FCI कडून 4.26 लाख टन गव्हाची विक्री, पिठाच्या किंमतीत घसरण होण्याची शक्यता
भारतीय अन्न महामंडळाने (FCI) ने 17 जानेवारीला 4.5 लाख टन गव्हाची (wheat) ऑनलाईन विक्री सुरु केली आहे. त्यापैकी 4.26 लाख टन म्हणजे सुमारे 95 टक्के गहू ई-लिलावाद्वारे विकला गेला.
FCI : भारतीय अन्न महामंडळाने (FCI) ने 17 जानेवारीला 4.5 लाख टन गव्हाची (wheat) ऑनलाईन विक्री सुरु केली आहे. त्यापैकी 4.26 लाख टन म्हणजे सुमारे 95 टक्के गहू ई-लिलावाद्वारे विकला गेला. 4.5 लाख टन गहू बाजारात आल्यानंतर पिठाच्या किंमतीत घसरण होण्याची शक्यता केंद्र सरकारला आहे. मात्र, महागाई नियंत्रणात आणण्यासाठी सरकारकडून सातत्याने ई-लिलावाद्वारे गव्हाची विक्री सुरू आहे. एफसीआयने ई-लिलावात गव्हाचे प्रमाण वाढवले असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे गव्हाचे प्रमाण 3 लाख टनांवरून 4 लाख टन झाले आहे.
17 जानेवारी रोजी एफसीआयच्या साप्ताहिक ई-लिलावात गव्हाची सरासरी विक्री किंमत 2,263.81 रुपये प्रति क्विंटल होती. तर गेल्या आठवड्यात ती 2,234.37 रुपये प्रति क्विंटल होती. त्याचप्रमाणे 13 डिसेंबरला गव्हाचा भाव 2,172.94 रुपये प्रतिक्विंटल होता.गेल्या लिलावात, एफसीआयने गव्हाचे प्रमाण 4.5 लाख टनांपर्यंत वाढवले, तरीही मागणी केवळ 95 टक्के आहे. प्रति बोलीदाराची कमाल मर्यादा देखील 250 टनांवरून 300 टन करण्यात आली आहे. यावरून असे दिसून येते की पुढचे पीक येईपर्यंत मागणी मजबूत राहील आणि सरकार कितीही गहू देईल. त्यामुळं 90 टक्क्यांहून अधिक विकला जाण्याची शक्यता आहे. अशा प्रकारे, उपलब्धता वाढवण्यासाठी FCI 28 जूनपासून खुल्या बाजारात गहू विकत आहे. आतापर्यंत 66.77 लाख टन गव्हाची विक्री झाली आहे.
कर्नाटकमध्ये गव्हाला सर्वाधिक भाव
17 जानेवारी रोजी एफसीआयच्या साप्ताहिक ई-लिलावात गव्हाची सरासरी विक्री किंमत 2,263.81 रुपये प्रति क्विंटल होती, तर गेल्या आठवड्यात ती 2,234.37 रुपये प्रति क्विंटल होती. त्याचप्रमाणे 13 डिसेंबरला गव्हाचा भाव 2,172.94 रुपये प्रतिक्विंटल होता. कर्नाटकमध्ये सर्वाधिक भाव 2,810 रुपये प्रति क्विंटल नोंदवले गेले आणि 30 टक्के गव्हाची उचल 2,750 रुपये प्रति क्विंटलपेक्षा जास्त झाली.
हरियाणाच्या गव्हाची गुणवत्ता
कर्नाटकातील एका विशिष्ट डेपोतून आणलेल्या गव्हाचा दर्जा बिस्किटांसाठी योग्य आहे. कारण ते धान्य पंजाब आणि हरियाणातील आहे. केवळ 3,500 टन गहू 2,760 ते 2,810 रुपये प्रति क्विंटल दरम्यान विकला गेला तर 8,550 टन गहू 2,125 ते 2,350 रुपये प्रति क्विंटल दरम्यान विकला गेला आहे.
उत्तर प्रदेशात सर्वाधिक बोली
सरकारने लिलावात गव्हाची राखीव किंमत सुमारे 2,129 रुपये प्रति क्विंटल ठेवली आहे. जी धान्याच्या आर्थिक किंमतीपेक्षा खूपच कमी आहे. जी आता 2,703 रुपये प्रति क्विंटल आहे. मागील लिलावात, उत्तर आणि पूर्वेकडील क्षेत्रांमध्ये सरासरी विक्री किंमत 2,275 रुपये प्रति क्विंटल या किमान आधारभूत किंमतीपेक्षा जास्त होती. तर इतर क्षेत्रांमध्ये किंमत 2,181 रुपये आणि 2,231 रुपये प्रति क्विंटल दरम्यान होती. उत्तर प्रदेश आणि पश्चिम बंगाल या दोन्ही राज्यांमध्ये सर्वाधिक बोली 2,625 रुपये, हरियाणामध्ये 2,530 रुपये, महाराष्ट्रात 2,465 रुपये, मध्य प्रदेश आणि गुजरातमध्ये 2,430 रुपये आणि राजस्थानमध्ये 2,375 रुपये प्रति क्विंटल होती.
महत्त्वाच्या बातम्या: