10 कोटी शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी, 31 मे रोजी Kisan Yojana चे पैसे येणार खात्यात
PM Kisan Yojana: तुम्हीही पीएम किसान (pm kisan samman nidhi 11th installment) च्या 11व्या हप्त्याची वाट पाहत असाल, तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे.
PM Kisan Yojana: तुम्हीही पीएम किसान (pm kisan samman nidhi 11th installment) च्या 11व्या हप्त्याची वाट पाहत असाल, तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. केंद्र सरकार 2 दिवसांनी म्हणजेच 31 मे रोजी देशातील करोडो शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे हस्तांतरित करतील. 11व्या हप्त्याचे पैसे 31 मे रोजी हस्तांतरित केले जातील. केंद्र सरकार 21 हजार कोटींहून अधिक रुपयांच्या 11व्या हप्त्याचे पैसे हस्तांतरित करणार आहेत. शिमल्यात हा कार्यक्रम आयोजित केला जाणार आहे. यासोबतच पंतप्रधान नरेंद्र मोदी लाभार्थ्यांशी संवाद साधणार आहेत.
पंतप्रधान मोदी शिमला येथे राष्ट्रीय स्तरावरील गरीब कल्याण संमेलनात सहभागी होणार आहेत. यामध्ये ते 9 केंद्रीय मंत्रालये आणि कार्यक्रमात सहभागी असलेल्या लाभार्थ्यांशी संवाद साधतील. या कार्यक्रमादरम्यान 10 कोटींहून अधिक शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे हस्तांतरित केले जातील.
तुम्ही तुमचे केवायसी अजून अपडेट केले नसेल, तर ते लगेच करा. अन्यथा तुमच्या खात्यात 11व्या हप्त्याचे पैसे येण्यास अडथळा निर्माण होऊ शकतो. केवायसी अपडेट करण्यासाठी तुमच्याकडे 31 मे पर्यंत संधी आहे.
दरम्यान, प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या 10 व्या हप्त्याचे पैसे 1 जानेवारी 2022 रोजी शेतकऱ्यांच्या खात्यात हस्तांतरित करण्यात आले होते. देशातील अनेक शेतकऱ्यांच्या खात्यावर 2000 रुपयांचा हप्ता वर्ग करण्यात आला. पीएम किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत पात्र शेतकरी कुटुंबांना दरवर्षी 6,000 रुपयांची आर्थिक मदत दिली जाते. ही रक्कम प्रत्येकी दोन हजार रुपयांच्या तीन समान हप्त्यांमध्ये शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग केली जाते.
इतर महत्वाच्या बातम्या:
Rajya Sabha Election : राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी कोल्हापूरचे दोन मल्ल झुंजणार? भाजपकडून धनंजय महाडिक अर्ज भरण्याची शक्यता
भाजपकडून राज्यसभेसाठी उमेदवार जाहीर, राज्यातून पियूष गोयल आणि अनिल बोंडेंना संधी
पंजाबमधील आप सरकारने काल सुरक्षा काढून घेतली, आज काँग्रेस नेते आणि गायक सिद्धू मुसेवालांची गोळ्या घालून हत्या