(Source: ECI/ABP News/ABP Majha)
होळीनिमित्त बाजारपेठा सजल्या, चीनी वस्तूंवर बहिष्कार; 50 हजार कोटींची उलाढाल होणार
उद्या देशभरात होळीचा सण साजरा केला जाणार आहे. यानिमित्त देभरातील बाजारपेठा (Market) सजल्या आहेत. या सणात 50 हजार कोटी रुपयांची उलाढाल होणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
Holi 2024: दरवर्षी मोठ्या उत्साहात देशभर होळीचा (Holi) सण साजरा केला जातो. या दिवशी देशभर मुक्त रंगांची उधळण केली जाते. एका बाजूला देशात राजकीय होळी सुरु असतानाच उद्या दुसऱ्या बाजूला होळीचा सण साजरा केला जाणार आहे. यानिमित्त देभरातील बाजारपेठा (Market) सजल्या आहेत. यावेळी होळीच्या सणात 50 हजार कोटी रुपयांची (50 thousand crore rupees) उलाढाल होणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
होळी (Holi) सणानिमित्त बाजारपेठा सज्ज
होळीच्या सणानिमित्त सर्वत्र उत्साह पाहायला मिळत आहे. अवघा एकच दिवस या सणासाठी बाकी आहे. उद्या देशभर या सणाचा आनंद पाहायला मिळणार आहे. या सणाच्या पार्श्वभूमीवर मार्केटप्लेसपासून मॉल्स आणि मार्केटपर्यंत सर्वकाही सज्ज झालं आहे. बाजारपेठात मोठ्या प्रमाणात साहित्य आलं आहे. व्यवसायाकि संघटनेच्या कार्यकर्त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, यावर्षी होळीच्या सणानिमित्त 50 हजार कोटी रुपयांचा व्यवसाय होण्याची शक्यता आहे. देशभरातील व्यवसायात 50 टक्क्यांची वाढ अपेक्षीत आहे. एकट्या दिल्लीत 5 हजाक कोटी रुपयांचा व्यवसाय होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
चीनी वस्तूंवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय
दरम्यान, या होळीच्या सणानिमित्त चीनी वस्तूंवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय अनेक ठिकाणी घेण्यात आलाय. अनेक ठिकाणी लोक देशी वस्तूंना प्राधान्य देताना दिसतायेत. व्यापाऱ्यांसह सामान्य ग्राहक देखील यावर बहिष्कार घातलाना दिसत आहेत. या होळी सणाच्या पार्श्वभूमीवर देशात साधारणत: 10 हजार कोटी रुपयांच्या वस्तूंची आयात करण्यात आलीय. यावेळी बाजारपेठेत चांगलं वातावरण आहे. त्यामुळं व्यवसाय चांगला होणार असल्याची माहिची व्यापाऱ्यांनी दुकानदारांनी दिलीय.
होळी (Holi) सणानिमित्त 'या' वस्तूंची मोठ्या प्रमाणात खरेदी
होळीच्या सणानिमित्त लोक मोठ्या प्रणावार वस्तूंची खरेदी करत आहेत. यामध्ये हर्बल रंग, गुलाल, पिचकारी, चंदन, फुगे, पुजेचं साहित्य, कपडे, मिठाई, भेटवस्तू, फुले, फळे, किराणा माल यासह देशात उत्पादीत झालेल्या विविध वस्तूंची खरेदी लोकांकडून केली जातेय. या सर्व वस्तूला बाजारात मोठी मागणी असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. ही खरेदी करत असताना लोक परदेशी वस्तू घेण्याचं नाकारत आहेत. देशी वस्तूंनाच अधिक प्राधान्य देत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे.. सध्या बाजारात पिचकारीची किंमत ही 100 रुपयांपासून 500 रुपयांपर्यंत आहे. लहान मुलांना ज्या प्रकारच्या वस्तू आवडतात तशाच वस्तू बाजारात तयार केल्या आहेत.
महत्वाच्या बातम्या: