एक्स्प्लोर

Rajya Sabha Election : राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी कोल्हापूरचे दोन मल्ल झुंजणार? भाजपकडून धनंजय महाडिक अर्ज भरण्याची शक्यता

भाजपकडून पियूष गोयल आणि अनिल बोंडे यांची उमेदवारी आधीच जाहीर केली असून आता तिसऱ्या जागेसाठी भाजपकडून धनंजय महाडिक हे उमेदवारी अर्ज भरण्याची शक्यता आहे. 

मुंबई: राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी आता कोल्हापूरचे दोन मल्ल झुंजण्याची शक्यता आहे. पियुष गोयल आणि अनिल बोंडे यांची उमेदवारी जाहीर केल्यानंतर आता भाजपच्या तिसऱ्या जागेसाठी आणि एकूणात सहाव्या जागेसाठी कोल्हापूरच्या धनंजय महाडिकांना संधी मिळण्याची शक्यता आहे. 

धनंजय महाडिक यांना सोमवारी मुंबईमध्ये या असा संदेश भाजपने दिला आहे. त्यामुळे उद्या पियुष गोयल आणि अनिल बोंडे यांच्यासोबत आता धनंजय महाडिक आपला उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शक्यता आहे. 

भाजपकडून राज्यसभेच्या जागांसाठी जाहीर करण्यात आलेल्या यादीत धनंजय महाडिक यांचे नाव नाही. तरीही त्यांना आता संधी देण्यात येण्याची शक्यता आहे. त्यामुळे उद्या त्यांना मुंबईत येण्याचा संदेश धाडण्यात आला आहे. 

भाजपकडून राज्यसभेसाठी दोन जागांवर उमेदवार जाहीर करण्यात आले आहेत. माजी मंत्री अनिल बोंडे आणि रेल्वेमंत्री पियूष गोयल यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. भारतीय जनता पक्षाच्या केंद्रीय निवडणूक समितीने विविध राज्यांमध्ये होणाऱ्या आगामी राज्यसभा निवडणुकीसाठी नावांची यादी जाहीर केली आहे. यामध्ये मध्य प्रदेश, कर्नाटक, महाराष्ट्र, राजस्थान, उत्तर प्रदेश, उत्तराखंड, बिहार आणि हरियाणा या राज्यांतील उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली आहेत.

मध्य प्रदेशातून कविता पाटीदार यांना पक्षाने उमेदवारी दिली आहे. निर्मला सीतारामन आणि जगेश यांना कर्नाटकमधून उमेदवारी देण्यात आली आहे. पियुष गोयल आणि अनिल सुखदेवराव बोंडे यांना महाराष्ट्रातून उमेदवारी जाहीर झाली आहे. राजस्थानमधून घनश्याम तिवारी यांना उमेदवारी देण्यात आली आहे. उत्तर प्रदेशात पक्षाने सुरेंद्र सिंह नागर, बाबुराम निषाद, दर्शना सिंह आणि संगीता यादव यांना उमेदवारी दिली आहे.

देशातल्या 15 राज्यातील 57 जागांवर राज्यसभेच्या सदस्यांचा कार्यकाळ संपत आहे. या सर्व 57 जागांसाठी 10 जून रोजी निवडणूक होत आहे. 57 राज्यसभा खासदारांचा कार्यकाळ 21 जून ते 1 ऑगस्ट यादरम्यान संपत आहे. राज्यसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांच्या नेत्यांनी तयारी सुरु केली आहे. ज्या महत्त्वाच्या नेत्यांचा कार्यकाळ संपत आहे, त्यामध्ये काही दिग्गज नेत्यांचाही समावेश आहे.

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

'आमचं भविष्य एपस्टीन गँग निश्चित करू शकत नाही, जनता करेल'; सुप्रीम लीडर निवडताच ट्रम्प, नेत्यानाहूंच्या धमकी सत्रावर इराणचा पलटवार
'आमचं भविष्य एपस्टीन गँग निश्चित करू शकत नाही, जनता करेल'; सुप्रीम लीडर निवडताच ट्रम्प, नेत्यानाहूंच्या धमकी सत्रावर इराणचा पलटवार
आता गुन्हेगारांचा गेम ओव्हर! महाराष्ट्र पोलिसांकडे मायक्रोसॉफ्टचं ' हे ' ॲप, AI करणार तपासात मदत
आता गुन्हेगारांचा गेम ओव्हर! महाराष्ट्र पोलिसांकडे मायक्रोसॉफ्टचं ' हे ' ॲप, AI करणार तपासात मदत
Kolhapur Crime: कोल्हापूरमध्ये विवस्त्र व्यक्तीचा मृतदेह सापडला, चेहरा-मानेवर खोल वार, मनेरमळा परिसरात खळबळ
कोल्हापूरमध्ये विवस्त्र व्यक्तीचा मृतदेह सापडला, चेहरा-मानेवर खोल वार, मनेरमळा परिसरात खळबळ
S. Jaishankar on Iran: 'आम्ही एका इराणी जहाजाला आश्रय दिला आहे, आखाती देशात पुरवठा साखळी बाधित झाली आहे' परराष्ट्र मंत्र्यांनी संसदेत कोणकोणती माहिती दिली?
'आम्ही एका इराणी जहाजाला आश्रय दिला आहे, आखाती देशात पुरवठा साखळी बाधित झाली आहे' परराष्ट्र मंत्र्यांनी संसदेत कोणकोणती माहिती दिली?

व्हिडीओ

Devendra Fadnavis On t 20 World Cup : मुख्यमंत्र्यांकडून विश्वविजेत्या टीम इंडियाचं अभिनंदन
Devendra Fadnavis On T 20 World Cup : मुख्यमंत्री फडणवीसांकडून भारतीय संघाचं कौतुक
Share Market Update : आशियातील सर्व बाजारांत मोठी घसरण, सेन्सेक्स 1800 अंक तर निफ्टी 525 अंक घसरणीवर
Modi vs Mamta : राष्ट्रपतींचा बंगाल दौरा, वादाचा भोवरा Special Report
Satara Bavdhan Bagad Yatra : साताऱ्यातील बावधनमधील बगाड यात्रा सातासुमद्रापार  Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
'आमचं भविष्य एपस्टीन गँग निश्चित करू शकत नाही, जनता करेल'; सुप्रीम लीडर निवडताच ट्रम्प, नेत्यानाहूंच्या धमकी सत्रावर इराणचा पलटवार
'आमचं भविष्य एपस्टीन गँग निश्चित करू शकत नाही, जनता करेल'; सुप्रीम लीडर निवडताच ट्रम्प, नेत्यानाहूंच्या धमकी सत्रावर इराणचा पलटवार
आता गुन्हेगारांचा गेम ओव्हर! महाराष्ट्र पोलिसांकडे मायक्रोसॉफ्टचं ' हे ' ॲप, AI करणार तपासात मदत
आता गुन्हेगारांचा गेम ओव्हर! महाराष्ट्र पोलिसांकडे मायक्रोसॉफ्टचं ' हे ' ॲप, AI करणार तपासात मदत
Kolhapur Crime: कोल्हापूरमध्ये विवस्त्र व्यक्तीचा मृतदेह सापडला, चेहरा-मानेवर खोल वार, मनेरमळा परिसरात खळबळ
कोल्हापूरमध्ये विवस्त्र व्यक्तीचा मृतदेह सापडला, चेहरा-मानेवर खोल वार, मनेरमळा परिसरात खळबळ
S. Jaishankar on Iran: 'आम्ही एका इराणी जहाजाला आश्रय दिला आहे, आखाती देशात पुरवठा साखळी बाधित झाली आहे' परराष्ट्र मंत्र्यांनी संसदेत कोणकोणती माहिती दिली?
'आम्ही एका इराणी जहाजाला आश्रय दिला आहे, आखाती देशात पुरवठा साखळी बाधित झाली आहे' परराष्ट्र मंत्र्यांनी संसदेत कोणकोणती माहिती दिली?
आम्हाला वाटतं उद्धव ठाकरेंनी सभागृहात असावं, त्यांनी महाराष्ट्राचं नेतृत्व केलंय, संजय राऊतांची 'मनसे' इच्छा; आता सतेज पाटील सावध पवित्रा घेत काय म्हणाले?
आम्हाला वाटतं उद्धव ठाकरेंनी सभागृहात असावं, त्यांनी महाराष्ट्राचं नेतृत्व केलंय, संजय राऊतांची 'मनसे' इच्छा; आता सतेज पाटील सावध पवित्रा घेत काय म्हणाले?
Ankita Walawalkar Reacted On Anurag Dobhal Video: 'इतरांचं आयुष्य पाहण्यात वेळ घालवण्यापेक्षा...', अंकिता वालावलकरचं फॉलोअर्सना आवाहन, अनुराग डोभालचा VIDEO शेअर करुन म्हणाली...
'इतरांचं आयुष्य पाहण्यात वेळ घालवण्यापेक्षा...', अंकिता वालावलकरचं फॉलोअर्सना आवाहन, अनुराग डोभालचा VIDEO शेअर करुन म्हणाली...
Raj Thackeray MNS Vardhapan Din: जात, धर्म यापेक्षा महाराष्ट्र वेडाने झपाटले असाल तर... मनसेच्या वर्धापनदिनी राज ठाकरेंचं काळजाला साद घालणारं आवाहन
जात, धर्म यापेक्षा महाराष्ट्र वेडाने झपाटले असाल तर... मनसेच्या वर्धापनदिनी राज ठाकरेंचं काळजाला साद घालणारं आवाहन
Stock Market Crash Today: युद्धखोरांच्या युद्धाच्या खाईत भारतीय शेअर मार्केटची होरपळ सुरुच; सेन्सेक्स 2400हून अधिक अंकांनी कोसळला; निफ्टीही 750 अंकानी खाली
युद्धखोरांच्या युद्धाच्या खाईत भारतीय शेअर मार्केटची होरपळ सुरुच; सेन्सेक्स 2400हून अधिक अंकांनी कोसळला; निफ्टीही 750 अंकानी खाली
Embed widget