Budget 2021: ज्येष्ठ नागरिकांची आयकर परतावा भरण्याच्या कटकटीतून सुटका, पण..
Budget 2021 Income Tax Rates in India FY 2021-22: अर्थमंत्री निर्मला सीतारमण 2021-22 या आर्थिक वर्षासाठी लोकसभेत अर्थसंकल्प सादर करीत आहेत. अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी आरोग्य क्षेत्रासाठी कोरोना संसर्गासह इतर अनेक गंभीर आजारांना सामोरे जाण्यासाठी मोठी घोषणा केली आहे. आपल्या बजेट भाषणादरम्यान निर्मला सीतारमण यांनी आरोग्य क्षेत्रासाठी मोठ्या घोषणा केल्या आहेत.
नवी दिल्ली : अर्थमंत्री निर्मला सीतारमण 2021-22 चा अर्थसंकल्प लोकसभेत मांडत आहेत. देशावर कोरोनाचे संकट असताना हा अर्थसंकल्प सादर केला जात असल्याचे अर्थमंत्री सीतारमण यांनी सांगितले. कोरोना काळात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गरिबांना गॅस आणि रेशन पुरवले. निर्मला सीतारमण म्हणाल्या की कोरोना कालावधीत आम्ही पाच मिनी बजेट सादर केली होती. तसेच, सरकारने आत्मनिर्भर पॅकेज जाहीर केले. तर कोरोना कालावधीत आरबीआयने 21 लाख कोटींचे पॅकेज जाहीर केले होते.
कोरोना कालावधीत सरकारने दिलेलं आत्मनिर्भर पॅकेज हे जीडीपीच्या 13% असल्याचे अर्थमंत्र्यांनी सांगितले. कोरोना संकट काळात अर्थव्यवस्थेला मजबूत करण्याचे आव्हान होते. अर्थव्यवस्था सुधारण्यासाठी आपत्तीत संधी शोधण्याची गरज आहे. अर्थमंत्री म्हणाले, "ऑस्ट्रेलियात टीम इंडियाने ज्याप्रमाणे कमाल केली तशी अर्थव्यवस्थेला चालना देण्याचा प्रयत्न असल्याचे अर्थमंत्री म्हणाले.
Budget 2021: अर्थसंकल्पाचे सादरीकरण सुरु.... या आहेत महत्वाच्या तरतूदी
या अर्थसंकल्पात ज्येष्ठ नागरिकांची आयकर परतावा भरण्याच्या कटकटीतून सुटका करण्यात आली आहे. ज्येष्ठ नागरिकांना (75 वर्षे वयापेक्षा जास्त) फक्त टॅक्स रिटन फाईल करण्यापासून मुक्ती मिळालीय. त्यातही ज्यांना पेन्शन आणि ठेवीवरील व्याजातून उत्पन्न मिळतं तेच फक्त. ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या स्लॅबनुसार टॅक्स भरावे लागतील पण रिटर्न फाईल करण्याची गरज नाही.
अर्थमंत्र्यांच्या अर्थसंकल्पीय भाषणामध्ये पहिल्या एका तासात मोठ्या घोषणा, कोणास काय मिळाले?
कोरोना महामारीमुळे अचानक नवीन आव्हानं उभी राहिली. आर्थिक मंदीबाबत विचार केला नव्हता. कोरोनामुळे जगभरात आर्थिक व्यवस्थेला फटका बसला आहे. मात्र, आपल्यकडे वेळेत लॉकडाऊन केल्यामुळे जास्त लोकांचे मृत्यू झाले नाहीत. या काळात 80 कोटी लोकांना रेशन वाटण्यात आले. तर शेतकऱ्यांच्या खात्यात थेट पैसे पाठवण्यात आले. कोरोना काळात घरापर्यतं दूध आणि रेशन पोहचवण्यात आले. कोरोना काळात काम करणाऱ्या योद्द्यांना अभिवादन, या काळात कर्तव्य करणाऱ्या सर्वांना सलाम करत असल्याचे अर्थमंत्री म्हणाले. खासदार आणि आमदारांनी कोरोना काळात आपले मानधन दिले.
Budget 2021 : विधानसभा निवडणुका असलेल्या राज्यांवर योजनांची खैरात, महाराष्ट्रासाठी काय?
कोरोना काळात केंद्र सरकारने आत्मनिर्भर भारत पॅकेजची घोषणा केली. याच कालवधीतृ पाच मिनी बजट सादर करण्यात आले. तर आरबीआयने 27 लाख कोटी रुपयाचं पॅकेजची घोषणा केली. सरकारने दिलेलं आत्मनिर्भर पॅकेज हे जीडीपीच्या 13% आहे. पीएम गरीब कल्याण योजना या काळात सुरु करण्यात आली. आता देशात लस उपलब्ध आहे. आणखी दोन लस उपलब्ध होण्याची शक्यता आहे. ऑस्ट्रेलियात टीम इंडियाने कमाल केली. त्याप्रमाणे अर्थव्यवस्थेला चालना देण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. कोरोनामुळे अर्थव्यवस्थेळा मोठा फटका बसला. आजारांना थोपवणे हे बजेटचे लक्ष्य आहे. आत्मनिर्भर भारत योजना 130 कोटी भारतीयांच्या आशेचं प्रतीक आहे.