Gold : सोने विक्रेत्यांनो सावधान...आजपासून विना हॉलमार्क सोनं विक्री केल्यास कारवाई होणार
Gold Hallmark : देशातल्या 256 शहरात आजपासून विना हॉलमार्क सोन्याचे दागिन्यांची विक्री केल्यास कारवाई होणार आहे.
![Gold : सोने विक्रेत्यांनो सावधान...आजपासून विना हॉलमार्क सोनं विक्री केल्यास कारवाई होणार Gold Hallmark New Consumer Protection Act action will be taken if gold is sold without hallmark Gold : सोने विक्रेत्यांनो सावधान...आजपासून विना हॉलमार्क सोनं विक्री केल्यास कारवाई होणार](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/11/20/340bd130265714324388c2594aa96ebf_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
मुंबई : सोने विक्रेत्यांसाठी आजपासून एक महत्त्वाच्या कायदा लागू झाला असून देशातल्या 256 शहरांमध्ये विना हॉलमार्क (Hallmarking) सोन्याचे दागिने (Gold Jewellery) म्हणजे नॉन-हॉलमार्क गोल्ड विकल्यास कारवाई करण्यात येणार आहे. देशात आजपासून नवीन ग्राहक संरक्षण अधिनियम 2019 (New Consumer Protection Act 2019) लागू करण्यात आला आहे.
या कायद्याच्या आधारे जर एखाद्या दागिने विक्रेत्याने हॉलमार्क नसेलेले दागिने विक्री केल्यास त्याच्यावर भारतीय मानक ब्युरो (BIS) कडून कारवाई करण्यात येणार आहे. केंद्रीय ग्राहक संरक्षण मंत्रालयाने या वर्षीच्या 16 जूनपासून देशातील 256 शहरामध्ये हॉलमार्क असलेल्या दागिन्यांची विक्री करणे बंधनकारक केलं होतं. त्यामध्ये 30 नोव्हेंबरपर्यंत जुन्या दागिन्यांची हॉलमार्क नोंद करण्यासाठी मुदत दिली होती. आता याचा अवधी संपला असल्याने ही कारवाई करण्यात येणार आहे.
जर एखाद्या विक्रेत्याने 22 कॅरेटचे सोनं असल्याचं सांगत 18 कॅरेटच्या सोन्याची विक्री केल्यास त्याच्यावर दंड आणि तुरुंगवासाची कारवाई करण्यात येणार आहे. ग्राहकांची यामध्ये होणारी फसवणूक लक्षात घेता केंद्र सरकारने हा कायदा लागू केला आहे. त्यामुळे यापुढे सामान्य नागरिकांची फसवणूक होणार नाही. दागिन्यांची विक्री करणाऱ्या सर्व विक्रेत्यांना केंद्र सरकारच्या या नियमांचे पालन करणे बंधनकारक आहे.
हॉलमार्क पाहून सोनं खरेदी करा
सोनं जितकं जास्त कॅरेटचं तितकी त्याची गुणवत्ता चांगली. त्यामुळे त्याची किंमतही वाढत जाते. हॉलमार्क असणे ही सरकारी गॅरंटी असून ग्राहकांनी सोने खरेदी करताना त्यावर हॉलमार्क चिन्ह आहे का याची तपासणी करावी आणि त्याची खरेदी करावी असं आवाहन केंद्रीय ग्राहक मंत्रालयाच्या वतीनं करण्यात आलं आहे.
संबंधित बातम्या :
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)