Gold Rate Today : सोन्याच्या दरात किंचित घट; तर चांदी एक हजारांनी महाग, काय आहेत ताजे दर
Gold Rate Today : आज 24 कॅरेट सोन्याचा दर 53,020 वर पोहोचला आहे. इतर शहरातील ताजे दर काय आहेत ते जाणून घ्या.
![Gold Rate Today : सोन्याच्या दरात किंचित घट; तर चांदी एक हजारांनी महाग, काय आहेत ताजे दर Gold rate today gold and silver price in on 12 april 2022 gold and silver price hike today Gold Rate Today : सोन्याच्या दरात किंचित घट; तर चांदी एक हजारांनी महाग, काय आहेत ताजे दर](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/04/04/593ead76260f67400ba75c27cf4f704b_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Gold Rate Today : रशिया-युक्रेनमधील युद्ध 50 दिवस होत आले तरीही अजून सुरुच आहे. या युद्धामुळे आंतरराष्ट्रीय तसेच भारतीय बाजारपेठेत सोन्या-चांदीच्या दरात काहीशी तफावत दिसून येते. मागच्या दोन आठवड्यात सोन्या-चांदीच्या दरात सातत्याने घट दिसून येत होती. गुड रिटर्न्सच्या वेबसाईटनुसार 24 कॅरेट सोन्याचा दर 53,020 वर पोहोचला आहे. तर चांदीचा दर 68,100 झाला आहे. इतर शहरातील ताजे दर काय आहेत ते जाणून घ्या.
शहर | दर |
मुंबई | 48,600 |
पुणे | 48,700 |
नागपूर | 48,700 |
दिल्ली | 49,000 |
कोलकाता | 49,000 |
चेन्नई | 49,100 |
तुमच्या शहराचे दर तपासा :
तुम्ही घरी बसूनही सोन्याची किंमत तपासू शकता. इंडियन बुलियन अॅंड ज्वेलर्स असोसिएशनच्या मते, तुम्ही 8955664433 या क्रमांकावर मिस कॉल देऊन किंमत तपासू शकता. तुम्ही ज्या नंबरवरून मेसेज कराल त्याच नंबरवर तुम्हाला मेसेज येईल.
खरेदी करण्यापूर्वी सोन्याची शुद्धता तपासा :
तुम्ही सोने खरेदी करत असाल तर त्यापूर्वी त्याची शुद्धता नक्कीच तपासा. BIS CARE APP द्वारे तुम्ही कोणत्याही हॉलमार्क केलेल्या दागिन्यांची शुद्धता सहज तपासू शकता. यासाठी तुम्ही दागिन्यांचा HUID क्रमांक 'verify HUID' द्वारे तपासू शकता. याबरोबरच तुम्ही ISI मार्कने कोणत्याही वस्तूची शुद्धता देखील तपासू शकता.
महत्वाच्या बातम्या :
- Gold Purchasing Report : भारतात मध्यमवर्गीय कुटुंबांकडून सर्वाधिक सोने खरेदी! एका रिपोर्टमधून बाब समोर
- Share Market : शेअर बाजारात नफा वसुली सुरूच; सेन्सेक्समध्ये 400 अंकांची घसरण
- मृत व्यक्तीच्या पश्चात पॅनकार्ड आणि आधार कार्डचे काय करावं? जाणून घ्या नियम
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह | ABP Majha
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)