एक्स्प्लोर

Bank Strike : संप पुढे ढकलला; मार्चमध्ये 'या' तारखेला होणार संप, जाणून घ्या

मिळालेल्या माहितीनुसार हा संप आता पुढील महिन्यात मार्चमध्ये होणार आहे.

Bank Strike : बँकांच्या खाजगीकरणाच्या निषेधार्थ, कर्मचारी आणि कामगार संघटनांनी फेब्रुवारी महिन्यात दोन दिवसांचा संप जाहीर केला होता, सेंट्रल ट्रेड युनियन (CTU)आणि इतर संघटनांनी 23 आणि 24 फेब्रुवारी रोजी बँक संपाची घोषणा केली होती, मात्र आता मिळालेल्या माहितीनुसार हा संप आता पुढील महिन्यात मार्चमध्ये होणार आहे. जाणून घ्या सविस्तर

 

हा संप आता पुढील महिन्यात मार्चमध्ये होणार
23 आणि 24 फेब्रुवारीला हा संप पुकारण्यात आला होता. मात्र आता यावर ताजे अपडेट असे आले आहे की, हा संप आता 28 आणि 29 मार्चपर्यंत पुढे ढकलण्यात आला आहे. या संपात देशभरातील सर्व बँकांचे कर्मचारी सहभागी होणार आहेत. ऑल इंडिया बँक एम्प्लॉईज असोसिएशन (AIBEA) च्या केंद्रीय समितीने या संपात सहभागी होण्याचा निर्णय घेतला आहे. सार्वजनिक क्षेत्रातील बँकांच्या खाजगीकरणाच्या सरकारच्या योजनेला विरोध करण्यासाठी बँक संघटनांनी गेल्या महिन्यात 16 आणि 17 डिसेंबर रोजी संप केला होता. त्यानंतर बँक संपाचा परिणाम एसबीआय, पीएनबी, सेंट्रल बँक आणि आरबीएल बँकेच्या कामकाजावर झाला. चेक क्लिअरन्स, फंड ट्रान्सफर, डेबिट कार्ड यासंबंधीचे कामही रखडले होते.

खासगीकरणाच्या विरोधात आंदोलनाची घोषणा

ऑल इंडिया बँक ऑफिसर्स कन्फेडरेशन (एआईबीओसी) ने सरकारी बँकांच्या खासगीकरणाच्या विरोधात आंदोलनाची घोषणा केली होती. हा संप देशातील सार्वजनिक क्षेत्रातील बँकांना वाचवण्यासाठी असल्याचे बँक कर्मचाऱ्यांच्या संघटनांनी म्हटले आहे. बँकांच्या खासगीकरणामुळे सर्वसामान्य नागरिकांच्या बँकिंग अधिकाराचे हनन होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. सार्वजनिक क्षेत्रातून बँक उद्योग गेल्यास याचा मोठा फटका सामान्य नागरिकांना अधिक बसणार आहे. या देशातील सामान्य नागरिकांचे बँकिंग अधिकार आणि त्याद्वारे आर्थिक विकासासाठी मिळणाऱ्या सोयी सवलती वाचवण्यासाठी असल्याचे बँक कर्मचाऱ्यांनी म्हटले आहे

विलनीकरण अथवा खासगीकरण करण्याचे सूतोवाच

अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी 1 फेब्रुवारी 2021 रोजी सादर केलेल्या अर्थसंकल्पात बँकांच्या खाजगीकरणाची घोषणा केली होती. आता सरकारने त्यादृष्टीने वेगाने तयारी सुरू केली आहे. याशिवाय सरकार या संसदेच्या हिवाळी अधिवेशनात बँकिंग कायदा दुरुस्ती विधेयक आणण्याच्या तयारीत असल्याचेही सांगण्यात येत आहे. केंद्र सरकार सार्वजनिक क्षेत्रातील काही मोजक्याच बँका ठेवणार आहे. इतर बँकांचे विलनीकरण अथवा खासगीकरण करण्याचे सूतोवाच याआधीच करण्यात आले आहे. बँकाच्या खासगीकरणाबाबत यूनायटेड फोरम ऑफ बँक यूनियनने (UFBU) संप पुकारला आहे. UFBU हा सरकारी बँकांच्या हे यूनियनचा संयुक्त मंच आहे. UFBU ने 23 आणि 24 फेब्रुवारीला संप पुकारणार आहे. या अगोदर यूनायटेड फोरम ऑफ बँक यूनियनने दोन सरकारी बँकांच्या खासगीकरणाच्या विरोधात 15 आणि 16 मार्च 2021  संप पुकारला होता. त्यानंतर 16 आणि 17 2021 डिसेंबरला बँकिंग कायदा अधिनियम 2021 च्या विरोधात संप पुकारला होता.

 

इतर महत्त्वाच्या बातम्या :

Coronavirus Cases Today : गेल्या 24 तासात देशात 71 हजार 365 कोरोना रुग्णांची नोंद, 1217 जणांचा मृत्यू

Covid19 : सावधान! सांडपाण्याच्या नमुन्यांमध्ये आढळले कोरोनाचे चार 'गुप्त' प्रकार, धोका वाढण्याची शक्यता

Hijab Controversy : आक्रमक जमावाला सामोरं जाणारी 'ती' युवती कोण? काय आहे कर्नाटक हिजाब प्रकरण?

 

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha

महत्त्वाच्या बातम्या

लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात 2000 रुपये जमा होणार, त्याआधी करावं लागणार 'हे' महत्वाचं काम, अन्यथा लाभापासून राहालं वंचित
लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात 2000 रुपये जमा होणार, त्याआधी करावं लागणार 'हे' महत्वाचं काम, अन्यथा लाभापासून राहालं वंचित
दुष्काळी परिस्थिती! सणासुदीच्या मुहूर्तावर ग्राहकांना मोठा फटका, डाळींच्या दरात मोठी वाढ, नेमकी किती झाली वाढ?
दुष्काळी परिस्थिती! सणासुदीच्या मुहूर्तावर ग्राहकांना मोठा फटका, डाळींच्या दरात मोठी वाढ, नेमकी किती झाली वाढ?
RBI चा नवीन नियम तुम्हाला माहित आहे का? क्रेडिट कार्डवर 500 तर कर्जावर 5000 रुपयांचा दंड, जाणून घ्या सविस्तर माहिती 
RBI चा नवीन नियम तुम्हाला माहित आहे का? क्रेडिट कार्डवर 500 तर कर्जावर 5000 रुपयांचा दंड, जाणून घ्या सविस्तर माहिती 
Gold Silver Rate : सलग दुसऱ्या दिवशी सोन्याच्या दरात वाढ; ओलांडला दीड लाखांचा टप्पा, तर चांदीचे दर घसरले, जाणून घ्या आजचे दर
सलग दुसऱ्या दिवशी सोन्याच्या दरात वाढ; ओलांडला दीड लाखांचा टप्पा, तर चांदीचे दर घसरले, जाणून घ्या आजचे दर

व्हिडीओ

Nana Patekar Funeral Full VIDEO : 'नटसम्राट' अनंतात विलीन.. डोणजे गावी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
Abhijeet Dipke on PM Modi : 'मोदींनी 'आणीबाणी'अधिकृत ठरवली', अभिजीत दिपकेंची टीका : ABP Majha
Eknath Shinde On Nana Patekar : एकनाथ आपल्याला मदत केली पाहिजे, नाना पाटेकरांशी ते बोलणं शेवटचं
Devendra Fadnavis on Nana Patekar Passes Away : भाऊ, मार्गदर्शक, मित्र हरपला; फडणवीस भावुक- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
Nana Patekar Passes Away : अभिनेते नाना पाटेकर यांचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Yugendra Pawar: आमची एकत्र येण्याची इच्छा असेल आणि समोरच्याची नसेल तर काय करावं? सोमेश्वर कारखान्याचा चेअरमन आमच्याशिवाय ठरणार नाही : युगेंद्र पवार
सोमेश्वरमध्ये तिरंगी लढत,आमच्या शिवाय कारखान्याचा चेअरमन ठरणार नाही: युगेंद्र पवार
मतचोरीबाबत राष्ट्रपतींना इंडिया आघाडीचं निवेदन, द्रौपदी मुर्मूंकडून आश्वासन; राहुल गांधी म्हणाले, आम्ही त्यांना सांगितलं
मतचोरीबाबत राष्ट्रपतींना इंडिया आघाडीचं निवेदन, द्रौपदी मुर्मूंकडून आश्वासन; राहुल गांधी म्हणाले, आम्ही त्यांना सांगितलं
यूपी बिहारमधून लहान मुलं पकडून आणतात, गोळी घालतात; भयमुक्त ठाणे म्हणत मोर्चा
यूपी-बिहारमधून लहान मुलं पकडून आणतात, गोळी घालतात; भयमुक्त ठाणे म्हणत मोर्चा, मविआ नेत्यांचे पोलिस आयुक्तांना निवेदन
Gokul Election: 'आम्ही आमदार खासदारांचे पुत्र नसल्याने डावलले' गोकुळला उमेदवारी नाकारल्याने भाजप जिल्हाध्यक्ष नाथाजी पाटलांची नाराजी
'आम्ही आमदार खासदारांचे पुत्र नसल्याने डावलले' गोकुळला उमेदवारी नाकारल्याने भाजप जिल्हाध्यक्ष नाथाजी पाटलांची नाराजी
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 09 ऑक्टोबर 2026 | शुक्रवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 09 ऑक्टोबर 2026 | शुक्रवार
मी नाराज असल्याचे वृत्त निराधार; शिवसेना पक्ष पहिल्या क्रमांकावर आणण्यासाठी काम करणार, कीर्तीकरांचे स्पष्टीकरण
मी नाराज असल्याचे वृत्त निराधार; शिवसेना पक्ष पहिल्या क्रमांकावर आणण्यासाठी काम करणार, कीर्तीकरांचे स्पष्टीकरण
Sai Paranjpye: ज्येष्ठ नाटककार, लेखिका आणि दिग्दर्शिका सई परांजपे यांना यंदाचा विष्णुदास भावे गौरव पदक पुरस्कार जाहीर
ज्येष्ठ नाटककार, लेखिका आणि दिग्दर्शिका सई परांजपे यांना यंदाचा विष्णुदास भावे गौरव पदक पुरस्कार जाहीर
Rohit Pawar: खोटे गुन्हे नोंदवायची एवढी हौस असेलच, तर विद्यार्थ्यांवरील गुन्हे रद्द करून माझ्यावर गुन्हे नोंद करा, रोहित पवार यांचं पुणे पोलिसांना आव्हान
पुणे पोलीस आयुक्त साहेब, किती खोटे बोलणार? किती खोट्या FIR करणार? रोहित पवार यांचा सवाल
Embed widget