Gold Rate Today: सोन्याच्या किमतीत घसरण सुरूच; जाणून घ्या आजचे दर
Gold Rate Today: उत्पादन शुल्क, राज्य कर आणि मेकिंग शुल्कामुळे सोन्याच्या दागिन्यांच्या किंमती भारतभर बदलत असतात.

Gold Rate Today: सोन्याच्या किंमतीत आजही घसरण पाहायला मिळालीय. काही दिवसांपूर्वी 56 हजार रुपयांचा आकडा गाठणाऱ्या सोन्याच्या किंमतीत आतापर्यंत मोठी घट झालीय. सध्या 24 कॅरेट दहा ग्रॅम सोन्याची किंमत 48 हजारांवर आलीय. तर, चांदी 61 हजार 123 रुपये प्रति किलोनं विकली जात आहे. उत्पादन शुल्क, राज्य कर आणि मेकिंग शुल्कामुळे सोन्याच्या दागिन्यांच्या किंमती भारतभर बदलतात.
कोरोना महामारीच्या काळात सोन्याच्या दरानं विक्रमी उच्चांक गाठला होता. आंतराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या किंमती वाढल्यानं भारतीय सराफा बाजारात मोठी तेजी आली होती. ऑगस्ट महिन्यात सोन्याची किंमतीनं 56 हजाराचा टप्पा गाठला होता. मात्र, गेल्या काही दिवसांपासून सोन्या-चांदीच्या किंमतीत चढ-उतार पाहायला मिळालं. सोन्याचे दर आता 48 हजार रुपयांपर्यंत खाली आले. गुड रिटर्न वेबसाईटनं दिलेल्या माहितीनुसार, चेन्नईत 22 कॅरेट सोन्याची किंमत 48 हजार 940 रुपये आहे. तर, मुंबईत 24 कॅरेट सोन्याची किंमत 48 हजार 120 इतकी आहे. दिल्लीत सोन्याचा आजचा भाव प्रति दहा ग्रॅम 50 हजार 990 इतका आहे आणि कोलकातामध्ये आज 49 हजार 640 रुपयांनी सोनं खरेदी केलं जात आहे.
सोन्याची शुद्धता कशी ओळखतात?
सोन्यावर हॉलमार्कचे चिन्ह आणि 999, 916, किंवा 875 असे अंक लिहलेले असतात. याच अंकावरून सोन्याची शुद्धता लक्षात येतं. हॉलमार्कच्या चिन्हाबरोबर 999 हा अंक असेल तर, सोने 24 कॅरेट असतं. 999 चा अर्थ असा आहे की, यामधील सोन्याची शुद्धता 99.9 टक्के आहे. 23 कॅरेट सोन्यावर 958, 22 कॅरेट सोन्यावर 916, 21 कॅरेट सोन्यावर 875 तर, 18 कॅरेट सोन्यावर 750 हे अंक असतात. सोनं जितकं जास्त कॅरेटचं तितकी त्याची गुणवत्ता चांगली. त्यामुळं त्याची किंमतही वाढत जाते. हॉलमार्क असणे ही सरकारी गॅरंटी असून ग्राहकांनी सोने खरेदी करताना त्यावर हॉलमार्क चिन्ह आहे का? याची तपासणी करावी आणि त्याची खरेदी करावी असं आवाहन केंद्रीय ग्राहक मंत्रालयाच्या वतीनं करण्यात आलंय
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha
हे देखील वाचा-
- Gold : सोने विक्रेत्यांनो सावधान...आजपासून विना हॉलमार्क सोनं विक्री केल्यास कारवाई होणार
- Share Market Update : शुक्रवारच्या पडझडीनंतर आज किंचित घसरणीसह शेअर बाजार उघडला; फार्मा स्टॉक्स, रिलायंस इंडस्ट्रीजला मोठी मागणी
- Upcoming IPO : पुढच्या आठवड्यात 'या' 2 कंपन्यांचे आयपीओ येणार; पैसे गुंतवण्यापूर्वी वाचा काय म्हणतात तज्ज्ञ?























