Share Market : शेअर बाजारातील घसरण सुरूच; Sensex 388 तर Nifty 144 अंकांनी घसरला
Share Market : आयटी, मेटल, रिअॅलिटी, ऑईल अॅन्ड गॅस आणि कॅपिटल गूड्सच्या शेअर्समध्ये 1 ते 3 टक्क्यांची घसरण झाली आहे.
मुंबई: सलग दुसऱ्या सत्रात शेअर बाजारात घसरण झाल्याचं दिसून आलं आहे. आज शेअर बाजार बंद होताना सेन्सेक्स 388 अंकांनी घसरला आहे तर निफ्टीही 144 अंकानी घसरला आहे. सेन्सेक्समध्ये 0.66 टक्क्यांची घसरण होऊन तो 58,576 वर पोहोचला आहे तर निफ्टीमध्ये 0.82 टक्क्यांची घसरण होऊन तो 17,530 वर पोहोचला आहे.
आज 1146 कंपन्यांच्या शेअर्समध्ये वाढ झाली आहे तर 2193 शेअर्समध्ये घसरण झाली आहे. 90 कंपन्यांच्या शेअर्सच्या किंमतीत कोणताही बदल झाला नाही.
आज बाजार बंद होताना बँकिंग क्षेत्र सोडलं तर ऑटो, मेटल, उर्जा, ऑईल अॅन्ड गॅस,आयटी, फार्मा आणि रिअॅलिटी सेक्टरसह सर्वच शेअर्समध्ये 1 ते 3 टक्क्यांची घसरण झाल्याचं दिसून आलं आहे. BSE मिडकॅप आणि स्मॉलकॅपमध्येही एक टक्क्यांची घसरण झाली आहे.
मंगळवारी शेअर बाजारात Hindalco Industries, Coal India, Grasim Industries, Tata Motors आणि Tata Steel या कंपन्यांच्या निफ्टीमध्ये मोठी घसरण झाली असून Axis Bank, Kotak Mahindra Bank, Power Grid Corporation, SBI Life Insurance आणि Maruti Suzuki या कंपन्यांच्या निफ्टीमध्ये वाढ झाली आहे.
या कंपन्यांचे शेअर्स वधारले
- Axis Bank- 1.58 टक्के
- Kotak Mahindra- 1.03 टक्के
- Power Grid Corp- 0.95 टक्के
- Maruti Suzuki- 0.70 टक्के
- SBI Life Insura- 0.58 टक्के
या कंपन्यांचे शेअर्स घसरले
- Hindalco- 5.90 टक्के
- Coal India- 5.30 टक्के
- Grasim- 3.55 टक्के
- Tata Motors - 3.04 टक्के
- Tata Steel- 2.77 टक्के
महत्त्वाच्या बातम्या:
- LIC Jeevan Labh Plan : 'या' योजनेमध्ये मिळेल 20 लाख रुपयांचा परतावा, एका पॉलिसीमध्ये नगण्य फायदे, वाचा सविस्तर
- Gold Rate Today : सोन्याच्या दरात किंचित घट; तर चांदी एक हजारांनी महाग, काय आहेत ताजे दर
- Gold Purchasing Report : भारतात मध्यमवर्गीय कुटुंबांकडून सर्वाधिक सोने खरेदी! एका रिपोर्टमधून बाब समोर