एक्स्प्लोर

Shapoorji Pallonji Group History: गिरगावचं फूटपाथ ते मुंबई सेंट्रल रेल्वे स्टेशनचं बांधकाम, जाणून घ्या शापूरजी पालनजी समूहाचा इतिहास

Shapoorji Pallonji Group History: उद्योगपती सायरस मिस्त्री यांचा अपघात झाला आहे. या अपघातात त्यांचा जागीच मृत्यू झाला आहे. पालघर जिल्हा अधीक्षकांनी याबाबतची माहिती दिली आहे.

Shapoorji Pallonji Group History: उद्योगपती सायरस मिस्त्री यांचा अपघात झाला आहे. या अपघातात त्यांचा जागीच मृत्यू झाला आहे. पालघर जिल्हा अधीक्षकांनी याबाबतची माहिती दिली आहे. सायरस मिस्त्री हे प्रसिद्ध उद्योगपती पालनजी शापूरजी यांचे धाकटे पुत्र होते. सायरस मिस्त्री ज्या शापूरजी पालनजी समूहाचे वारसदार होते त्या समूहाबद्दल अधिक माहिती जाणून घेऊ. 

फक्त 21 महिन्यात केले मुंबई सेंट्रल रेल्वे स्टेशनचे बांधकाम 

कंपनीची स्थापना 1865 मध्ये लिटलवुड पालनजी ही भागीदारी फर्म म्हणून झाली. कंपनीला पहिलं काम मिळालं ते म्हणजे गिरगाव चौपाटी येथे फूटपाथ बांधण्याचे. यानंतर कंपनीला मलबार हिल येथे जलाशयाच्या बांधकामाचे काम मिळाले. कंपनीने मुंबईतील ब्रेबॉर्न स्टेडियम आणि दिल्लीतील जवाहरलाल नेहरू स्टेडियमही बांधले. तसेच कंपनीने मुंबई सेंट्रल रेल्वे स्टेशनचे देखील बांधकाम केले. त्यावेळी या बांधकामाला 1.6 कोटी खर्च आला होता. 21 महिन्यांत काम पूर्ण केल्याबद्दल मुंबईच्या तत्कालीन राज्यपालांनी कंपनीचे कौतुक केले होते. 

पुढे शापूरजी मिस्त्री यांनी 1930 मध्ये त्यांचा कौटुंबिक व्यवसाय सुरू केला आणि त्याच वेळी त्यांनी दोराबजी टाटा यांच्याकडून टाटा समूहातील भागभांडवल विकत घेतले होते. त्यांनी टाटा समूहातील 18.5 टक्के हिस्सा खरेदी केला होता. मिस्त्री कुटुंब हे एकमेव कुटुंब आहे, ज्यात त्यांनी टाटा समूहात भागीदारी केली आहे. याशिवाय 66 टक्के हिस्सा टाटा समूहाच्या विविध ट्रस्टकडे आहे. सायरस मिस्त्री हे टाटा समूहाचे सहावे चेअरमन होते.

मिस्त्री कुटुंबाने 1936 मध्ये टाटा सन्समध्ये प्रवेश केला. टाटा कुटुंबाचे व्यावसायिक मित्र सेठ एडुलजी दिनशॉ यांनी टाटा सन्समध्ये 12.5 टक्के हिस्सा घेतला होता. 1936 मध्ये दिनशॉ यांच्या मृत्यूनंतर सायरस मिस्त्री यांचे आजोबा शापूरजी पालनजी मिस्त्री यांनी त्यांचे 12.5 टक्के ​​शेअर्स विकत घेतले. त्याच वर्षी जेआरडी टाटांची बहीण सायला आणि भाऊ दोराब यांनीही त्यांचे काही शेअर शापूरजींना विकले. यामुळे टाटा सन्समधील त्यांची हिस्सेदारी 17.5 टक्क्यांपर्यंत वाढली.

शापूरजींनंतर त्यांचा मुलगा पालनजी शापूरजी 1975 मध्ये टाटा सन्समध्ये रुजू झाले. 2005 मध्ये सायरस मिस्त्री टाटा सन्समध्ये संचालक म्हणून रुजू झाले. मिस्त्री कुटुंब आणि त्यांच्या कंपन्यांकडे सध्या टाटा सन्समध्ये 18.4 टक्के हिस्सा आहे. टाटा ट्रस्टनंतर टाटा सन्समध्ये ते दुसऱ्या क्रमांकाचे शेअरहोल्डर आहेत. टाटा सन्समध्ये टाटा ट्रस्टचा 66 टक्के हिस्सा आहे.

दरम्यान, या समूहाने मुंबईतील काही महत्वाच्या लँडमार्कचेही बांधकाम केले आहे. ज्यामध्ये रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया आणि ताजमहाल पॅलेस हॉटेलचा समावेश आहे. शापूरजी पालनजी समूह इंजिनिअरिंग, बांधकाम, पायाभूत सुविधा, रिअल इस्टेट, जल ऊर्जा आणि आर्थिक सेवा या 6 प्रमुख विभागांमध्ये कार्यरत आहे. या समूहात 18 मोठ्या कंपन्या आहेत. या समूहाचा व्यवसाय 50 हून अधिक देशांमध्ये पसरलेला असून सुमारे 50 हजार कर्मचारी समूहात कार्यरत आहेत.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

IPL 2025 बाबत मोठी अपडेट, 10 संघाची बीसीसीआयकडे मोठी मागणी, खेळाडूंना होणार फायदा
IPL 2025 बाबत मोठी अपडेट, 10 संघाची बीसीसीआयकडे मोठी मागणी, खेळाडूंना होणार फायदा
IND vs ZIM: ध्रुव जुरेल की जितेश शर्मा... संजू सॅमसनच्या जागी विकेटकीपर कोण?
IND vs ZIM: ध्रुव जुरेल की जितेश शर्मा... संजू सॅमसनच्या जागी विकेटकीपर कोण?
जिम्बाब्वे दौऱ्यासाठी टीम इंडिया रवाना, पाहा फोटो
जिम्बाब्वे दौऱ्यासाठी टीम इंडिया रवाना, पाहा फोटो
Photos: शाहिद कपूर ते युवराज सिंह... लग्नाआधी सानियाचं नाव कुणा कुणासोबत जोडलं?
Photos: शाहिद कपूर ते युवराज सिंह... लग्नाआधी सानियाचं नाव कुणा कुणासोबत जोडलं?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Top 25 : रात्रीच्या राज्यातील 25 बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट : 02 July 2024 : ABP MajhaVidhan Parishad Election Special Report : घेणार माघार की होणार घोडेबाजार? विधानपरिषदेत कुणाचा गेम?Milind Narvekar Special Report : Uddhav Thackeray यांचा शिलेदार मैदानात,मिलिंद नार्वेकर आमदार होणार?Ambadas Danve Suspension Special Report : शिवीगाळ, राजकारण ते निलंबन; दानवे-लाड प्रकरण काय?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
IPL 2025 बाबत मोठी अपडेट, 10 संघाची बीसीसीआयकडे मोठी मागणी, खेळाडूंना होणार फायदा
IPL 2025 बाबत मोठी अपडेट, 10 संघाची बीसीसीआयकडे मोठी मागणी, खेळाडूंना होणार फायदा
IND vs ZIM: ध्रुव जुरेल की जितेश शर्मा... संजू सॅमसनच्या जागी विकेटकीपर कोण?
IND vs ZIM: ध्रुव जुरेल की जितेश शर्मा... संजू सॅमसनच्या जागी विकेटकीपर कोण?
जिम्बाब्वे दौऱ्यासाठी टीम इंडिया रवाना, पाहा फोटो
जिम्बाब्वे दौऱ्यासाठी टीम इंडिया रवाना, पाहा फोटो
Photos: शाहिद कपूर ते युवराज सिंह... लग्नाआधी सानियाचं नाव कुणा कुणासोबत जोडलं?
Photos: शाहिद कपूर ते युवराज सिंह... लग्नाआधी सानियाचं नाव कुणा कुणासोबत जोडलं?
उत्पन्नची अट ते मुदतवाढ, लाडकी बहिण योजनेत महत्वाचे 7 मोठे बदल
उत्पन्नची अट ते मुदतवाढ, लाडकी बहिण योजनेत महत्वाचे 7 मोठे बदल
पुणे-सोलापूर महामार्गावर टायर फुटल्यानं भीषण अपघात, 4 जणांचा जागीच मृत्यू
पुणे-सोलापूर महामार्गावर टायर फुटल्यानं भीषण अपघात, 4 जणांचा जागीच मृत्यू
आषाढीसाठी पंढरी सज्ज, भंडीशेगावपासून पंढरपूरपर्यंत होणार आकर्षक विद्युत रोषणाई  
आषाढीसाठी पंढरी सज्ज, भंडीशेगावपासून पंढरपूरपर्यंत होणार आकर्षक विद्युत रोषणाई  
Pune Metro : धक्कादायक! पुणे मेट्रो स्थानकात सरकत्या जिन्यावरून उतरताना खाली पडून प्रवाशाचा मृत्यू
धक्कादायक! पुणे मेट्रो स्थानकात सरकत्या जिन्यावरून उतरताना खाली पडून प्रवाशाचा मृत्यू
Embed widget