Odisha Yaas Cyclone Update : ´यास´ दरम्यान ओडिशात 300 बालकांचा जन्म, काहींनी वादळावरुन केलं नामकरण
चक्रीवादळादरम्यान राज्यात 300 पेक्षा जास्त बाळांच्या जन्माची नोंद झाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार काही कुटुंबांनी मुलांचे नाव 'यास' ठेवले आहे.
ओडिशा : ओडिशा आणि पश्चिम बंगाल या राज्यांना यास चक्रीवादळाचा चांगलाच तडाखा बसला आहे. यास चक्रीवादळ या दोन्ही राज्यातील किनारपट्टी भागात राहणाऱ्या नागरिकांना चांगलंच लक्षात राहील. ओडिशा प्रशासनाने देखील यास चक्रीवादळचा उत्तमरित्या सामना केला. योग्य नियोजनामुळे काही प्रमाण नुकसान टाळता आलं. मात्र अनेक ठिकाणी यास चक्रीवादळाने मोठं नुकसाना झालं. यास वादळादरम्यान राज्यात 300 पेक्षा जास्त बाळांच्या जन्माची नोंद झाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार काही कुटुंबांनी मुलांचे नाव 'यास' ठेवले आहे. चक्रीवादळ यास हे आता ओडिशापासून पुढं सरकलं असून झारखंडच्या दिशेनं या वादळाचा प्रवास सुरू आहे.
ओडिशाच्या बालासोर आणि भद्रक जिल्ह्यात 128 गावांमध्ये पाणी भरलं होतं. मुख्यमंत्री नवीन पटनाईक यांनी या गावांना सात दिवस मदत पोहोचवण्याची घोषणा केली आहे. आज मुख्यमंत्री नवीन पटनाईक यांनी हवाई सर्वेक्षण केले. या चक्रीवादळामुळे कमीतकमी एक कोटी लोक प्रभावित झाले आहेत, असा दावा पश्चिम बंगाल सरकारने केला आहे. या वादळाची आठवण म्हणून आम्ही आमच्या मुलांचे नाव 'यास' ठेवल्याचे पालकांनी सांगितले.
More than 300 births registered in Odisha amid cyclone fury, some families name newborns ‘Yaas’
— Press Trust of India (@PTI_News) May 27, 2021
'यास'चा नेमका अर्थ काय आहे?
प्रत्येक चक्रीवादळाला नाव दिलेले असते. चक्रीवादळाच्या नावांवरुन बरेच विचार झाले, ज्यानंतर बाहेरील देशांमध्ये वादळांना महिलांची नावं देण्यात आली. पण, वादळाचा थेट संदर्भ हा विध्वंसाशी लावला जात असून, यामध्ये नकारात्मकताच जास्त येते म्हणून यावर आक्षेप घेतला गेला आणि मग चक्रीवादळांना दुसऱ्या नावानं संबोधण्यास सुरुवात झाली. 'यास' चक्रीवादळ हे ओमानमधून आले आहे. वादळाला ओमानच्या नावावरून नाव पडले आहे. यास हा पर्शियन भाषेतील शब्द आहे, ज्याचा इंग्रजीमध्ये अर्थ 'जॅस्मिन' असा आहे.
2004 मध्ये आले होते 'त्सुनामी' नामकरण
26 December 2004 जपानमध्ये त्सुनामी आलेली होता. त्याचा फटका जपानसहित, कोरिया, भारत आणि इंडोनेशिया इतर आग्नेय देशांना बसला होता. त्या दरम्यान जन्मलेल्या अनेक मुलींची नावे त्सुनामी अशी ठेवण्यात आली होती. आता यासच्या नावावरून अनेक मुलांचे नामकरण झाल्यानंतर त्या घटनेची आठवण होते.