जयंत पाटील अन् देवेंद्र फडणवीसांचा एकाच विमानातून प्रवास; काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया, हर्षवर्धन सपकाळ स्पष्टच बोलले
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी जयंत पाटील यांचा फडणवीसांसोबतचा प्रवास आणि राष्ट्रवादीच्या खासदारांची मोदी भेट, यावर भाष्य केलं.

नाशिक : राज्याच्या राजकारणात गेल्या काही महिन्यात मोठ्या राजकीय घडामोडी घडल्या असून ठाकरेंच्या सहा खासदारांनी एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केलाय. त्यानंतर, शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस देखील सत्तेसोबत जाणार असल्याची चर्चा आहे. त्यातच, शरद पवारांचे (NCP) सर्वच खासदार उद्या 10 ऑगस्ट रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेणार आहेत. मात्र, ही भेट विविध प्रश्नासंदर्भाने असल्याचं सुप्रिया सुळे यांनी स्पष्ट केलंय. त्यातच, दुसरीकडे राष्ट्रवादीचे वरिष्ठ नेते जयंत पाटील यांनी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यासमवेत एकाच विमानाने मुंबई ते कोल्हापूर प्रवास केल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. आता, या विमानप्रवासावर काँग्रेसने (Congress) प्रतिक्रिया दिली आहे.
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी जयंत पाटील यांचा फडणवीसांसोबतचा प्रवास आणि राष्ट्रवादीच्या खासदारांची मोदी भेट, यावर भाष्य केलं. समाज स्वास्थाच्या दृष्टिकोनातून ते योग्य नाही. एकाच विमानात प्रवास करणं, एकाच व्यासपीठावर बसणं, एकाच बसने जाणं अशी आपली एक परंपरा आणि संस्कृती राहिलेली आहे. मात्र, भाजपने पैसे आणि सत्याच्या माध्यमातून गुंडागर्दीच्या माध्यमातून या आपल्या जुन्या आणि या सभ्यपणाला कुठेतरी गालबोट लावलेलं आहे, अशी प्रतिक्रिया काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी दिली. तसेच, असे प्रवास करणं काही चुकीचं नाही, मात्र प्रवास झाल्यानंतर त्यावर लगेच शंका जी उपस्थित केल्या जाते. त्याला भारतीय जनता पार्टी जबाबदार आहे, असेही त्यांनी म्हटले.
एखाद मंडळ भेटत असेल तर वावगं नाही
सुप्रिया सुळे यांनी पंतप्रधान नरेंद मोदींच्या भेटीसंदर्भाने माहिती दिली होती. शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे सर्व खासदार नरेंद्र मोदींची भेट घेणार आहेत. पंतप्रधान हे संपूर्ण देशाचे असतात, त्यांनी सर्वांनाच भेटले पाहिजे. जे पंतप्रधान संसदेतच येत नाही, त्यामुळे त्यांच्याकडून अशी अपेक्षा करणं चुकीचं आहे. प्रंतप्रधान यांना भेटण्यासाठी एखादं मंडळ जात असेल तर त्यात वावगं काही नाही, असेही हर्षवर्धन सपकाळ यांनी म्हटले. मात्र, कोणाला जर भेटायचं असेल तर तर जाणाऱ्यांची आणि भेटणाऱ्यांची दोघांची मर्जी आहे, असेही सपकाळ यांनी स्पष्ट केले. दरम्यान, डिलिमिटेशन हा भाजपाचा कावा आहे, डीलिमिटेशन हे राष्ट्रविरोधी आहे, देशविरोधी आहे, संविधानविरोधी आहे. त्यामुळे, सर्वांनी मिळून विरोध केला पाहिजे.
हेही वाचा
Before You Go
Raj Thackeray PC : कोकणातले खड्डे, जमिनीची विक्री, कंत्राटदारते नितीन गडकरी, राज ठाकरेंची FULL PC






















