Gold Silver Price Today: सोन्याच्या किंमतीत घट, चांदी महाग; जाणून घ्या आजचे दर
Gold Silver Price Today: तज्ज्ञांचे मत आहे की, दिवाळी ते वर्षअखेरपर्यंत सोन्याचे भाव वाढू शकतात. या दरम्यान, सोन्याचे भाव 57 हजार ते 60 हजारांपर्यंत जाऊ शकतात.
Gold Silver Price Today: देशात सणासुदीचा काळात अनेकांची सोने आणि चांदी खरेदी करण्याकडे ओढ असते. ज्यामुळे या काळात सोने आणि चांदीच्या किंमतीत वाढ पाहायला मिळते. दरम्यान, धनत्रयोदशी (Dhanteras 2021), दिवाळी (Diwali 2021) आणि करवा चौथच्या (Karwa chauth 2021) तोंडावर ग्राहकांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. सोन्याच्या किंमतीत आज घट झाली आहे. मात्र, चांदीच्या किंमतीत वाढ पाहायला मिळाली आहे. सोन्याच्या किंमतीत आज 113 रुपयांनी घट झाली आहे. ज्यामुळे आज 10 ग्रॅम सोन्याचा भाव 47 हजार 490 इतका झाला आहे. तर, चांदीचा आजचा भाव 65 हजार 600 प्रितिकिलो रुपये इतका झाला आहे.
GDP Growth: चालू वित्तीय वर्षासाठी जीडीपी 9.5 टक्के राहण्याचा अंदाज
सोन्याच्या किंमतीत वाढ होण्याची शक्यता-
तज्ज्ञांचे मत आहे की, दिवाळी ते डिसेंबर पर्यंत सोन्याचे भाव वाढू शकतात. यादरम्यान, सोन्याचे भाव 57 हजार ते 60 हजारांपर्यंत जाऊ शक्यता व्यक्त केली जात आहे. त्याचवेळी, चांदीच्या किंमतीदेखील वाढू शकतात. यावेळी चांदीचे दर 76,000 ते 82,000 रुपये प्रति किलो पर्यंत जाऊ शकतात. याचे सर्वात मोठे कारण म्हणजे, सणाच्या काळात बाजारात सोने आणि चांदीला जास्त मागणी असते. लोक विशेषतः धनत्रयोदशीच्या दिवशी सोने आणि चांदी खरेदी करतात.
तुमच्या शहरातील सोन्याची किंमत शोधा
तुम्हाला घरबसल्या तुमच्या शहरातील सोने आणि चांदीच्या ताज्या किंमती जाणून घेता येणार आहे. इंडियन बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशनच्या मते, तुम्ही फक्त 8955664433 या क्रमांकावर मिस्ड कॉल देऊन किंमत तपासू शकता. तुम्ही ज्या मोबाईल क्रमांकावरून मिस्ड कॉल द्याल, त्याच क्रमांकावर तुम्हाला मसेज येईल.
सोन्याची शुद्धता कशी ओळखायची?
भारतात सोने खरेदी करणाऱ्यांची संख्या जास्त आहे. मात्र सोन्याच्या शुद्धतेवर नेहमी प्रश्न उपस्थित केले जातात. सोने खरेदीवेळी अनेकांची गुणवत्तेत फसवणूकही केली जाते. महत्वाचे म्हणजे, प्रत्येक दागिने किंवा नाण्यावर त्याची शुद्धता लिहिलेली असते. 99 कॅरेट शुद्ध सोन्यावर 999 लिहिलेले आहे. तर 22 कॅरेटच्या दागिन्यांवर 916 आणि 21 कॅरेट सोन्याचे 875 असे लिहिलेले असते. या व्यतिरिक्त 18 कॅरेटच्या दागिन्यांवर 750 आणि 14 कॅरेट दागिन्यांवर 585 असे लिहिलेले असते.