दिल्लीतील सर्वात श्रीमंत व्यक्ती कोण? अंबानी-अदानी यांच्यानंतर 'या' व्यक्तीकडे सर्वाधिक संपत्ती
मुकेश अंबानी हे आशिया आणि भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आहेत. तर गौतम अदानी दुसऱ्या क्रमांकावर आहे. या दोघानंतर श्रीमंत व्यक्ती कोण? त्या व्यक्तीबद्दलची माहिती आपण पाहणार आहोत.
![दिल्लीतील सर्वात श्रीमंत व्यक्ती कोण? अंबानी-अदानी यांच्यानंतर 'या' व्यक्तीकडे सर्वाधिक संपत्ती Delhi Richest Man shiv nadar is richest person in delhi after mukesh ambani and gautam adani they have most wealth दिल्लीतील सर्वात श्रीमंत व्यक्ती कोण? अंबानी-अदानी यांच्यानंतर 'या' व्यक्तीकडे सर्वाधिक संपत्ती](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/2/2017/10/06132546/shiv-nadar-compressed.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Delhi Richest Man: मुकेश अंबानी हे आशिया आणि भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आहेत. त्यांची एकूण संपत्ती 92 अब्ज डॉलर आहे. तर गौतम अदानी दुसऱ्या क्रमांकावर आहे. या दोघानंतर शिव नाडर हे भारतातील तिसऱ्या क्रमांकाचे श्रीमंत व्यक्ती आहेत. तसेच ते दिल्लीतील सर्वांत श्रीमंत व्यक्ती आहेत. अलीकडेच, फोर्ब्सने भारतातील 100 श्रीमंत व्यक्तींची नावांची यादी जाहीर केली होती.
2023 मध्ये भारत आणि आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीत मुकेश अंबानी अग्रस्थानी आहेत. तर फोर्ब्सच्या यादीत गौतम अदानी दुसऱ्या क्रमांकावर आहे. 2022 मध्ये गौतम अदानी हे भारत आणि आशियातील दुसऱ्या क्रमांकाचे श्रीमंत व्यक्ती होते. जानेवारी 2023 मध्ये हिंडेनबर्गचा अहवाल समोर आल्यानंतर, त्याच्या संपत्तीत झपाट्याने घट झाली आणि ते भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीत दुसऱ्या स्थानावर घसरले. आता त्यांच्याकडे एकूण 68 अब्ज डॉलर्सची संपत्ती आहे. पण देशाची राजधानी नवी दिल्लीतील सर्वात श्रीमंत व्यक्तीबद्दल तुम्हाला माहिती आहे का? त्यांचे नाव शिव नाडर आहे. जाणून घेऊयात त्यांच्याबद्दल सविस्तर माहिती.
जगातील अब्जाधीशांच्या यादीत शिव नाडर 55 व्या क्रमांकावर
शिव नाडर हे केवळ दिल्लीतील सर्वात श्रीमंत व्यक्ती नाही तर भारतातील तिसरा श्रीमंत व्यक्ती आहे. तसेच, ते जगातील अब्जाधीशांच्या यादीत 55 व्या क्रमांकावर आहेत. अब्जाधीश शिव नाडर यांच्याकडे 28.9 अब्ज डॉलर्सची संपत्ती आहे. फोर्ब्सच्या रिपोर्टनुसार ते दिल्लीचे रहिवासी आहेत. अब्जाधीश शिव नाडर यांचे प्राथमिक शिक्षण तामिळ भाषेत झाले आहे. त्यांना 22 वर्षे इंग्रजी नीट बोलता येत नव्हते. शिव नाडर यांनी पीएसजी कॉलेज ऑफ टेक्नॉलॉजीमधून कला आणि विज्ञान विषयांमध्ये पदवी घेतली आहे.
व्यवसायाचा प्रवास कसा सुरू झाला?
भारतीय आयटी क्षेत्रातील दिग्गज शिव नाडर यांनी कॅल्क्युलेटर आणि मायक्रोप्रोसेसर बनवण्यासाठी पाच मित्रांसह 1976 मध्ये गॅरेजमध्ये एचसीएलची स्थापना केली. आज त्याच्याकडे 12.6 बिलियन डॉलरची कमाई असलेली कंपनी आहे. आधुनिक काळात, ही कंपनी भारतातील सर्वात मोठ्या सेवा पुरवठादारांपैकी एक आहे. जुलै 2020 मध्ये, त्यांनी HCL टेक्नॉलॉजीजच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आणि ते पद त्यांची मुलगी रोशनी नादर मल्होत्रा यांच्याकडे सोपवले. आता ते एमेरिटस चेअरमन आणि सल्लागार आहेत.
शिव नाडर दातृत्वाच्या बाबतीत अग्रेसर
फोर्ब्सच्या मते, एचसीएल टेक्नॉलॉजीज जगभरातील 60 देशांमध्ये 225,000 पेक्षा जास्त लोकांना रोजगार देते. नाडर यांनी त्यांच्या शिव नाडर फाउंडेशनला 1.1 अब्ज डॉलर्स दान केले आहेत. हे फाउंडेशन शिक्षणाशी संबंधित कामांना मदत करते.
महत्त्वाच्या बातम्या:
Mukesh Ambani Reliance AGM : मुकेश अंबानी यांची मोठी घोषणा; रिलायन्स समूह आता इतर विमा कंपन्यांना आता तगडं आव्हान देण्याच्या तयारीत
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)