सोनं खरेदी करावं की नको? आज पुन्हा खरेदीदारांना दराचा झटका, दरात नेमकी किती झाली वाढ?
दिवसेंदिवस सोन्याच्या दरात (Gold Price) मोठी वाढ होत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. वाढत्या दरामुळं सोन्याची खरेदी करावी की नको असा प्रश्न खरेदीदारांच्या मनात निर्माण होत आहे.

Gold silver Rate : दिवसेंदिवस सोन्याच्या दरात (Gold Price) मोठी वाढ होत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. वाढत्या दरामुळं सोन्याची खरेदी करावी की नको असा प्रश्न खरेदीदारांच्या मनात निर्माण होत आहे. दरम्यान, मिळालेल्या माहितीनुसार, आजही सोन्याच्या दरात वाढ झाली आहे. आज 24 कॅरेट सोन्याची किंमत 8 हजार 695 प्रति ग्रॅम आहे तर 22 कॅरेट सोन्याची किंमत ही 7 हजार 970 आहे. 24 कॅरेट सोन्याच्या दरात प्रति ग्रॅम 33 रुपयांची आणि 22 कॅरेट सोन्याच्या दरात 30 रुपयांची वाढ झाली आहे. चांदीच्या दरात आज कोणताही बदल झालेला नाही.
सोन्याच्या दरात नेमकी किती झाली वाढ?
24 कॅरेट सोन्याच्या 10 ग्रॅममध्ये 330 रुपयांची आणि 22 कॅरेट सोन्याच्या 10 ग्रॅममध्ये 300 रुपयांची वाढ दिसून येत आहे. काल 24 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याचा दर 86,620 रुपये होता. आज ते 86,950 रुपये झाले आहे. तीच स्थिती 22 कॅरेट सोन्याची आहे जिथे त्याचा दर 79,400 रुपये प्रति 10 ग्रॅम होता. आज ते 300 रुपयांनी वाढून 79,700 रुपये झाले आहे. त्याचबरोबर चांदीच्या दरात कोणताही बदल झालेला नाही. आजही चांदीचा भाव 1,00,500 रुपये प्रति किलो आहे.
मुंबई आणि चेन्नईत सोन्याचा दर किती?
देशाची आर्थिक राजधानी मुंबईत आज 22 कॅरेट सोन्याचा भाव 7,970 रुपये प्रति ग्रॅम आणि 24 कॅरेट सोन्याचा भाव 8,695 रुपये प्रति ग्रॅम आहे. त्याच वेळी, चेन्नईमध्ये 22 कॅरेट आणि 24 कॅरेट सोन्याचा भाव मुंबईप्रमाणे सारखाच आहे.
फ्युचर्स मार्केटमध्ये सोन्या-चांदीच्या किंमती किती?
वायदे बाजारात सोन्या-चांदीच्या दरात वाढ झाली आहे. MCX वर 5 एप्रिल रोजी संपणाऱ्या सोन्याच्या कराराची किंमत 85504.00 रुपये आहे, ज्यामध्ये 449 रुपयांची वाढ दिसून येत आहे. त्याचबरोबर चांदीच्या दरातही वाढ होत आहे. 5 मार्च रोजी संपणाऱ्या कराराच्या किमतीतही 355 रुपयांची वाढ दिसून येत आहे. 5 मार्च रोजी कालबाह्य होणारी चांदी प्रति किलो 95935.00 रुपये आहे.
दरात वाढ झाल्यानं दागिन्यांची मागणी घटली
सोन्याच्या सततच्या वाढत्या किमतींमुळं लोकांचा सोनं खरेदीचा कल कमी झाला आहे. लोकांच्या अडचणी वाढल्या आहेत. सोन्याचे भाव विक्रमी पातळीवर पोहोचल्यानंतर दागिन्यांची मागणी 80 टक्क्यांनी कमी झाली आहे. इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशनच्या मते, देशभरातील दागिने विक्रेत्यांच्या विक्रीत घट झाली आहे. लग्नसराईमुळे दरात वाढ झाली असली तरी ग्राहकांनी खरेदी मंदावली आहे. दुसरीकडे, चीनमधील डीलर्सनी खरेदीदारांना आकर्षित करण्यासाठी सूट देऊ केली आहे. एका महिन्यात सोन्याच्या दरात 6 टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे. त्यामुळं ग्राहकांच्या खिशाला मोठी झळ बसत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे.
महत्वाच्या बातम्या:























