतोय, आता मुख्यमंत्रीपद राष्ट्रवादीला द्या'; महायुतीकडे राष्ट्रवादीच्या नेत्याची मोठी मागणी
Rahul Dravid Coach : ब्रँडन मॅक्क्युलम OUT, राहुल द्रविड IN?, इंग्लंड क्रिकेट बोर्डाची मोठी खेळी; 'द वॉल' होणार कसोटी संघाचा मुख्य कोच?
ब्रँडन मॅक्क्युलम OUT, राहुल द्रविड IN?, इंग्लंड क्रिकेट बोर्डाची मोठी खेळी; 'द वॉल' होणार कसोटी संघाचा मुख्य कोच?
Beed News: आमचे लग्न होईना, पाऊस पडत नाही, आमची सरसकट कर्जमाफी करा; शेतकऱ्याचा कृषीमंत्री दत्तात्रय भरणेंना फोन
आमचे लग्न होईना, पाऊस पडत नाही, आमची सरसकट कर्जमाफी करा; शेतकऱ्याचा कृषीमंत्री दत्तात्रय भरणेंना फोन
Embed widget