SBI FD Interest Rates 2022 : ग्राहकांसाठी खुशखबर; आता 'एफडी'वर मिळणार अधिक व्याजदर, जाणून घ्या किती...
SBI FD Interest Rates 2022 : भारतातील सार्वजनिक क्षेत्रातील सर्वात मोठी बँक असेल्या स्टेट बँकेच्या खातेदारांसाठी आनंदाची बातमी आहे.
SBI FD Interest Rates 2022 : भारतातील सार्वजनिक क्षेत्रातील सर्वात मोठी बँक असेल्या स्टेट बँकेच्या खातेदारांसाठी आनंदाची बातमी आहे. आता गुंतवणूकदारांना स्टेट बँक ऑफ इंडियाच्या मुदत ठेवीवर (FD) अधिक लाभ मिळणार आहे. स्टेट बँकेने आपल्या ठराविक एफडीवरील व्याजदर वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. एसबीआयच्या वेबसाइटवर उपलब्ध असलेल्या माहितीनुसार, 2 ते 3 वर्षांपेक्षा कमी मुदत ठेवींवरील व्याज दर 5.20 टक्क्यांनी वाढवण्यात आला आहे. तसेच 3 ते 5 वर्षांपेक्षा कमी मुदत ठेवींवरील व्याज दर 5.45 टक्क्यांनी वाढवण्यात आला आहे. तर 5 वर्षे आणि 10 वर्षांपर्यंतच्या मुदत ठेवींवरील व्याजदरात बँकेने 5.50 टक्क्यांची वाढ केली आहे. हे नवीन व्याजदर 2 कोटी रुपयांपेक्षा कमी किमतीच्या मुदत ठेवींसाठी लागू करण्यात आले आहेत.
2 कोटी रुपयांपेक्षा कमी मुदत ठेवींवरील सुधारित व्याजदर (15 फेब्रुवारी 2022 पासून)
- 7 दिवस ते 14 दिवस: सामान्य लोकांसाठी - 2.90 टक्के; ज्येष्ठ नागरिकांसाठी - 3.40 टक्के
- 15 दिवस ते 29 दिवस: सामान्य लोकांसाठी - 2.90 टक्के; ज्येष्ठ नागरिकांसाठी - 3.40 टक्के
- 30 दिवस ते 45 दिवस: सामान्य लोकांसाठी - 2.90 टक्के; ज्येष्ठ नागरिकांसाठी - 3.40 टक्के
- 46 दिवस ते 60 दिवस: सामान्य लोकांसाठी - 3.90 टक्के; ज्येष्ठ नागरिकांसाठी - 4.40 टक्के
- 61 दिवस ते 90 दिवस: सामान्य लोकांसाठी - 3.90 टक्के; ज्येष्ठ नागरिकांसाठी - 4.40 टक्के
- 91 दिवस ते 120 दिवस: सामान्य लोकांसाठी - 3.90 टक्के; ज्येष्ठ नागरिकांसाठी - 4.40 टक्के
- 6 महिने 1 दिवस ते 9 महिने: सामान्य लोकांसाठी - 4.40 टक्के; ज्येष्ठ नागरिकांसाठी - 4.90 टक्के
- 9 महिने 1 दिवस ते एका वर्षापेक्षा कमी : सामान्य लोकांसाठी - 4.40 टक्के; ज्येष्ठ नागरिकांसाठी - 4.90 टक्के
- 1 वर्ष: सामान्य लोकांसाठी - 4.40 टक्के ; ज्येष्ठ नागरिकांसाठी - 4.90 टक्के
- 1 वर्ष 1 दिवस ते 2 वर्षे: सामान्य लोकांसाठी - 4.40 टक्के; ज्येष्ठ नागरिकांसाठी - 4.90 टक्के
- 2 वर्षे 1 दिवस ते 3 वर्षे: सामान्य लोकांसाठी - 5.20 टक्के; ज्येष्ठ नागरिकांसाठी - 5.70 टक्के
- 3 वर्षे 1 दिवस ते 5 वर्षे: सामान्य लोकांसाठी - 5.45 टक्के; ज्येष्ठ नागरिकांसाठी - 5.95 टक्के
- 5 वर्षे 1 दिवस ते 10 वर्षे: सामान्य लोकांसाठी - 5.50 टक्के; ज्येष्ठ नागरिकांसाठी - 6.30 टक्के
बँकेच्या वेबसाइटनुसार, सुधारित व्याजदर 15 फेब्रुवारीपासून लागू होतील. दरम्यान, अल्प मुदतीच्या ठेवींवरील व्याजदरात कोणताही बदल करण्यात आलेला नाही. 1 ते 2 वर्षांचा कालावधीसाठी ग्राहकांना 5.10 टक्के व्याजदर मिळणार आहे. तसेच एसबीआयच्या 'आरडी'वर ग्राहकांना एक 1 ते 2 वर्षांपेक्षा कमी कालावधीसाठी 5.1 टक्के व्याज मिळेल.
एसबीआय बँकेचे 'आरडी'वरील व्याजदर (15 फेब्रुवारी 2022 लागू)
1 वर्ष ते 2 वर्षांपेक्षा कमी मदत - 5.1 टक्के
2 वर्षे ते 3 वर्षांपेक्षा कमी मदत - 5.2 टक्के
3 वर्षे ते 5 वर्षांपेक्षा कमी मदत - 5.45 टक्के