एक्स्प्लोर

FPI : विदेशी पोर्टफोलिओ गुंतवणूकदारांनी ट्रेंड बदलला, ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात भारतीय बाजारात 12921 कोटींची गुंतवणूक, तज्ज्ञ म्हणाले...

Share Market : भारतीय शेअर बाजारात विदेशी पोर्टफोलिओ गुंतवणूकदारांनी 12921 कोटी रुपयांची गुंतवणूक ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात केली आहे.

नवी दिल्ली : विदेशी पोर्टफोलिओ गुंतवणूकदार (FPI) म्हणजेच एफपीआयनं भारतीय शेअर बाजारातील (Share Market) खरेदीचा किंवा गुंतवणुकीचा ट्रेंड सलग दुसऱ्या महिन्यात कायम ठेवला आहे. एफपीआयनं ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यात भारतीय शेअर बाजारात 12921 कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे. आर्थिक स्थितीमधील सुधारणा, अमेरिकेतील व्याज दरातील कपातीची आशा, कच्चा तेलाच्या दरात झालेली घसरण आणि रुपया स्थिर झाल्यानं विदेशी गुंतवणूकदारांसाठी भारतीय शेअर बाजार गुंतवणुकीसाठी आकर्षक ठरतोय.

FPI कडून जुलै, ऑगस्टमध्ये गुंतवणूक

एफपीआयनं जुलै 2026 मध्ये भारतीय शेअर बाजारात 20200 कोटी रुपयांची गुंतवणूक केली होती. त्यापूर्वी चार महिन्यांमध्ये विदेशी पोर्टफोलिओ गुंतवणूकदारांनी भारतीय बाजारात विक्रीचा ट्रेंड कायम ठेवला होता. सेंट्रल डिपॉजिटरी सर्व्हिसेस(इंडिया) लिमिटेडच्या आकडेवारीनुसार एफपीआयनं जून महिन्यात 49,340 कोटी,  मे महिन्यात 32,963 कोटी, एप्रिलमध्ये 60,847 कोटी आणि  मार्चमध्ये विक्रमी 1.17 लाख कोटी रुपये भारतीय शेअर बाजारातून काढून घेतले होते. त्यापूर्वी फेब्रुवारी महिन्यात विदेशी पोर्टफोलिओ गुंतवणूकदारांनी भारतीय बाजारात 22615 कोटी रुपयांची गुंतवणूक केली होती. 

फेब्रुवारीनंतर जुलै आणि आता ऑगस्ट महिन्यात एफपीआय भारतीय बाजारात गुंतवणूक करत असले तरी भारतीय बाजारातून काढून घेतलेली रक्कम खूप मोठी आहे. 2026 मध्ये एफपीआयनं आतापर्यंत भारतीय बाजारातून 2.41 लाख कोटी रुपये काढून घेतले आहेत. 2025 मध्ये विदेशी पोर्टफोलिओ गुंतवणूकदारांनी भारतीय बाजारातून  1.66 लाख कोटी रुपये काढून घेतले होते.

बाजार विश्लेषकांनुसार, अलीकडच्या काही महिन्यांमध्ये एफपीआयचा कल बदलला आहे, त्याची कारणं अमेरिकेत व्याज दरातील कपातीची आशा, कच्चा तेलाच्या दरात झालेली घसरण, रुपयाची स्थिरता ही आहेत. आरबीआयच्या चांगल्या जीडीपी वाढीचा आणि महागाईसंदर्भातील अंदाजामुळं गुंतवणूकदारांचा विश्वास कायम आहे.  

टॅकचे संहसंस्थापक आणि सीईओ वेदांत गुप्ते यांच्या मते भारतीय शेअर्समध्ये विदेशी भागीदारी अपेक्षेनुसार कमी झाल्यानं आता विदेशी गुंतवणूक येऊ शकते. विदेशी पोर्टफोलिओ गुंतवणूकदार फक्त आयपीओच नव्हे तर शेअर बाजारात लिस्ट असलेल्या कंपन्यांमध्ये देखील गुंतवणूक वाढवत असल्याचं दसत असल्याचं वेदांत गुप्ते यांनी म्हटलं. 

जिओजीत इन्वेस्टमेंटसचे मुख्य गुंतवणूक रणनीतिकार वी.के. विजयकुमार यांच्यामतानुसार एफपीआयच्या खरेदीचं महत्त्वाचं कारण ते वाहन, आरोग्य सेवा यासारख्या क्षेत्रांना प्राधान्य देत आहेत. विदेशी गुंतवणूकदारांची पंसती भारतीय डेब्ट आणि बाँड मार्केटमध्ये देखील आहे. एफपीएआयनं ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात 622 कोटींची गुंतवणूक केली आहे.

(टीप- शेअर बाजार, म्यूच्यूअल फंड हे जोखमीच्या अधीन असतात. या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची असून आम्ही कोणताही दावा करत नाही. या लेखामागचा गुंतवणुकीसाठी शिफारस, सल्ला देण्याचा उद्देश नाही. तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)

एबीपी माझा वेब टीममध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत | राजकारण,क्रीडा, राष्ट्रीय, आंतराराष्ट्रीय ते गाव खेड्यातल्या शेती क्षेत्रातल्या बातम्यांची आवड | यापूर्वी महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन | टीव्ही 9 मराठी डिजीटल | ईटीव्ही भारत महाराष्ट्र मध्ये काम 
Read More
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

15 सप्टेंबरपासून दुकानदारांचे यूपीआय बंद होऊ शकते, 10 लाख छोटे व्यवसाय अडचणीत; नेमकं घडलं तरी काय?
15 सप्टेंबरपासून दुकानदारांचे यूपीआय बंद होऊ शकते, 10 लाख छोटे व्यवसाय अडचणीत; नेमकं घडलं तरी काय?
NSE IPO : एनएसईच्या 30000 कोटींच्या आयपीओचा मार्ग मोकळा, सेबीकडून मंजुरी, शेअर बाजारात कधी लिस्ट होणार?
एनएसईच्या 30000 कोटींच्या आयपीओचा मार्ग मोकळा, सेबीकडून मंजुरी, शेअर बाजारात कधी लिस्ट होणार?
Mhada : मोतीलाल नगर पुनर्विकासात रहिवाशांचे हित केंद्रस्थानी,म्हाडाच्या सी अँड डीए मॉडेलद्वारे 143 एकरांचा कायापालट, म्हाडाला मिळणार 7 हजार घरे : मिलिंद बोरीकर
मोतीलाल नगर पुनर्विकासात रहिवाशांचे हित केंद्रस्थानी म्हाडाच्या सी अँड डीए मॉडेलद्वारे 143 एकरांचा कायापालट: मिलिंद बोरीकर
People at Work 2026: फुकट राबवून हमाली करून घेण्यात भारत जगात आघाडीवर; थेट अहवाल समोर आला
फुकट राबवून हमाली करून घेण्यात भारत जगात आघाडीवर; थेट अहवाल समोर आला
Advertisement

व्हिडीओ

Special Report on El Nino : एल निनोचं सावट, पुढच्या वर्षीही संकट? Rain Update
Manoj Jarange Special Report : पुन्हा आरोपांचं वळ, जरांगे विरुद्ध भुजबळ
Majha Infra Vision Siddhesh Kadam Manisha Khatri : 'डीजे' ते कुंभमेळा, शाश्वत विकासाचा रोड मॅप
Devendra Fadnavis Majha Infra Vision : CM फडणवीसांनी माझा इन्फ्रा व्हिजनमध्ये मांडला विकासाचा रोडमॅप
Majha Infra Vision Eknath Shinde : समृद्धी, कोस्टल, जरांगे ते DJ; एकनाथ शिंदेंचं माझा इन्फ्रा व्हिजन
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Gold Rate: सोने दरात सलग दुसऱ्या दिवशी वाढ, चांदी 2 लाख 40 हजारांवर, सोने चांदीचे लेटेस्ट दर जाणून घ्या
सोने दरात सलग दुसऱ्या दिवशी वाढ, चांदी 2 लाख 40 हजारांवर, सोने चांदीचे लेटेस्ट दर जाणून घ्या
FIR registered in Haldwani purification: हल्द्वानी 'शुद्धीकरण' प्रकरणात आता बंगळूरुमध्ये FIR दाखल; मल्लिकार्जुन खरगेंच्या कार्यक्रमानंतर रामलीला मैदानावर हवन-पूजा
हल्द्वानी 'शुद्धीकरण' प्रकरणात आता बंगळूरुमध्ये FIR दाखल; मल्लिकार्जुन खरगेंच्या कार्यक्रमानंतर रामलीला मैदानावर हवन-पूजा
15 सप्टेंबरपासून दुकानदारांचे यूपीआय बंद होऊ शकते, 10 लाख छोटे व्यवसाय अडचणीत; नेमकं घडलं तरी काय?
15 सप्टेंबरपासून दुकानदारांचे यूपीआय बंद होऊ शकते, 10 लाख छोटे व्यवसाय अडचणीत; नेमकं घडलं तरी काय?
NSE IPO : एनएसईच्या 30000 कोटींच्या आयपीओचा मार्ग मोकळा, सेबीकडून मंजुरी, शेअर बाजारात कधी लिस्ट होणार?
एनएसईच्या 30000 कोटींच्या आयपीओचा मार्ग मोकळा, सेबीकडून मंजुरी, शेअर बाजारात कधी लिस्ट होणार?
सासऱ्याला संपवून सासू आणि मेव्हण्याला गंभीर जखमी केलं, आता आरोपी जावयाची चक्क इच्छामरण अन् अवयवदान करण्यास परवानगी देण्याची मागणी, सोलापुरातील वेगळ्याच प्रकरणाची चर्चा
सासऱ्याला संपवून सासू आणि मेव्हण्याला गंभीर जखमी केलं, आता आरोपी जावयाची चक्क इच्छामरण अन् अवयवदान करण्यास परवानगी देण्याची मागणी, सोलापुरातील वेगळ्याच प्रकरणाची चर्चा
Beed Crime: शेतीच्या फेरफाराची नोंदीसाठी तब्बल एक लाख रुपयांच्या लाचेची मागणी, अंबाजोगाईत मंडल अधिकारी 'एसीबी'च्या जाळ्यात
शेतीच्या फेरफाराची नोंदीसाठी तब्बल एक लाख रुपयांच्या लाचेची मागणी, अंबाजोगाईत मंडल अधिकारी 'एसीबी'च्या जाळ्यात
Air India: गांजाच्या नशेत विमान चालवून 145 जीव टांगणीला लावला, अखेर एअर इंडियाकडून ड्रग्ज चाचणी पॉझिटिव्ह येताच त्या मुख्य वैमानिकाची सेवेतून हकालपट्टी
गांजाच्या नशेत विमान चालवून 145 जीव टांगणीला लावला, अखेर एअर इंडियाकडून ड्रग्ज चाचणी पॉझिटिव्ह येताच त्या मुख्य वैमानिकाची सेवेतून हकालपट्टी
People at Work 2026: फुकट राबवून हमाली करून घेण्यात भारत जगात आघाडीवर; थेट अहवाल समोर आला
फुकट राबवून हमाली करून घेण्यात भारत जगात आघाडीवर; थेट अहवाल समोर आला
Embed widget