Share Market : शेअर बाजारात विक्रीचा सपाटा, Sensex 800 अंकानी घसरला तर Nifty 17,400च्या खाली
Share Market: आज जवळपास सर्वच क्षेत्रातील शेअर्समध्ये घसरण झाल्याचं दिसून आलं आहे. आयटी आणि रिअॅलिटी क्षेत्रामध्ये तर 2 टक्क्यांची घसरण झाली आहे.
Share Market: गुरुवारी शेअर बाजारामध्ये आलेल्या तेजीला आज लगाम बसल्याचं दिसून आलं आहे. आज शेअर मार्केट बंद होताना सेन्सेक्स 773.11 अंकांनी घसरला आहे तर निफ्टीही 231 अंकानी घसरला आहे. सेन्सेक्समध्ये 1.31 टक्क्यांची घसरण होऊन तो 58,152.92 वर पोहोचला आहे तर निफ्टीमध्ये 1.31 टक्क्यांची घसरण होऊन तो 17,374.80 वर पोहोचला आहे.
आज 896 कंपन्यांच्या शेअर्समध्ये वाढ झाली आहे तर 2318 शेअर्समध्ये घसरण झाली आहे. 105 कंपन्यांच्या शेअर्सच्या किंमतीत कोणताही बदल झाला नाही.
आज बाजार बंद होताना ऑटो, मेटल, उर्जा, ऑईल अॅन्ड गॅस, बँक आयटी, फार्मा आणि रिअॅलिटी अशा सर्वच सेक्टरच्या शेअर्सची विक्री झाल्याचं दिसून आलं आहे. BSE मिडकॅप आणि स्मॉलकॅपमध्येही 2 टक्क्यांची घसरण झाली आहे.
मंगळवारी शेअर बाजारात Grasim Industries, Tech Mahindra, Infosys, HCL Technologies आणि UPL या कंपन्यांच्या निफ्टीमध्ये मोठी घसरण झाली असून IOC, IndusInd Bank, NTPC, Tata Steel आणि ITC या कंपन्यांच्या निफ्टीमध्ये वाढ झाली आहे.
आठवड्यातील शेवटच्या दिवशी शेअर बाजाराच्या व्यवहाराची सुरुवात घसरणीने झाली. सकाळी बाजार सुरू होताच सेन्सेक्समध्ये 478 अंकानी घसरण होऊन तो 58443 अंकावर तर निफ्टी 143 अंकाच्या घसरणीसह 17462 अंकावर सुरू झाला.
अमेरिकेतल्या महागाईचा परिणाम
अमेरिकेतील महागाई ही विक्रमी टप्प्यावर पोहोचली असून त्याचा परिणाम तिथल्या शेअर बाजारावर झाला आहे. परिणामी भारतासह जगातल्या सर्वच शेअर बाजारात पडझड सुरू झाली.
या कंपन्यांचे शेअर्स वधारले
- IOC- 1.75 टक्के
- IndusInd Bank- 1.03 टक्के
- NTPC- 0.51 टक्के
- Tata Steel- 0.49 टक्के
- ITC- 0.09 टक्के
या कंपन्यांचे शेअर्स घसरले
- Grasim- 3.30 टक्के
- Tech Mahindra- 2.97 टक्के
- Infosys- 2.73 टक्के
- HCL Tech- 2.24 टक्के
- UPL- 2.19 टक्के
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha