LIC Jeevan Labh Plan : 'या' योजनेमध्ये मिळेल 20 लाख रुपयांचा परतावा, एका पॉलिसीमध्ये नगण्य फायदे, वाचा सविस्तर
LIC Jeevan Labh Plan : देशातील सर्वात मोठी विमा कंपनी LIC कंपनीच्या LIC जीवन लाभ पॉलिसीमध्ये तुम्ही 20 लाख रुपयांपर्यंतचा परतावा मिळवू शकता.
LIC Jeevan Labh Plan : देशातील सर्वात मोठी विमा कंपनी LIC कंपनीच्या अनेक चांगल्या विमा योजना आहेत. यामध्ये LIC जीवन लाभ पॉलिसीचाही (LIC Jeevan Labh Policy) समावेश आहे. ही एक एंडॉवमेंट पॉलिसी आहे. या पॉलिसीमध्ये पॉलिसीधारकांना विमा संरक्षण तसेच बचतीचा लाभ मिळतो. LIC कंपनीने फेब्रुवारी 2020 मध्ये ही पॉलिसी लाँच केली. ही एक नॉन-लिंक्ड, वैयक्तिक, जीवन विमा बचत योजना आहे. या योजनेमध्ये पॉलिसीधारकांना संरक्षण तसेच बचती संदर्भात अनेक आकर्षक फायदे मिळतील.
योजनेचा लाभ काय?
एलआयसी जीवन लाभ पॉलिसीमध्ये गुंतवणूक करणाऱ्या पॉलिसीधारकाला मॅच्युरिटीनंतर एकरकमी रक्कम दिली जाते. दरम्यान, पॉलिसीधारकाचा मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबाला आर्थिक मदत मिळेल. एलआयसीच्या या योजनेत गुंतवणूक करणाऱ्या व्यक्तीही कर्ज घेऊ शकतात.
गुंतवणुकीचा कालावधी
कोणतीही व्यक्ती या योजनेत 16 वर्षे, 21 वर्षे आणि 25 वर्षांच्या मॅच्युरिटी कालावधीसह गुंतवणूक करू शकते. प्रीमियम भरण्याची मुदत 10 वर्षे, 15 वर्षे आणि 16 वर्षे आहे. या योजनेत गुंतवणूक करण्यासाठी प्रीमियम पेमेंट मासिक, त्रैमासिक, सहामाही आणि वार्षिक आधारावर केले जाऊ शकते.
अशा प्रकारे मिळतील 20 लाख रुपये
जर एखाद्या व्यक्तीने 20 लाख रुपयांच्या विमा रकमेसह LIC जीवन लाभ पॉलिसी घेतली, तर त्याला या पॉलिसीमध्ये दरमहा करासह 7,916 रुपये (दररोज सुमारे 262 रुपये) गुंतवावे लागतील. हा प्रीमियम 16 वर्षांसाठी (प्रिमियम पेमेंट टर्म) भरावा लागेल. तसेच, तुम्हाला मॅच्युअरिटीसाठी 25 वर्षांचा कालावधी निवडावा लागेल. या पॉलिसीमध्ये गुंतवणूक करून, तुम्हाला मॅच्युरिटीवर 20 लाख रुपयांची हमी मिळू शकते. ही पॉलिसी मॅच्युरिटीपर्यंत ठेवल्यास तुम्हाला दोन बोनस मिळू शकतात. बोनस मिळाल्यावर, तुम्हाला एकूण 37 लाख रुपये मिळतील.
कोणत्या वयात करू शकता गुंतवणूक?
आठ वर्षे ते 59 वर्षे वयोगटातील कोणतीही व्यक्ती या पॉलिसीमध्ये गुंतवणूक करू शकते. तुम्ही या पॉलिसीमध्ये किमान 2 लाख रुपयांच्या विमा रकमेसाठी गुंतवणूक करू शकता. मात्र, यासाठी कोणतीही कमाल मर्यादा निश्चित केलेली नाही. या योजनेतील गुंतवणुकीवर तुम्हाला आयकरातही सूट मिळेल.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
- Deoghar Ropeway Accident : झारखंडमध्ये रोपवे अपघातात आतापर्यंत 32 जणांना वाचवण्यात यश, 3 जणांचा मृत्यू, सकाळी पुन्हा बचावकार्याला सुरुवात
- Viral : पॅंगाँग तलावात घुसवली कार, व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांचा संताप, कारवाईची मागणी
- Viral Video : धक्कादायक! इमर्जन्सी लँडिंग दरम्यान विमानाचे दोन तुकडे, तुम्ही व्हिडीओ पाहिला का?
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha