मनोज जरांगे पाटलांची बावनकुळेंवर व्यंगात्मक टीका; म्हणाले, हडप्पा संस्कृती अन् अजंठा लेणीप्रमाणे दिसणारा प्राणी
पंढरपूर तालुक्यातील सरकोली येथे आज जरांगे पाटील यांची सभा झाली. यावेळी जरांगे पाटील यांनी बावनकुळे यांच्यावर टीका केली, हडप्पा संस्कृती व अजंठा लेणीप्रमाणे बावनकुळे हा प्राणी दिसतो

सोलापूर : मराठा आरक्षणाचे उपोषणकर्ते मनोज जरांगे पाटील (Manoj jarange patil) यांनी संध्या मराठा आरक्षण आणि जात प्रमाणपत्र रद्द संदर्भाने दौरा करत आहेत. कालपासून ते सोलापूर दौऱ्यावर असून आज पंढरपुरातूनही त्यांनी राज्यातील सत्ताधारी नेत्यांवर हल्लाबोल केला. यावेळी, भाजप नेते तथा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar bawankule) यांच्यावरही टोकाची टीका केली. बावनकुळे हे नाव कधी ऐकलंच नाही, मुळव्याध ऐकलं आहे. आमचं कुळ तर 96 कुळ आहे, हे बावनकुळ कुठनं काढलं. बावनकुळे प्राणी असा विचित्र दिसतो. पूर्वीच्या हडप्पा संस्कृतीमधील मोहानजोदाडो प्रमाणे व अजंठातील लेणीप्रमाणे हा माणूस दिसतो, अशा शब्दात मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा चंद्रशेखर बावनकुळे यांच्या व्यंगावर लक्ष केले.
पंढरपूर तालुक्यातील सरकोली येथे आज जरांगे पाटील यांची सभा झाली. यावेळी जरांगे पाटील यांनी बावनकुळे यांच्यावर टीका केली, हडप्पा संस्कृती व अजंठा लेणीप्रमाणे बावनकुळे हा प्राणी दिसतो, तुम्हाला तुमचा नेता प्रिय असेल पण आमची जात आमचा बाप आणि समाज हाच पक्ष असल्याचे जरांगे पाटील यांनी म्हटले. आपण वर्षभर मुंबईतील आंदोलनापासून फडणवीस यांच्यावर बोललो नाही. पण, बावनकुळे जर आमची प्रमाणपत्र रद्द करणार असेल तर आम्ही बोलू. तुम्हाला तुमचा नेता प्रिय आहे. पण आमची जात, आमचा बाप, तर समाज आमचा पक्ष आहे. आम्हाला दुसरे कोणी मोठे नाही, असे म्हणत मनोज जरांगे पाटील यांनी बावनकुळे यांना पुन्हा एकदा पंढरपुरातून जोरदार टीका केली.
दरम्यान, कुणबी प्रमाणपत्र आणि जात पडताळणी प्रकरणावरून मनोज जरांगे पाटील यांनी राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर गंभीर आरोप केले होते. "बावनकुळेंनी कुणबी प्रमाणपत्रे रद्द करण्यास सांगितले असून त्यांची नार्को टेस्ट करावी," अशी मागणी जरांगेंनी केली होती. या आरोपांवर आता चंद्रशेखर बावनकुळे यांनीही सविस्तर प्रतिक्रिया देत आरोपांमध्ये कोणतेही तथ्य नसल्याचा दावा केला. तसेच, मी नार्को चाचणीसाठीही तयार असल्याचं त्यांनी म्हटलं होतं.
मनोज जरांगे पाटलांना उत्तर देणार - हाके
मनोज जरांगे मुर्खासारखा धिंगाणा घालत महाराष्ट्रात फिरतोय मंत्र्यांची मुख्यमंत्र्यांची आई माई काढतोय ओबीसीच्या मंत्र्यांच्या व्यंगावर टिंगल करतोय त्याच्या विरोधात ओबीसीची वजन मोठ बांधण्यासाठी उद्या मी सोलापुरात येत आहे अशा पद्धतीचा व्हिडिओ लक्ष्मण हाके यांनी सोशल मीडियात पोस्ट केला असून आज हाके सोलापुर जिल्ह्यातून बाहेर पडत असताना उद्या आता ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी सोलापूर मध्ये सर्व बांधवांना एकत्र येण्याचे आवाहन केले आहे.
हेही वाचा
Before You Go
Dahihandi 2026 Jai Jawan: 1..2..3..4..5..6..7..8..9..10..11...; जय जवानच्या संदीप ढवळेंची मोठी घोषणा





















