Gold Rate Today : सोन्या-चांदीच्या दरात किरकोळ घसरण, जाणून घ्या आजच्या किंमती
Gold Price Update : सोन्याच्या किंमतीने पुन्हा 50,000 चा टप्पा ओलांडला आहे. एका वर्षाच्या उच्च पातळीच्या जवळ आला आहे.जाणून घ्या आज सोन्या-चांदीचे दर काय आहेत.
Gold Rate Today : गेल्या काही दिवसांपासून सोने आणि चांदीच्या दरात सातत्याने वाढ होताना दिसत आहे. मात्र,आज सोन्या-चांदीच्या दरात काहीशी घसरण झालेली आहे.आजचे सोन्या - चांदीचे दर नेमके काय आहेत ते जाणून घ्या.
MCX वर सोन्याचे दर :
मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर (MCX)सोन्या- चांदीच्या दरात आज काहीशी घसरण झालेली आहे.एप्रिल डिलीव्हरीसाठी सोन्याचा दर 254 रूपयांनी किंवा 0.50 टक्क्यांनी घसरला आहे.यामध्ये आज सोन्याचा दर 50,138 रुपये प्रति 10 ग्रॅम असा झाला आहे.
MCX वर चांदीचा दर :
अनेक दिवसांपासून चांदीच्या दरात सलग वाढ होताना दिसत होती. परंतु, आज मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर (MCX) चांदीचा दरसुद्धा काही प्रमाणात घसरला आहे. एप्रिल डिलीव्हरीसाठी चांदीचा दर 215 रुपयांनी किंवा 0.34 टक्क्यांनी घसरला आहे.चांदी मार्च फ्युचर्स 63,646 रुपये प्रति किलो या भावाने व्यवहार होत आहेत.
तुमच्या शहराचे दर तपासा :
तुम्ही घरी बसूनही सोन्याची किंमत तपासू शकता. इंडियन बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशनच्या मते, तुम्ही 8955664433 या क्रमांकावर मिस कॉल देऊन किंमत तपासू शकता. तुम्ही ज्या नंबरवरून मेसेज कराल त्याच नंबरवर तुम्हाला मेसेज येईल.
अशा पद्धतीने चेक करू शकता सोन्याची शुद्धता :
जर तुम्हाला सोन्याची शुद्धता चेक करायची असल्यास यासाठी सरकारतर्फे एका अॅपची सुविधा करण्यात आली आहे. ‘BIS Care app’ या अॅपच्या माध्यमातून तुम्ही सोन्याची (Gold) शुद्धता (Purity) चेक करू शकता. इतकेच नाही, तर या अॅपच्या माध्यमातून तुम्ही संबंधित कोणतीही तक्रारदेखील नोंदवू शकता.
महत्वाच्या बातम्या :
- SBI FD Interest Rates 2022 : ग्राहकांसाठी खुशखबर; आता 'एफडी'वर मिळणार अधिक व्याजदर, जाणून घ्या किती...
- Petrol-Diesel Price : सलग 105 दिवस दिलासादायक! देशात पेट्रोल-डिझेल स्थिर; तुमच्या शहरांत दर काय?
- Online Fraud : फक्त एक कोड अन् बँक खातं पूर्ण रिकामं; SBI चा इशारा, वाचा पूर्ण अहवाल
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha