(Source: ECI/ABP News/ABP Majha)
E-Shram Card : बोगस E-Shram कार्ड बनविणाऱ्या वेबसाईट्सना दणका, नोंदणी करताना 'ही' काळजी घ्या
Fake E-Shram Card : या पोर्टलचा लाभ घेऊन 23 कोटींहून अधिक लोकांनी या पोर्टलवर आपली नोंदणी केली आहे. या योजनेचा फायदा पाहता फसवणूक करणारेही चांगलेच सक्रिय झाले आहेत.
Duplicate e-Shram Card : कोरोना महामारी सुरू झाल्यापासून देशातील कामगारांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला आहे. लॉकडाऊनमुळे लाखो लोकांच्या नोकऱ्या गेल्या आणि असंघटित क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांना घराकडे जावे लागले. अशा परिस्थितीत या क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांसाठी सरकारने अनेक योजना सुरू केल्या आहेत. जेणेकरून लोकांना आर्थिक मदत मिळावी. ई-श्रम पोर्टल (e-Shram Card) ही योजना त्यापैकीच एक आहे. या पोर्टलच्या माध्यमातून असंघटित क्षेत्रात काम करणाऱ्या कामगारांना अनेक सुविधा मिळतात.
e-Shram Card योजनेचा लाभ घेऊन आतापर्यंत 23 कोटींहून अधिक लोकांनी या पोर्टलवर नोंदणी केली आहे. या योजनेचे फायदे पाहता फसवणूक करणारे लोक देखील सक्रिय झाले आहेत. बनावट ई-श्रम वेबसाईटद्वारे बनावट ई-श्रम कार्ड बनवून ते लोकांची फसवणूक करत आहेत. गेल्या काही दिवसांत अशी अनेक प्रकरणे समोर आली आहेत. अशा परिस्थितीत पीआयबीने (PRESS INFORMATION BUREAU) लोकांना अशा बनावट वेबसाईट्सपासून सावध राहण्यास सांगितले आहे. पीआयबीने आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवरून ट्विट करत म्हटले आहे की, 'ई-श्रमच्या अधिकृत पोर्टलची कॉपी करणाऱ्या बनावट वेबसाईट्सपासून सावध रहा.'
ई-श्रम के आधिकारिक पोर्टल की नकल करने वाली फर्जी वेबसाइट्स से सावधान रहें
— पीआईबी हिंदी (@PIBHindi) February 16, 2022
इस #PIBFacTree पर नजर डालें और ई-श्रम पोर्टल के बारे में अधिक जानकारी पाएं
🔗https://t.co/b0YDm4LYa8@LabourMinistry pic.twitter.com/cJlkIdoiSy
नोंदणी करताना 'ही' काळजी घ्या :
ई-श्रम पोर्टलवर नोंदणी करताना काही गोष्टींची काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे. जसे की, नोंदणी केवळ ई-श्रमच्या अधिकृत वेबसाईटवरच केली पाहिजे. त्याची अधिकृत वेबसाईट https://eshram.gov.in/ आहे.
याबरोबरच ई-श्रम पोर्टलवर नोंदणी करताना सरकार कोणतेही पैसे आकारत नाही. तुम्ही ऑफलाईन कॉमन सर्व्हिस सेंटरवर जाऊनही नोंदणी करू शकता.
महत्वाच्या बातम्या :
- Gold Rate Today : सोन्या-चांदीच्या दरात किरकोळ घसरण, जाणून घ्या आजच्या किंमती
- SBI FD Interest Rates 2022 : ग्राहकांसाठी खुशखबर; आता 'एफडी'वर मिळणार अधिक व्याजदर, जाणून घ्या किती...
- Petrol-Diesel Price : सलग 105 दिवस दिलासादायक! देशात पेट्रोल-डिझेल स्थिर; तुमच्या शहरांत दर काय?
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha