(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Gold Purchasing Report : भारतात मध्यमवर्गीय कुटुंबांकडून सर्वाधिक सोने खरेदी! एका रिपोर्टमधून बाब समोर
Gold Purchasing Report : इंडिया गोल्ड पॉलिसी सेंटर (IGPC) च्या गोल्ड मार्केट-2022 च्या अहवालात ही बाब समोर आली आहे. जाणून घ्या आणखी काय म्हटलंय अहवालात?
Gold Purchasing Report : भारतात सर्वाधिक सोने खरेदी मध्यम उत्पन्न गटातील नागरिक करतात. एका अहवालात ही बाब समोर आली आहे. इंडिया गोल्ड पॉलिसी सेंटर (IGPC) च्या गोल्ड मार्केट-2022 च्या अहवालात असंही म्हटलंय की, उच्च उत्पन्न गटातील नागरिक सोने डिजिटल किंवा 'कागदी स्वरूपात' (कागदपत्रांच्या स्वरूपात) ठेवण्यास पसंती देतात. जाणून घ्या आणखी काय म्हटलंय अहवालात?
'या' वार्षिक उत्पन्नाच्या श्रेणीतील कुटुंबांमध्ये सोन्याचा सर्वाधिक वापर
भारतातील मध्यम उत्पन्न गटातील बहुतेक जणांकडून सोने खरेदी केले जाते. 2-10 लाख रुपयांच्या वार्षिक उत्पन्नाच्या श्रेणीतील कुटुंबांमध्ये सोन्याचा सर्वाधिक वापर होतो, जे सरासरी रकमेच्या 56 टक्के आहे, असे अहवालात म्हटले आहे
विविध उत्पन्न गटांची ही निवड
अहवालात असं म्हटलंय की, मध्यमवर्गीय सुरक्षित गुंतवणुकीला प्राधान्य देतात, म्हणजेच सोने, सुरक्षित सरकारी उत्पादने जसे की बँक मुदत ठेवी, भविष्य निर्वाह निधी, जीवन विमा, पोस्ट ऑफिस बचत, जेथे धोका सर्वात कमी आहे, असे अहवालात म्हटले आहे. तर 10 लाखांपेक्षा जास्त वार्षिक उत्पन्न असलेल्या उच्च-मध्यम आणि श्रीमंत वर्गासाठी, बचत ही त्यांची अतिरिक्त कमाई आहे, अतिरिक्त पैसा निष्क्रिय आहे आणि भांडवली नफ्यावर कमाई आहे. त्यामुळे ते स्टॉक किंवा शेअर्स, डेरिव्हेटिव्ह्ज आणि रिअल इस्टेटमध्ये गुंतवणूक करण्यास प्राधान्य देतात.
नोटाबंदीचा सोन्याच्या खरेदीवर परिणाम झालानाही
भारताच्या ग्राहक अर्थव्यवस्थेवर पीपल रिसर्च (PRICE) च्या सहकार्याने IGPC ने केलेल्या सर्वेक्षणाद्वारे घरगुती सोने खरेदी अहवाल तयार करण्यात आला. 40,000 घरांमध्ये हे सर्वेक्षण करण्यात आले. नोटाबंदी किंवा जीएसटी (वस्तू आणि सेवा कर) लागू झाल्यामुळे सोन्याच्या वापरावर परिणाम झाला नाही, असे अहवालात पुढे आले आहे.
त्यात म्हटले आहे की, गेल्या पाच वर्षांत किमान 74 टक्के उच्च उत्पन्न असलेल्या कुटुंबांनी सोने खरेदी केल्याचे समोर आले आहे.
43% भारतीय कुटुंबे लग्नासाठी सोने खरेदी करतात
या अहवालात असेही आढळून आले आहे की, सोने हे उत्सवाचे प्रतीक आहे, लग्न आणि सणांमध्ये दागिन्यांच्या खरेदीत 65-70 टक्के वाटा असतो, अहवालात असंही म्हटलंय की, सुमारे 43 टक्के भारतीय कुटुंबे लग्नासाठी सोने खरेदी करतात, तर 31 टक्के घरे कोणत्याही विशेष प्रसंगाशिवाय सोने खरेदी करतात.
हे IGPC चे मूल्यांकन आहे
आयजीपीसीचे अध्यक्ष अरविंद सहाय म्हणाले, “सोने श्रीमंतांसाठी असते या सर्वसाधारण मानसिकतेच्या विरुद्ध असल्याचे आढळून आले आहे, सर्वेक्षणात असे दिसून आले आहे की, मध्यम उत्पन्न कुटुंबे मूल्य आणि प्रमाणानुसार सर्वाधिक सोने विकत घेतात.