नालासोपाऱ्यात कोयत्याने पिता-पुत्रावर जीवघेणा हल्ला; मुलाची प्रृकती गंभीर, वडिलही थोडक्यात बचावले रुग्णालयात उपचार
शेरू अहमद खान आणि अतीफ खान हे दोघेही गंभीर जखमी झाले असून, अतीफ खानची प्रकृती अत्यंत गंभीर असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे.

पालघर : राज्यातील गुन्हेगारीच्या घटनांमध्ये काही केल्या कमी होताना दिसून येत नाही. त्यातच, गंभीर स्वरुपाचे गुन्हे देखील सातत्याने घडत आहेत. नालासोपारा (Palghar) पूर्वेतील श्रीरामनगर परिसरात आज दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास चक्क कोयत्याने पिता-पुत्रावर जीवघेणा हल्ला झाल्याची घटना घडली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शेरू अहमद खान आणि त्यांचा मुलगा अतीफ खान हे दोघेही पिता-पुत्र असून, त्यांच्यावर अजीज आणि अज्जू या दोघांनी कोयत्याने हल्ला करण्यात आला आहे. सध्या वडिलांची प्रकृती स्थिर असून मुलगा गंभीर जखमी आहे. पोलिसांनी (Police) घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केलाय.
नालासोपारातील या हल्ल्याच्या घटनेनं परिसरात खळबळ उडाली आहे. शेरू अहमद खान आणि अतीफ खान हे दोघेही गंभीर जखमी झाले असून, अतीफ खानची प्रकृती अत्यंत गंभीर असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. प्रथमदर्शनी मिळालेल्या माहितीनुसार, श्रीरामनगर परिसरातील एका मदरशामधील मुलींशी छेडछाडीचे प्रकार वाढल्याच्या तक्रारीनंतर, शेरू अहमद खान आणि त्यांचा मुलगा अतीफ हे संबंधितांना समजावून सांगण्यासाठी गेले होते. त्याचवेळी त्यांच्यावर कोयत्याने हल्ला करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेनंतर परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. या प्रकरणी पोलिसांकडून अधिक तपास सुरू असून, हल्ल्यामागील नेमके कारण आणि घटनेची संपूर्ण पार्श्वभूमी तपासली जात आहे.
एखाद्याच्या जीवाची किंमत आहे की नाही - शबाना खान
दरम्यान, एखाद्याच्या जीवाची काही किंमत आहे की नाही, माझ्या भावाला चाकूने मारहाण केली असून वडिलांनाही ते मारत होते. त्यावेळी, मी तिथे असल्याने ओरड केली, सुदैवाने वडिलांना जीव वाचला. सध्या भाऊ देखील रुग्णालयात असून त्याची प्रकृती गंभीर असल्याचं हल्ल्यातील जखमी आतीफ खानची बहीण शबीना खान यांनी प्रतिक्रिया देताना म्हटले.
हेही वाचा





















