EPFO Facility : पीएफ खात्यातूनही विमा पॉलिसीचा हप्ता भरता येतो, काय आहे EPFO ची 'ही' सुविधा, जाणून घ्या
EPFO Facility : कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संस्थेच्या अनेक सुविधांपैकी एक म्हणजे तुम्ही तुमच्या विमा पॉलिसीचा प्रीमियम त्याद्वारे भरू शकता. त्याच्या अटी आणि नियमांबद्दल अधिक जाणून घ्या.
EPFO Facility : कर्मचारी भविष्य निर्वाह निधी (EPFO) ही एक संघटना आहे. या संघटनेने EPFO सदस्यांना आर्थिक गरज असल्यास त्यांच्या PF खात्यातून विमा प्रीमियम भरण्यासाठी ही सुविधा दिली आहे. या सुविधेचा वापर अत्यंत गरजेच्या वेळीच करा कारण भविष्य निर्वाह निधी खात्यातील पैसे हे तुमचे कष्टाचे पैसे आहेत आणि ते भविष्यासाठी जतन केले पाहिजेत.
LIC चा प्रीमियम भरला जाऊ शकतो
तुम्हाला हे माहित असले पाहिजे की EPFO ने त्यांच्या ग्राहकांना किंवा खातेदारांना ही सुविधा फक्त भारतीय जीवन विमा निगम (LIC) च्या पॉलिसीचा प्रीमियम भरण्यासाठी दिली आहे. इतर कोणत्याही कंपनीच्या विमा पॉलिसीसाठी तुम्ही या सुविधेचा लाभ घेऊ शकत नाही. या सुविधेचा प्रत्येक EPFO सदस्याला याचा लाभ मिळू शकत नाही. यासाठी पीएफ खातेधारकांना EPFO कडे फॉर्म 14 सबमिट करावा लागेल. हा फॉर्म तुम्हाला ईपीएफओच्या वेबसाईटवर मिळेल.
फॉर्म 14 चा नेमका संबंध काय?
पीएफ खातेदार EPFO ला त्याच्या LIC पॉलिसीचा प्रीमियम भरण्यास सांगू शकतो, जरी त्यापूर्वी त्याला फॉर्म 14 भरावा लागेल आणि सबमिट करावा लागेल. याद्वारे, जेव्हा तुमची LIC पॉलिसी आणि EPFO खाते लिंक केले जाईल, तेव्हा PF खात्यातून LIC पॉलिसीचा प्रीमियम कापला जाईल.
EPFO च्या कामाचे नियम जाणून घ्या
खरं तर, EPFO कडून LIC पॉलिसीचा प्रीमियम भरण्यासाठी एक अट अशी आहे की LIC च्या 2 वर्षांच्या प्रीमियमइतकी रक्कम तुमच्या PF खात्यात पडून आहे. यापेक्षा कमी रक्कम तुमच्या पीएफ खात्यात असेल तर तुम्ही या सुविधेचा लाभ घेऊ शकत नाही.
प्रीमियमच्या कपातीची वेळ काय असेल
जेव्हा तुमच्या अर्जावर प्रक्रिया केली जाईल तेव्हा LIC पॉलिसीचा प्रीमियम तुमच्या EPFO खात्यातून प्रीमियमच्या देय तारखेला किंवा त्यापूर्वी कापला जाईल.
महत्वाच्या बातम्या :
- Share Market : शेअर बाजारात विक्रीचा सपाटा, Sensex 800 अंकानी घसरला तर Nifty 17,400च्या खाली
- Tata Sons: टाटा सन्सचे प्रमुख एन चंद्रशेखरन यांना पाच वर्षांची मुदतवाढ; कार्यकारी मंडळाचा निर्णय
- Bank Strike : संप पुढे ढकलला; मार्चमध्ये 'या' तारखेला होणार संप, जाणून घ्या
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha