Sunil Tatkare vs Prashant Kishor Sunetra Pawar ; 'पीकें'ची अट राष्ट्रवादीत 'तट'? Special Report
अजित पवारांच्या निधनानंतर राष्ट्रवादीचं नेतृत्व त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवारांच्या हाती गेलं... मात्र सध्या पक्षात सुनेत्रा पवार आणि पक्षातील वरिष्ठ नेते यांच्यात फारसं आलबेल नसल्याचं दिसतंय.. आता हेच बघा ना... प्रशांत किशोर यांनी रणनीतीकार म्हणून सुनेत्रा पवारांची भेट घेतली. नुसती भेटच नव्हे तर प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंच्या कार्यपद्धतीबद्दल चर्चाही झाली. मात्र प्रशांत किशोर यांची नियुक्ती झाल्याबद्दल आम्हाला माहितीच नाही, असे पक्षाचे सगळे वरिष्ठ नेते म्हणताहेत.. त्यामुळे पक्षातील ज्येष्ठ नेते आणि सुनेत्रा पवार यांच्यात समन्वय आहे की नाही ? असा प्रश्न आता उभा ठाकलाय... पाहुयात आमचे प्रतिनिधी निलेश बुधावले यांचा हा स्पेशल रिपोर्ट....
बिहारच्या पोटनिवडणुकीत भाजपचा पराभव केल्यामुळे, राजकीय वर्तुळात चर्चेत असलेलं नाव...
मात्र महाराष्ट्रात प्रशांत किशोर यांची चर्चा सुरू आहे ती, भाजपला हरवणारे आमदार म्हणून नव्हे...
तर सुनेत्रा पवारांचे राजकीय रणनीतीकार म्हणून...
आता या राजकीय रणनीतीकारानं गुरुवारी रात्री मुंबईत सुनेत्रा पवार, पार्थ पवार आणि जय पवार यांची भेट घेतली....
All Shows
































