एक्स्प्लोर

भारताचा परकीय चलन आणि सोन्याचा साठा घटला, आरबीआयकडून आकडेवारी जाहीर

India foreign exchange : 8 जुलै 2022 रोजी संपलेल्या आठवड्यात परकीय चलनसाठा 8.062 अब्ज डॉलरने घसरून 580.252 अब्ज डॉलर झाला आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने जारी केलेल्या आकडेवारीत ही माहिती देण्यात आली आहे.

RBI : देशाच्या परकीय चलनाच्या (India foreign exchange ) साठ्यात पुन्हा घट झाली आहे. 8 जुलै 2022 रोजी संपलेल्या आठवड्यात परकीय चलनसाठा 8.062 अब्ज डॉलरने घसरून 580.252 अब्ज डॉलर झाला आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने जारी केलेल्या आकडेवारीत ही माहिती देण्यात आली आहे.

यापूर्वी 1 जुलै 2022 रोजी संपलेल्या आठवड्यात परकीय चलन 5.008 अब्ज डॉलरने घसरून 588.314 अब्ज डॉलल झाले होते. आरबीआयच्या आकडेवारीनुसार, 24 जून 2022 रोजी संपलेल्या आठवड्यात चलन 2.734 अब्ज डॉलरने वाढून 593.323 अब्ज डॉलर झाले. यापूर्वी 17 जून रोजी संपलेल्या आठवड्यात परकीय चलन साठा  5.87 अब्ज डॉलरने घसरून  590.588 अब्ज डॉलर झाला होता. तर 10 जून 2022 रोजी संपलेल्या आठवड्यात तो  4.599 अब्ज डॉलरने घसरून  596.458 अब्ज डॉलर झाला होता.

FCA 6.656 अब्ज डॉलरने कमी 

आरबीआयने जारी केलेल्या साप्ताहिक आकडेवारीनुसार, 8 जुलै रोजी संपलेल्या आठवड्यात परकीय चलन साठ्यातील ही घसरण मुख्यत्वे विदेशी चलन मालमत्ता (FCAs) मध्ये घट झाल्यामुळे झाली आहे, जी एकूण चलन साठ्याचा एक महत्त्वपूर्ण भाग आहे. अहवालाच्या आठवड्यात भारताचा FCA 6.656 अब्ज डॉलरने घसरून 518.089 अब्ज डॉलर झाल्याचे रिझव्‍‌र्ह बँकेने सांगितले. डॉलरमध्ये नामांकित, FCA मध्ये परकीय चलनाच्या साठ्यामध्ये असलेल्या युरो, पौंड आणि येन सारख्या इतर विदेशी चलनांच्या मूल्यात वाढ किंवा घट होण्याचा परिणाम देखील समाविष्ट आहे.

सोन्याचा साठाही कमी 

अहवालाच्या आठवड्यात सोन्याच्या साठ्याचे मूल्य 1.236 अब्ज डॉलरने घसरून  39.186 अब्ज डॉलर झाले आहे. रिपोर्टिंग आठवड्यात, देशाचा SDR म्हणजेच आंतरराष्ट्रीय नाणेनिधी (IMF) मधील विशेष आहरण अधिकार 122 दशलक्ष डॉलरने कमी होऊन  18.012 अब्ज डॉलर झाले. IMF कडे ठेवलेला देशाचा चलन साठा देखील  49 दशलक्ष डॉलरने कमी होऊन  4966 अब्ज डॉलर झाला आहे. 

दीपक पळसुले हे मागील 12 वर्षांपासून पत्रकारितेत कार्यरत आहेत. वृत्तनिवेदक म्हणून दशकभरापासून एबीपी माझामध्ये सक्रीय आहेत.  अर्थ, राजकारण, समाजकारण, शेती,सांस्कृतिक, टेक-ऑटो  अशा विविध विषयांमध्ये त्यांचा व्यासंग आहे.   
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Video : विराट-कुलदीपचा कधी न पाहिलेला कपल डान्स! विशाखापट्टणम वनडेत नेमकं काय घडलं? व्हिडिओ तुफान व्हायरल
विराट-कुलदीपचा कधी न पाहिलेला कपल डान्स! विशाखापट्टणम वनडेत नेमकं काय घडलं? Video तुफान व्हायरल
डोळ्यात माती फेकली अन् गळ्यातील सोन्याची पोत पळवली; दुचाकीवरील चोरट्यांच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या
डोळ्यात माती फेकली अन् गळ्यातील सोन्याची पोत पळवली; दुचाकीवरील चोरट्यांच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या
गॅस फुग्याच्या स्फोटपासून विनोद पाटील थोडक्यात बचावले; संभाजीनगरात आगीच्या दोन घटना, लग्नातही भडका
गॅस फुग्याच्या स्फोटपासून विनोद पाटील थोडक्यात बचावले; संभाजीनगरात आगीच्या दोन घटना, लग्नातही भडका
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 06 डिसेंबर 2025 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 06 डिसेंबर 2025 | शनिवार

व्हिडीओ

Mumbai Chunabhatti Riksha:चुनाभट्टीतील वादानंतर भीमसैनिकांनी रिक्षा सोडल्या,रिक्षानं जाण्यास परवानगी
Chunabhatti : चुनाभट्टीजवळ रिक्षा रोखल्याने आंबेडकर अनुयायी आक्रमक, पोलिसांसोबत बाचाबाची
Alaknanda Galaxy Vastav 250 : अलकनंदा : नव्या दिर्घिकेचा शोध; विश्वाचे रहस्य उलगडण्यास होणार मदत
Supriya Sule : भारत सरकारने Indigo वर कारवाई केली पाहिजे, सुप्रिया सुळेंची मागणी
Hapus Mango हापूस आंब्यावरही गुजरातचा दावा; गांंधीनगर,नवसारी विद्यापीठांचा भौगोलिक मानांकनासाठी अर्ज

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Video : विराट-कुलदीपचा कधी न पाहिलेला कपल डान्स! विशाखापट्टणम वनडेत नेमकं काय घडलं? व्हिडिओ तुफान व्हायरल
विराट-कुलदीपचा कधी न पाहिलेला कपल डान्स! विशाखापट्टणम वनडेत नेमकं काय घडलं? Video तुफान व्हायरल
डोळ्यात माती फेकली अन् गळ्यातील सोन्याची पोत पळवली; दुचाकीवरील चोरट्यांच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या
डोळ्यात माती फेकली अन् गळ्यातील सोन्याची पोत पळवली; दुचाकीवरील चोरट्यांच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या
गॅस फुग्याच्या स्फोटपासून विनोद पाटील थोडक्यात बचावले; संभाजीनगरात आगीच्या दोन घटना, लग्नातही भडका
गॅस फुग्याच्या स्फोटपासून विनोद पाटील थोडक्यात बचावले; संभाजीनगरात आगीच्या दोन घटना, लग्नातही भडका
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 06 डिसेंबर 2025 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 06 डिसेंबर 2025 | शनिवार
धक्कादायक! बीडमध्ये चोरट्यांचा नवा फंडा, ट्रॅव्हल्सवर आधीच चढून बसतात, चढ येताच उड्या ठोकतात
धक्कादायक! बीडमध्ये चोरट्यांचा नवा फंडा, ट्रॅव्हल्सवर आधीच चढून बसतात, चढ येताच उड्या ठोकतात
गुजरातमधल्या वलसाडच्या आंब्याला हापूस मानांकन, कोकणवासी संतप्त, न्यायालयीन लढाई लढणार; काय आहे संपूर्ण प्रकरण?
गुजरातमधल्या वलसाडच्या आंब्याला हापूस मानांकन, कोकणवासी संतप्त, न्यायालयीन लढाई लढणार; काय आहे संपूर्ण प्रकरण?
Elon Musk : युरोपियन युनियनकडून इलॉन मस्क यांच्या X ला 12 हजार कोटींचा दणका, ब्लू टिकच्या वादावरुन अमेरिका-युरोप आमनेसामने
युरोपियन युनियनकडून इलॉन मस्क यांच्या X ला 12 हजार कोटींचा दणका, ब्लू टिकच्या वादावरुन अमेरिका-युरोप आमनेसामने
The Family Man Season : ‘द फॅमिली मॅन 4’ मध्ये मोठा ट्विस्ट! राज–डीकेचा खुलासा; चौथा भाग अधिक इंट्रेस्टिंग
‘द फॅमिली मॅन 4’ मध्ये मोठा ट्विस्ट! राज–डीकेचा खुलासा; चौथा भाग अधिक इंट्रेस्टिंग
Embed widget