एक्स्प्लोर

सरकारी तिजोरीत मोठी भर, GST संकलनाने 8 वर्षानंतर प्रथमच गाठली विक्रमी पातळी, नेमकी किती झाली वाढ?

भारतासाठी एक महत्वाची बातमी समोर आली आहे. दशाच्या तिजोरीत मोठी भर पडली आहे. एप्रिलमध्ये (April) भारताचे जीएसटी संकलन (GST Collection) विक्रमी 2.37 लाख कोटी रुपयांवर पोहोचले आहे.

GST Collection :  भारतासाठी एक महत्वाची बातमी समोर आली आहे. देशाच्या तिजोरीत मोठी भर पडली आहे. एप्रिलमध्ये (April) भारताचे जीएसटी संकलन (GST Collection) विक्रमी 2.37 लाख कोटी रुपयांवर पोहोचले आहे. जे गेल्या वर्षीच्या याच महिन्यातील 2.10 लाख कोटी रुपयांपेक्षा 12.6 टक्क्यांनी जास्त आहे. जीएसटी संकलनात झालेली वाढ ही सरकारने ठरवलेल्या कायदे आणि प्रणालींचे पालन यामुळं झाल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे.

आतापर्यंतचा सर्वाधिक जीएसटी संग्रह

भारत सरकारने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, एप्रिल 2024 मध्ये जीएसटी संकलन (GST Collection) 2.10 लाख कोटी रुपये होते. 1 जुलै 2017 रोजी नवीन कर प्रणाली लागू झाल्यानंतरचा हा दुसरा सर्वाधिक जीएसटी संग्रह होता. या वर्षी एप्रिलमध्ये, देशांतर्गत व्यवहारांमधून जीएसटी संग्रह 10.07 टक्क्यांनी वाढून 1.9 लाख कोटी रुपये झाले आहे. तर आयात केलेल्या वस्तूंवरील कर 20.8  टक्क्यांनी वाढून 46913 कोटी रुपये झाला आहे. एप्रिल महिन्यात जारी केलेल्या परताव्याच्या रकमेत 48.3 टक्क्यांनी वाढ होऊन ती 27341 कोटी रुपये झाली आहे.

सरकारी तिजोरीत भर

या वर्षी मार्चमध्ये जीएसटी संकलन गेल्या वर्षीच्या याच महिन्याच्या तुलनेत 9.9 टक्क्यांनी वाढून 1.96 लाख कोटी रुपये झाले. या वर्षी फेब्रुवारीमध्ये नोंदवलेल्या 1.84 लाख कोटी रुपयांच्या कर संकलनापेक्षा टप्प्याटप्प्याने जीएसटी संकलन 6.8 टक्के जास्त होते. मार्चमधील एकूण जीएसटी महसुलात सीजीएसटी (केंद्रीय जीएसटी) मधून 38100 कोटी रुपये, राज्य जीएसटीमधून 49900 कोटी रुपये, एकात्मिक जीएसटीमधून 95900कोटी रुपये, भरपाई उपकरातून 12300 कोटी रुपये समाविष्ट होते.

'या' पाच राज्यांनी भरला सर्वाधिक कर

फेब्रुवारीमध्ये सीजीएसटी संकलन 35204 कोटी रुपये, राज्य जीएसटी 43704 कोटी रुपये, एकात्मिक जीएसटी 90870 कोटी रुपये आणि भरपाई उपकर 13868 कोटी रुपये होता. मार्चमध्ये जीएसटी संकलनात महाराष्ट्र, कर्नाटक, गुजरात, तामिळनाडू आणि उत्तर प्रदेश हे पहिल्या पाच राज्यांमध्ये होते. महाराष्ट्राने मार्चमध्ये 34534 कोटी रुपये दिले, जे गेल्या वर्षीच्या मार्चपेक्षा 14 टक्के जास्त आहे.

कर्नाटकातून जीएसटी संकलन 13497 कोटी रुपये झाले, जे वार्षिक आधारावर 4 टक्क्यांनी वाढले आहे. गुजरातने 12095 कोटी रुपये दिले, जे मार्च 2024 च्या तुलनेत 6 टक्क्यांनी वाढले आहे. तामिळनाडूने 11017 कोटी रुपये जीएसटी भरला, जो 7 टक्के जास्त आहे. उत्तर प्रदेशातून जीएसटी संकलन 9956 कोटी रुपये झाले, जे वार्षिक आधारावर 10 टक्क्यांनी वाढले आहे.

महत्वाच्या बातम्या:

Jalgaon Chatai : जगात फेमस 'जळगाव चटई' उद्योग अडचणीत, GST आणि वाढलेल्या वीजदराचा निर्यातीला फटका, अनेक उद्योग बंद

महत्त्वाच्या बातम्या

धनत्रयोदशीच्या दिवशी सोने खरेदी करावे की चांदी? खरेदी करण्यापूर्वी जाणून घ्या महत्वाच्या 3 गोष्टी, सध्या काय आहेत दर? 
धनत्रयोदशीच्या दिवशी सोने खरेदी करावे की चांदी? खरेदी करण्यापूर्वी जाणून घ्या महत्वाच्या 3 गोष्टी, सध्या काय आहेत दर? 
PNB Bank Fraud : एक नाही दोन नाही बँकेतून तब्बल 35 कोटी रुपये गायब, ग्राहकांची बँकेत मोठी गर्दी, नेमकं प्रकरण काय? 
PNB Bank Fraud : एक नाही दोन नाही बँकेतून तब्बल 35 कोटी रुपये गायब, ग्राहकांची बँकेत मोठी गर्दी, नेमकं प्रकरण काय? 
कचरा आणून द्या, चहा, कॉफी आणि जीवनावश्यक वस्तू मिळवा, भारतातील 'या' शहरात अनोखा प्रयोग, लोकांचा वाढता प्रतिसाद
कचरा आणून द्या, चहा, कॉफी आणि जीवनावश्यक वस्तू मिळवा, भारतातील 'या' शहरात अनोखा प्रयोग, लोकांचा वाढता प्रतिसाद
Diesel : भारताच्या तिजोरीत मोठी भर पडणार! डिझेलची निर्यात वाढणार, आंतरराष्ट्रीय बाजारात मजबूत स्थान 
Diesel : भारताच्या तिजोरीत मोठी भर पडणार! डिझेलची निर्यात वाढणार, आंतरराष्ट्रीय बाजारात मजबूत स्थान 

व्हिडीओ

Raj Thackeray Karjat Full Speech : महाराष्ट्र उद्योगपतींच्या चावीवर चालणार नाही! राज ठाकरेंची गर्जना
Shiv Sena PC On Pradeep Purnekar Case :एकनाथ शिंदेंवर चुकीचं बोलणारा नेता ठाण्यातून परत जाणार नाही, नरेश म्हस्केंची वॉर्निंग
Pratap Patil On Win : मराठवाड्यातील पदवीधरांच्या रोजगारासाठी मी काम करणार : प्रताप पाटील
Nilesh Chandramuni Mumbai : कबुतरखाना वादानंतर निलेश चंद्रमुनींचा राज ठाकरेंना पाठिंबा : ABP Majha
Nitesh Karale Guruji On Win : अनपेक्षित निकाला लागण्याची शक्यता, कराळे गुरुजींना विजयाचा विश्वास

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Varanasi MLC Election Result : पंतप्रधान मोदींच्या वाराणसीमध्ये भाजपला मोठा धक्का, शिक्षक मतदारसंघामध्ये समाजवादीचा विजय, पदवीधरमध्येही विजयाच्या उंबरठ्यावर
पंतप्रधान मोदींच्या वाराणसीमध्ये भाजपला मोठा धक्का, शिक्षक मतदारसंघामध्ये समाजवादीचा विजय, पदवीधरमध्येही विजयाच्या उंबरठ्यावर
Raj Thackeray : अमित शाह, कुऱ्हाडीचा आवाज येतो, पण देवाच्या काठीचा येत नाही, तो ज्या दिवशी येईल...; कर्जत वृक्षतोडीवरून राज ठाकरे भडकले
अमित शाह, कुऱ्हाडीचा आवाज येतो, पण देवाच्या काठीचा येत नाही, तो ज्या दिवशी येईल...; कर्जत वृक्षतोडीवरून राज ठाकरे भडकले
अर्णब चक्रीवादळाने आंध्र प्रदेशात हाहाकार, विशाखापट्टणममध्ये जुलै महिन्याच्या दीडपट पाऊस 18 तासात कोसळला, तिघांचा बळी; 57 हजार लोकांना सुरक्षित स्थळी हलवलं, 50 रेल्वे 21 विमानसेवा रद्द
अर्णब चक्रीवादळाने आंध्र प्रदेशात हाहाकार, विशाखापट्टणममध्ये जुलै महिन्याच्या दीडपट पाऊस 18 तासात कोसळला, तिघांचा बळी; 57 हजार लोकांना सुरक्षित स्थळी हलवलं, 50 रेल्वे 21 विमानसेवा रद्द
मुंबईत 15 लाखांच्या लाचप्रकरणी अधिकारी अटकेत; येवल्यात 1500 रु घेताना तलाठी रंगेहात अडकला
मुंबईत 15 लाखांच्या लाचप्रकरणी अधिकारी अटकेत; येवल्यात 1500 रु घेताना तलाठी रंगेहात अडकला
निवडणुकीत राष्ट्रवादीच्या तुतारीने दोन जागा जिंकल्या, जयंत पाटलांचा भाजपला टोला; कराळे मास्तरांच्या निलंबनावरही बोलले
निवडणुकीत राष्ट्रवादीच्या तुतारीने दोन जागा जिंकल्या, जयंत पाटलांचा भाजपला टोला; कराळे मास्तरांच्या निलंबनावरही बोलले
Narendra Modi Tweet: विधानपरिषदेच्या 28 जागांसाठी निवडणूक, बॅलेटपेपरवर मतदान; मोदी म्हणाले, काँग्रेसने किती जागा जिंकल्या, ओळखा?
विधानपरिषदेच्या 28 जागांसाठी निवडणूक, बॅलेटपेपरवर मतदान; मोदी म्हणाले, काँग्रेसने किती जागा जिंकल्या, ओळखा?
...अन्यथा पक्षाला आगामी निवडणुकांमध्ये किंमत मोजावी लागू शकते; राष्ट्रवादीच्या पराभवानंतर अमोल मिटकरींची पहिली प्रतिक्रिया
...अन्यथा पक्षाला आगामी निवडणुकांमध्ये किंमत मोजावी लागू शकते; राष्ट्रवादीच्या पराभवानंतर अमोल मिटकरींची पहिली प्रतिक्रिया
Chhatrapati Sambhajinagar Graduates Constituency Result 2026 मराठवाडा पदवीधरमध्ये राष्ट्रवादीला 'दे धक्का'; सतीश चव्हाणांच्या पराभवाची 6 कारणे, बदलाचा मुद्दा प्रभावी ठरला
मराठवाडा पदवीधरमध्ये राष्ट्रवादीला 'दे धक्का'; सतीश चव्हाणांच्या पराभवाची 6 कारणे, बदलाचा मुद्दा प्रभावी ठरला
Embed widget