दिलासादायक! सोन्या चांदीच्या दरात घसरण, खरेदीदारांना मोठी संधी, जाणून घ्या तुमच्या शहरातील सोन्या चांदीचे दर
सोन्या चांदीची (Gold Silver) खरेदी करणाऱ्यांसाठी एक महत्वाची बातमी समोर आली आहे. सोन्या चांदीच्या दरात घसरण झाली आहे. त्यामुळं खरेदीदारांना एक प्रकारचा दिलासा मिळाला आहे.
Gold Silver Rate : सोन्या चांदीची (Gold Silver) खरेदी करणाऱ्यांसाठी एक महत्वाची बातमी समोर आली आहे. सोन्या चांदीच्या दरात घसरण झाली आहे. त्यामुळं खरेदीदारांना एक प्रकारचा दिलासा मिळाला आहे. सोन्याच्या किंमतीत थोडीशी कमी घसरण झाली आहे, मात्र, चांदीच्या दरात मोठी घसरण झाली आहे. कमोडिटी मार्केटमध्ये चांदीच्या किंमती घसरण्यामागील प्रमुख कारण म्हणजे जागतिक बाजारात चांदीचे घसरलेले दर हे सांगण्यात आले आहे.
MCX वर सोन्या-चांदीचे भाव काय?
मल्टी कमोडिटी एक्सचेंजमध्ये सोन्या-चांदीच्या दरात मंदी आहे. सोन्याच्या दरात 38 रुपयांनी घसरण झाली आहे. सध्या सोन्याचा दर हा 77931 रुपये प्रति 10 ग्रॅम झाला आहे. आजचा सर्वात कमी भाव 77895 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. तर स्थानिक सराफा बाजारात 600 रुपयांची घसरण दिसून येत असून ती 79000 रुपयांच्या जवळ आली आहे. चांदीच्या भावात मोठी घसरण झाली असून, चांदीच्या दरात 638 रुपयांची घसरण झाली आहे. सध्या चांदी 92001 रुपये प्रति किलोवर पोहोचली आहे.
तुमच्या शहरात सोन्याचे दर काय?
दिल्ली: 24 कॅरेट सोने 600 रुपयांनी घसरुन 79,020 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.
मुंबई : 24 कॅरेट सोन्याचा भाव 600 रुपयांनी घसरून 78,870 रुपये प्रति 10 ग्रॅम झाला आहे.
चेन्नई: 24 कॅरेट सोन्याचा भाव 600 रुपयांनी घसरून 78,870 रुपये प्रति 10 ग्रॅम झाला आहे.
कोलकाता: 24 कॅरेट सोन्याचा भाव 600 रुपयांनी घसरून 78,870 रुपये प्रति 10 ग्रॅम झाला आहे.
अहमदाबाद: 24 कॅरेट सोन्याचा भाव 600 रुपयांनी घसरून 78920 रुपये प्रति 10 ग्रॅम झाला आहे.
बेंगळुरू: 24 कॅरेट सोने 600 रुपयांनी घसरून 78,870 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.
चंदीगड: 24 कॅरेट शुद्ध सोन्याचा भाव 600 रुपयांनी घसरून 79020 रुपये प्रति 10 ग्रॅम झाला आहे.
हैदराबाद: २४ कॅरेट सोन्याचा भाव 600 रुपयांनी घसरून 78870 रुपये प्रति 10 ग्रॅम झाला आहे.
जयपूर: 24 कॅरेट सोने 600 रुपयांनी घसरून 79,020 रुपये प्रति 10 ग्रॅम झाले आहे.
लखनौ: 24 कॅरेट सोन्याचा भाव 600 रुपयांनी घसरून 79,020 रुपये प्रति 10 ग्रॅम झाला आहे.
नागपूर : 24 कॅरेट शुद्ध सोन्याचा भाव 600 रुपयांनी घसरून 78,870 रुपये प्रति 10 ग्रॅम झाला आहे.
पाटणा: 24 कॅरेट शुद्ध सोन्याचा भाव 600 रुपयांनी घसरून 78,920 रुपये प्रति 10 ग्रॅम झाला आहे.
आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्या-चांदीचे भाव किती?
आंतरराष्ट्रीय बाजारात सोने 1.31 डॉलरने घसरून 2708.09 डॉलर प्रति औंस आहे. सोन्याव्यतिरिक्त चांदीच्या दरातही घसरण दिसून येत असून त्याची प्रति औंस 31.405 डॉलर दराने विक्री होत आहे. त्यात 0.68 टक्के कमजोरी नोंदवली जात आहे. सोने आणि चांदीच्या या किमती फेब्रुवारी 2024 च्या करारासाठी आहेत.