Eknath Shinde and Shiv Sena MP Meet PM Modi :फुटीरांची ओळख परेड,दरे ते दिल्ली A टू Z Special Report
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज पुन्हा एकदा दिल्लीला गेले अन् तिथं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी सुमारे तासभर चर्चा केली... संसदेच्या चालू पावसाळी अधिवेशनात मतदारसंघ फेररचनेसारखं महत्त्वाचं विधेयक आणण्याचा सरकारचा मानस असल्याचं सांगितलं जातंय... त्यातच ठाकरे आणि शिंदेंच्या शिवसेनांमध्ये सुरू असलेली न्यायालयीन लढाईदेखील अंतिम टप्प्यात असल्याचं मानलं जातंय... या पार्श्वभूमीवर शिंदे यांच्या दिल्लीवारीला महत्त्व प्राप्त झालंय... बघुयात यावर आधारित आमचा हा स्पेशल रिपोर्ट...
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे सातारा जिल्ह्यातल्या दरे या आपल्या गावी तीन दिवसांसाठी गेले होेते...
मात्र गुरुवारी त्यांनी अचानक आपला गावचा मुक्काम अर्धवट सोडून मुंबई गाठली...
शुक्रवारी रात्री केंद्रीय गृहमंत्री अमित शाहा मुंबईत येणार असल्यामुळे शिंदेंनी प्लॅन बदलल्याचं सांगितलं गेलं...
मात्र शुक्रवारी सकाळी शिंदे दिल्लीत दाखल झाले आणि त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींशी तासभर चर्चा केली...
या भेटीचं निमित्त सांगितलं गेलं ते ठाकरेंच्या शिवसेनेतून शिंदेंसोबत आलेल्या खासदारांची पंतप्रधानांसोबत भेट...
All Shows





महत्त्वाच्या बातम्या



























