Mukesh Ambani Reliance AGM : मुकेश अंबानी यांची मोठी घोषणा; रिलायन्स समूह आता इतर विमा कंपन्यांना आता तगडं आव्हान देण्याच्या तयारीत
Jio Financial Services: रिलायन्स समूहाची जिओ फायानान्शिअल सर्व्हिसेस आता विमा क्षेत्रात प्रवेश करणार आहे. मुकेश अंबानी यांनी त्याबाबतची घोषणा केली.
![Mukesh Ambani Reliance AGM : मुकेश अंबानी यांची मोठी घोषणा; रिलायन्स समूह आता इतर विमा कंपन्यांना आता तगडं आव्हान देण्याच्या तयारीत Jio Financial Services to enter insurance secto to offer life health general cover announced by Mukesh Ambani in Reliance AGM Mukesh Ambani Reliance AGM : मुकेश अंबानी यांची मोठी घोषणा; रिलायन्स समूह आता इतर विमा कंपन्यांना आता तगडं आव्हान देण्याच्या तयारीत](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/08/28/71bb8eafb580f8d39c62876aee29d7421693221297715290_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
मुंबई : काही दिवसांपूर्वी रिलायन्स इंडस्ट्रीजमधून डिमर्जर झालेल्या जिओ फायानान्शिअल सर्व्हिसेसच्या ( Jio Financial Services) पुढील वाटचालीबाबत रिलायन्सचे सर्वेसर्वा मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांनी मोठी घोषणा केली आहे. जिओ फायनान्शिअल सर्व्हिसेस आता आयुर्विमा, आरोग्य आणि इतर विमा क्षेत्रात उतरणार असल्याचे रिलायन्से अध्यक्ष मुकेश अंबानी यांनी म्हटले. आज रिलायन्स इंडस्ट्रीचची सर्वसाधारण सभा पार (Reliance AGM) पडली. त्यावेळी मुकेश अंबानी यांनी अनेक महत्त्वाच्या घोषणा केल्या.
जिओ फायनान्शिअल सर्व्हिसेस ही स्मार्ट, आयुर्विमा, आरोग्य आणि इतर विमा सेवा डिजीटल इंटरफेसद्वारे ग्राहकांना ऑफर करणार आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवरील दिग्गज कंपन्यांसोबत यासाठी भागिदारी केली जाणार असल्याचे मुकेश अंबानी यांनी म्हटले.
JFS आपल्या भागीदारांसोबत विमा क्षेत्रातील नवीन योजना तयार करण्यासाठी आणि ग्राहकांच्या गरजा अनोख्या पद्धतीने पूर्ण करण्यासाठी डेटा विश्लेषणाचा वापर करणार असल्याचे ही मुकेश अंबानी यांनी म्हटले.
दरम्यान, मुकेश अंबानींनी जियो एअर फायबरबाबत मोठी घोषणा केली आहे. जियोच्या एअर फायबरची प्रतीक्षा संपली आहे. गणेश चतुर्थी म्हणजेच, 19 सप्टेंबर रोजी लॉन्च होणार आहे. Jio Air Fiber 5G नेटवर्क आणि अत्याधुनिक वायरलेस तंत्रज्ञान वापरून घर आणि कार्यालयांना वायरलेस ब्रॉडबँड सेवा प्रदान करेल. जियो एअर फायबरच्या लँडिंगमुळे दूरसंचार क्षेत्रात उलथापालथ होण्याचीही शक्यता आहे.
भागिदारीत नवीन उपक्रम करणार
मुकेश अंबानी यांनी सांगितले की, डिजीटल-फर्स्ट अॅप्रोचसह जिओच्या वित्तीय सेवेचा विस्तार करण्यात येणार आहे. जिओ फायनान्शिअल सर्व्हिसेसने 'ब्लॅकरॉक'सोबत संयुक्त उपक्रम स्थापन करण्याची घोषणा याआधीच केली आहे. या भागीदारीतून मालमत्ता व्यवस्थापन (Asset Mangment Company) कंपनी सुरू केली जाईल. BlackRock ही जगातील सर्वात मोठी मालमत्ता व्यवस्थापन कंपनी (AMC) आहे. ही कंपनी 11 ट्रिलियन डॉलर्सपेक्षा जास्त मालमत्तेचे व्यवस्थापन करते. AMC मध्ये कंपनीचे मोठे नाव असून आतापर्यंतची कामगिरी उत्कृष्ट आहे.
जिओसाठी 1 लाख कोटी रुपयांच्या गुंतवणुकीचं लक्ष्य
रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष मुकेश अंबानी म्हणाले की, जिओसाठी 1 लाख कोटी रुपयांच्या गुंतवणुकीचं लक्ष्य आहे. Jio हे नवीन भारताच्या डिजिटल परिवर्तनाचं प्रतीक आहे आणि त्यानं आपल्या ध्येयाकडे मोठी पावलं उचलली आहेत. Jio 5G चं रोलआउट जगातील कोणत्याही कंपनीद्वारे सर्वात वेगवान 5G रोलआउट आहे.
डिसेंबरपर्यंत देशभरात 5G रोलआऊट होणार
Jio 5G ऑक्टोबरच्या अखेरीस रोलआऊट सुरू होईल आणि डिसेंबर 2023 पर्यंत ते देशभरात आणलं जाईल. जिओची देशात 85 टक्के 5G सेवा आहे, ही एक मोठी उपलब्धी आहे.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)