एक्स्प्लोर

डिजिटल युगात का मागितला जातो CANCELLED CHEQUE? जाणून घ्या सविस्तर माहिती

डिजिलट जमान्यातही कॅन्सल चेक का मागितला जातो? असा प्रश्न सर्वांनाच पडतो.

Cancelled Cheque : डिजिटलच्या युगात स्मार्टफोनवरुन एका सेंकदात एका बँक खात्यावरुन दुसऱ्या बँक खात्यावर पैसे ट्रान्सफर होतात. बँकिंगच्या (Banking) निगडित सर्व कामं ऑनलाइन होत आहेत. त्यासाठी बँकेत जाण्याची अथवा रांगेत उभं राहण्याची गरज नाही. त्यामुळे बँकेत जाणेही कमी झाले आहे. पण डिजिटलायजेशनमुळे झालेल्या बदलानंतरही कॅन्सल चेकची (Cancelled Cheque) परंपरा कायम आहे. आजही बँक अथवा विमा कंपन्या आपल्या ग्राहकांकडून कॅन्सिल चेक मागतात. अनेक कंपन्या नवीन कर्मचाऱ्यांकडूनही कॅन्सल चेक मागतात. त्यामुळे डिजिलट जमान्यातही कॅन्सल चेक का मागितला जातो? असा प्रश्न सर्वांनाच पडतो. (Utility News In Marathi)

 कॅन्सल चेकची गरज काय?
 जेव्हा तुम्ही एखाद्याला कॅन्सल चेक देता, तेव्हा त्यावर सही करण्याची गरज नाही. फक्त चेकवर कॅन्सल लिहावं लागतं. त्यानंतर चेकवर तिरकी रेष ओढावी लागते. ग्राहकाच्या अथवा कर्मचाऱ्यांचं बँक खाते व्हेरिफाय करण्यासाठी कॅन्सल चेक घेतला जातो.  

चेकवर काय असते माहिती? 
कॅन्सल चेक देण्याचा अर्थ बँकमध्ये तुमचं खातं आहे. चेकवर तुमचं नाव असेल किंवा नसेलही. कारण, चेकवर तुमच्या खात्याचा नंबर लिहिलेला असतो. त्यासोबतच बँकेच्या ब्रांचचा आयएफसी (IFSC) कोडही लिहिलेला असतो. त्यावरुन बँक अथवा कंपन्या तुमचं खात व्हेरियफाय करते. कारण, कॅन्सल चेकवर तुमच्या खात्याची डिटेल्स माहिती असते. त्यामुळे बँकेचा कॅन्सल चेक कुणालाही देऊ नका...  

कॅन्सल चेकवरुन पैसे निघतात का? 
कॅन्सल चेकद्वारे कुणीही तुमच्या खात्यावरुन पैसे काढू शकत नाही. कॅन्सल चेकचा वापर फक्त तुमचं खातं व्हेरिफाय करण्यासाठी होतो. जेव्हा कुणाला कॅन्सल चेक दिला जातो, त्यावर Cancelled लिहिलेलं असतं. कॅन्सल चेकचा चुकीचा वापर करु नये, त्यासाठी Cancelled लिहिलेलं असतं.  

कॅन्सल चेकची गरज का? 
जेव्हा आर्थिक काम करत असतो तेव्हा कॅन्सल चेकची गरज भासते. कार लोन, होम लोन अथवा पर्सनल लोन घेण्यासाठी गेल्यानंतर तुमच्याकडे कॅन्सल चेक मागितला जातो. पीएफ खात्यामधून ऑनलाइन पैसे काढत असाल तरिही कॅन्सल चेकची गरज भासते. म्यूचुअल फंडमध्ये गुंतवणूक करत असताना कंपनी तुम्हाला कॅन्सल चेक मागते. कॅन्सल चेकसाठी नेहमी ब्लॅक अशता ब्लू इंक असलेल्या पेनाचा वापर करावा. दुसऱ्या कोणत्याही रंगाच्या पेनाचा वापर कॅन्सल चेकसाठी नाही. 

कॅन्सल चेकची गरज केव्हा लागते ? - 
बॅकेकडून लोन घेताना
ईपीएफमधून पैसे काढण्यासाठी
डीमॅट खाते उघडण्यासाठी  
बँकमध्ये केवायसी कराण्यासाठी.
विमा खरेदी करण्यासाठी
आएमआय भरण्यासाठी
म्यूचुअल फंडमध्ये गुंतणूक करण्यासाठी

आणखी वाचा :
Utility News : एकापेक्षा जास्त Saving Account असणं फायद्याचं, कसं ते जाणून घ्या?
PPF खात्यामुळे व्हाल कोट्यधीश, निवृत्तीनंतर 2.26 कोटी मिळवण्यासाठी सरकारी योजनेत करा गुंतवणूक 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

आरसीबीला धक्का, आयपीएलमधून मॅक्सवेलनं घेतला ब्रेक, दुसऱ्या संघासोबत केला करार
आरसीबीला धक्का, आयपीएलमधून मॅक्सवेलनं घेतला ब्रेक, दुसऱ्या संघासोबत केला करार
''ज्यांना लेकीत अन् सुनेत अंतर वाटते, त्यांना...''; मुख्यमंत्री शिंदेंचा शरद पवारांवर थेट हल्लाबोल
''ज्यांना लेकीत अन् सुनेत अंतर वाटते, त्यांना...''; मुख्यमंत्री शिंदेंचा शरद पवारांवर थेट हल्लाबोल
ABP Majha Top 10 Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 एप्रिल 2024 | गुरुवार
ABP Majha Top 10 Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 एप्रिल 2024 | गुरुवार
T20 World Cup : टी 20 विश्वचषकासाठी 10 जणांची नावं निश्चित, पंत-पांड्याचं काय होणार?
T20 World Cup : टी 20 विश्वचषकासाठी 10 जणांची नावं निश्चित, पंत-पांड्याचं काय होणार?
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

Jitendra Awhad Tondi Pariksha : राष्ट्रवादीतून फुटून गेलेल सर्वजण पाकीटमार, दरोडेखोर:जितेंद्र आव्हाडABP Majha Headlines : 07 PM : 18 April 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सMaharashtra Superfast News : सुपरफास्ट बातम्यांचा वेगवान आढावा एका क्लिकवर : 18 April 2024Maharashtra Superfast News : सुपरफास्ट बातम्यांचा वेगवान आढावा एका क्लिकवर : 18 April 2024

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
आरसीबीला धक्का, आयपीएलमधून मॅक्सवेलनं घेतला ब्रेक, दुसऱ्या संघासोबत केला करार
आरसीबीला धक्का, आयपीएलमधून मॅक्सवेलनं घेतला ब्रेक, दुसऱ्या संघासोबत केला करार
''ज्यांना लेकीत अन् सुनेत अंतर वाटते, त्यांना...''; मुख्यमंत्री शिंदेंचा शरद पवारांवर थेट हल्लाबोल
''ज्यांना लेकीत अन् सुनेत अंतर वाटते, त्यांना...''; मुख्यमंत्री शिंदेंचा शरद पवारांवर थेट हल्लाबोल
ABP Majha Top 10 Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 एप्रिल 2024 | गुरुवार
ABP Majha Top 10 Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 एप्रिल 2024 | गुरुवार
T20 World Cup : टी 20 विश्वचषकासाठी 10 जणांची नावं निश्चित, पंत-पांड्याचं काय होणार?
T20 World Cup : टी 20 विश्वचषकासाठी 10 जणांची नावं निश्चित, पंत-पांड्याचं काय होणार?
दाऊद अन् छोटा शकील बेरोजगार झाल्याने एकनाथ खडसेंना धमक्या देताहेत, त्यांना झेड सिक्युरिटी द्या; नाथाभाऊंना चंद्रकांत पाटलांचा टोमणा
दाऊद अन् छोटा शकील बेरोजगार झाल्याने एकनाथ खडसेंना धमक्या देताहेत, त्यांना झेड सिक्युरिटी द्या; नाथाभाऊंना चंद्रकांत पाटलांचा टोमणा
Raksha Khadse : नाथाभाऊनंतर आता रोहिणी खडसेंनाही भाजपमध्ये घेणार; रक्षा खडसेंचं मोठं वक्तव्य
नाथाभाऊनंतर आता रोहिणी खडसेंनाही भाजपमध्ये घेणार; रक्षा खडसेंचं मोठं वक्तव्य
बुमराह, सूर्या की रोहित, अर्शदीप, कुणाला कॅप्टन कराल? PBKS vs MI सामन्यात मालामाल करणारे 11 खेळाडू 
बुमराह, सूर्या की रोहित, अर्शदीप, कुणाला कॅप्टन कराल? PBKS vs MI सामन्यात मालामाल करणारे 11 खेळाडू 
Dubai floods : दुबईची तुंबई का झाली; कृत्रिम पाऊस अंगलट आला की हवामान बदलाने दणका दिला? नेमकं काय घडलं??
दुबईची तुंबई का झाली; कृत्रिम पाऊस अंगलट आला की हवामान बदलाने दणका दिला? नेमकं काय घडलं??
Embed widget