एक्स्प्लोर

Gold Silver Price : सोन्या-चांदीच्या भावात घसरण, सोनं 200 रुपयांनी तर चांदी 1300 रुपयांनी उतरली

Gold Silver Price : मुंबई आणि पुण्यात आज 22 कॅरेटच्या सोन्याचा भाव हा 46,600 रुपये इतका आहे तर 24 कॅरेट सोन्याचा भाव हा 47,600 रुपये इतका आहे. एक किलो चांदीचा भाव हा 71,400 रुपये इतका आहे. 

मुंबई : बुधवारी वाढलेल्या सोन्या-चांदीच्या किंमती गुरुवारी बाजार बंद होताना पुन्हा काही प्रमाणात घसरल्या. मुंबई आणि पुण्यामध्ये सोन्याच्या किंमतीमध्ये 200 रुपयांची घट झाली आहे. मुंबई आणि पुण्यात आज 22 कॅरेटच्या सोन्याचा भाव हा 46,600 रुपये इतका आहे तर 24 कॅरेट सोन्याचा भाव हा 47,600 रुपये इतका आहे. तर चांदीच्या किंमतीत 1300 रुपयांची घसरण झाली असून एक किलो चांदीसाठी आता 71,400 रुपये मोजावे लागतील. एका दिवसापूर्वी सोन्याच्या भावात 800 रुपयांची तर चांदीच्या भावात 1500 रुपयांची वाढ झाली होती. 

गेल्या काही दिवसांचा विचार करता स्थिर असलेले सोन्याचे भाव हे दोन दिवस झाले बदलत आहेत.  20 मे रोजी 10 ग्रॅम 22 कॅरेट सोन्याचा भाव 46,000 रुपये होता, तर 10 ग्रॅम 24 कॅरेट सोन्याचा भाव 47,000 हजार रुपये होता. त्यानंतर 21 मेपासून 26 मेपर्यंत सोन्याचे भाव स्थिर असल्याचं पाहायला मिळत होतं. बुधवारी अचानक त्यामध्ये तेजी आली आणि 800 रुपयांनी तो वधारला. आता आज पुन्हा त्यामध्ये 200 रुपयांची घट झाल्याचं पहायला मिळतंय. 

बुधवारी चांदीचा दर हा 71,200 रुपये इतका होता. गुरुवारी त्यामध्ये तब्बल 1500 रुपयांची वाढ झाली असून ती किंमत 72,700 रुपयांवर पोहोचली होती. आता पुन्हा त्यामध्ये 1300 रुपयांची घट झाली असून आज एक किलो चांदीचा भाव हा 71,400 रुपये इतका आहे.  चांदीच्या भावाचा विचार करता गेल्या दहा दिवसात या दरात चढ-उतार दिसत आहे. 16 मे रोजी चांदीचा दर प्रतिकिलो 71,000 हजार रुपये इतका होता. तर 18 मे रोजी तो प्रतिकिलो 74,000 हजारांवर पोहोचला. पुन्हा 19 मेपासून चांदीच्या दरात घट झाल्याचं पाहायला मिळालं. 19 मे रोजी प्रतिकिलो 73,000 रुपये, 20 मे रोजी प्रतिकिलो 72,300 रुपये, 21 मे रोजी प्रतिकिलो 71,200 रुपये, 22 मे प्रतिकिलो 71,100 रुपयांपर्यंत चांदीच्या दरात घट झाली. त्यानंतर 23 मे रोजी चांदीच्या दरात 100 रुपयांनी वाढ झाली, तर 24 मे रोजी चांदीच्या दरात 300 रुपयांची वाढ झाली होती. तर 25 आणि 26 मे रोजी चांदीच्या दरात 300 रुपयांची घट झाली होती. 

मुंबईतील सोन्याच्या भावावर आंतरराष्ट्रीय दराचा जरी फरक पडत असला तरी काही स्थानिक गोष्टीही प्रभाव टाकतात. इंडियन बुलियन ज्वेलर्स असोसिएशनकडून मुंबईतील सोन्याचा दर ठरवला जातोय. त्यामध्ये स्थानिक आयात कर आणि MCX या कमोडिटी मार्केटचा विचार केला जातो. MCX हे देशातील सर्वात मोठे कमोडिटी मार्केट असून या ठिकाणी सोन्याचा भाव ठरवला जातो. 

ऑगस्ट 2020 मध्ये सोन्याच्या भावाने प्रती 10 ग्रॅमसाठी 56 हजार रुपयांचा विक्रमी आकडा गाठला होता. त्यानंतर सोन्याच्या भावामध्ये आता जवळपास 11 हजारांहून जास्त रुपयांची घसरण झाल्याची पहायला मिळतंय. 

महत्वाच्या बातम्या : 

महत्त्वाच्या बातम्या

ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीला सोने खरेदीदारांना मोठा झटका, पाच दिवसातच दरात सात हजारांची वाढ तर चांदीच्या दरात 14 हजारांची वाढ
ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीला सोने खरेदीदारांना मोठा झटका, पाच दिवसातच दरात सात हजारांची वाढ तर चांदीच्या दरात 14 हजारांची वाढ
Share Market : सेन्सेक्सवर चार कंपन्यांचं बाजारमूल्य 1.43 लाख कोटींनी वाढलं, सहा कंपन्यांना फटका, स्टेट बँकेला सर्वाधिक फायदा
सेन्सेक्सवर चार कंपन्यांचं बाजारमूल्य 1.43 लाख कोटींनी वाढलं,स्टेट बँकेला सर्वाधिक फायदा
FPI : विदेशी पोर्टफोलिओ गुंतवणूकदारांनी ट्रेंड बदलला, ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात भारतीय बाजारात 12921 कोटींची गुंतवणूक, तज्ज्ञ म्हणाले...
विक्रेते बनले खरेदीदार, FPI कडून ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात भारतीय बाजारात 12921 कोटींची गुंतवणूक
India America Trade Deal: भारत अमेरिकेला काय काय विकतो आणि अमेरिकेकडून काय खरेदी करतो?, A टू Z माहिती
भारत अमेरिकेला काय काय विकतो आणि अमेरिकेकडून काय खरेदी करतो?, A टू Z माहिती

व्हिडीओ

Raj Thackeray PC : कोकणातले खड्डे, जमिनीची विक्री, कंत्राटदारते नितीन गडकरी, राज ठाकरेंची FULL PC
Prashant Damle Majha Katta : रंगभूमीवर महाविक्रम, कधीही न ऐकलेले किस्से, प्रशांत दामलेंचा ‘माझा कट्टा’
Special Report Milk Rate Increased : दुधाच्या विक्री दरात दोन रुपयांची वाढ;११ ऑगस्टपासून नवे दर लागू
Sunil Tatkare vs Prashant Kishor Sunetra Pawar ; 'पीकें'ची अट राष्ट्रवादीत 'तट'? Special Report
Eknath Shinde and Shiv Sena MP Meet PM Modi :फुटीरांची ओळख परेड,दरे ते दिल्ली A टू Z Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
IND vs SL XI : 6,6,6... सिराजचा सराव सामन्यात धमाका, विजयासाठी एका ओव्हरमध्ये 16 धावांची गरज असताना तीन षटकार मारले, श्रीलंकेच्या खेळाडूंनी थेट बॅट तपासली
6,6,6... सिराजचा सराव सामन्यात धमाका, विजयासाठी एका ओव्हरमध्ये 16 धावांची गरज असताना तीन षटकार मारले
मनोज जरांगे पाटलांची बावनकुळेंवर व्यंगात्मक टीका; म्हणाले, हडप्पा संस्कृती अन् अजंठा लेणीप्रमाणे दिसणारा प्राणी
मनोज जरांगे पाटलांची बावनकुळेंवर व्यंगात्मक टीका; म्हणाले, हडप्पा संस्कृती अन् अजंठा लेणीप्रमाणे दिसणारा प्राणी
जयंत पाटील अन् देवेंद्र फडणवीसांचा एकाच विमानातून प्रवास; काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया, हर्षवर्धन सपकाळ स्पष्टच बोलले
जयंत पाटील अन् देवेंद्र फडणवीसांचा एकाच विमानातून प्रवास; काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया, हर्षवर्धन सपकाळ स्पष्टच बोलले
नालासोपाऱ्यात कोयत्याने पिता-पुत्रावर जीवघेणा हल्ला; मुलाची प्रृकती गंभीर, वडिलही थोडक्यात बचावले रुग्णालयात उपचार
नालासोपाऱ्यात कोयत्याने पिता-पुत्रावर जीवघेणा हल्ला; मुलाची प्रृकती गंभीर, वडिलही थोडक्यात बचावले रुग्णालयात उपचार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 9 ऑगस्ट 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 9 ऑगस्ट 2026 | मंगळवार
Devendra Fadnavis: 'मी 100 टक्के ज्या अडचणी असतील त्या सोडवतो, पण कोल्हापूरची हद्दवाढ झालीच पाहिजे..' सीएम फडणवीसांनी व्यासपीठावरून ठणकावलं, बाॅल थेट लोकप्रतिनिधींच्या कोर्टात टाकला
'मी 100 टक्के ज्या अडचणी असतील त्या सोडवतो, पण कोल्हापूरची हद्दवाढ झालीच पाहिजे..' सीएम फडणवीसांनी व्यासपीठावरून ठणकावलं, बाॅल थेट लोकप्रतिनिधींच्या कोर्टात टाकला
'कोल्हापूरच्या हद्दवाढीसाठी चंद्रदीप नरके साहेब, अमल महाडिक सहकार्य करा..' हसन मुश्रीफांनी थेट मुख्यमंत्र्यांसमोर कान टोचले, महापौर रुपाराणी निकम अन् राजेश क्षीरसागरही बोलले
'कोल्हापूरच्या हद्दवाढीसाठी चंद्रदीप नरके साहेब, अमल महाडिक सहकार्य करा..' हसन मुश्रीफांनी थेट मुख्यमंत्र्यांसमोर कान टोचले, महापौर रुपाराणी निकम अन् राजेश क्षीरसागरही बोलले
Tukaram Mundhe: तुकाराम मुंढेंनी पुण्यात जिथं पहिल्यांदा चायनीज खाल्लं; धाड टाकण्याबाबत काय म्हणाले, हॉटेलचे मालक
तुकाराम मुंढेंनी पुण्यात जिथं पहिल्यांदा चायनीज खाल्लं; धाड टाकण्याबाबत काय म्हणाले, हॉटेलचे मालक
Embed widget