Budget 2021 | एका क्लिकवर पाहा 2021च्या अर्थसंकल्पातील 21 महत्त्वाचे मुद्दे
Union Budget 2021 full detail सुरुवातीपासून शेवटपर्यंत काय होते अर्थसंकल्पातील मह्त्वाचे मुद्दे, कोणत्या वाटेनं होणार देशाची आर्थिक वाटचाल... एका क्लिकवर सर्व माहिती
Union Budget 2021 full detail देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी सोमवारी म्हणजेच 1 फेब्रुवारी 2021ला केंद्रीय अर्थसंकल्प सादर केला. यंदाच्या वर्षी सादर करण्यात आलेल्या अर्थसंकल्पामघ्ये सहा महत्त्वाच्या मुद्द्यांवर विशेष लक्ष देण्यात आलं. कोरोना काळात सरकारने आरोग्य आणि आरोग्यविषयक क्षेत्रासाठी मोठी घोषणा केली. आरोग्य क्षेत्रासाठी 2 लाख 38 कोटींची तरतूद करण्यात आली आहे. तर, रेल्वेसाठीही 1.07 लाख कोटींची घोषणा करण्यात आली. याव्यतिरिक्तही अर्थमंत्र्यांनी काही महत्त्वाच्या मुद्द्यांवर जोर दिला. चला तर मग नजर टाकूया 2021 मध्ये सादर करण्यात आलेल्या अर्थसंकल्पातील 21 महत्त्वाच्या मुद्द्यांवर...
- आरोग्य क्षेत्रासाठी भरीव निधी देण्यात आला असून तो 137 % इतका वाढला आहे.
- एप्रिल महिन्यापासून सुरु होणाऱ्या नव्या आर्थिक वर्षामध्ये कोरोना लसीसाठी 35 हजार कोटींची तरतूद.
- देशात कोरोनावर मात करण्यासाठी सध्या 2 लसी उपलब्ध आहेत. पुढील दिवसांमध्ये आणखी दोन लसी वापरात आणल्या जाणार आहेत.
- भांडवली खर्च 5.54 लाख कोटी रुपये इतका करण्यात आला आहे. चालू आर्थिक वर्षामध्ये ही मर्यादा 4.39 लाख कोटी रुपये इतकी होती.
- चालू आर्थिक वर्षासाठी वित्तीय तूट 9.5 टक्के राहण्याचा अंदाज. जो, आर्थिक अहवालाच्या अंदाजे 3.5 टक्क्यांहून अधिक आहे.
- पुढील आर्थिक वर्षासाठी वित्तीय तूट 6.8 टक्के राहण्याचा अंदाज आहे. सरकार तब्बल 12 लाख कोटी रुपयांचं कर्ज घेणार आहे.
- 2025-26 पर्यंत सरकार वित्तीय तूट 4.5 टक्क्यांच्याही खाली आणण्याच्या प्रयत्नांत.
- 75 वर्षांहून अधिक वय असणाऱ्यांना आयटीआर भरणं अनिवार्य नाही.
- आयकर प्रकरणं पुन्हा सुरु करण्याचा कालावधी कमी करत 3 वर्षांवर आणण्यात आला. गंभीर प्रकरणांमध्ये हा कालावधी 10 वर्षांचा आहे.
- आयकर भरणाऱ्यांची संख्या 2020 मध्ये वाढून 6.48 कोटींवर पोहोचली आहे. 2014 मध्ये ही संख्या 3.31 कोटी इतकी होती.
- सोनं, चांदी आणि मिश्रधातूवर कृषी अधिभार 2.5 टक्के
- काबुली चण्यांवर 30 टक्के, मटारवर 10 टक्के, बंगाल चणे 50 टक्के, मसूर 20 टक्के, कापूस 5 टक्के इतक्या प्रमाणात कृशी अधिभार. पेट्रोल आणि डिझेलवरही कृषी अधिभार.
- नवे कृषी अधिभार 2 फेब्रुवारीपासून लागू होणार.
- स्टार्टअप उद्योगांसाठी कर सवलत. प्रवासी मजदूरांना अधिसूचित स्वस्त घरांसाठी करात सवलत.
- स्वस्त घरासाठी व्याजदरावर 1.5 लाख रुपयांची सवलत एका वर्षासाठी वाढवण्यात आली.
Budget 2021 | अर्थसंकल्पाचे सोन्या-चांदीच्या दरावर परिणाम; जाणून घ्या सध्याचे दर
- डिजिटल पद्धतीनं जास्तीत जास्त काम करणाऱ्या कंपन्यांसाठी कर ऑडिट सवलत द्विगुणित करत 10 कोटी रुपये करण्यात आली आहे.
- सीमा शुल्कात जुन्या 400 सवलतींच्या समीक्षेचा प्रस्ताव. ऑक्टोबर 2021 पर्यंत यावर विचारविनिमय.
- वाहनांची साधनं, त्यामधील उपकरणं, त्यांचे भाग यांच्यावरील सीमा शुल्कात वाढ.
- विमा कंपन्यांमध्ये FDI ला 49 टक्के वाढवून 74 टक्के करण्याची तरतूद.
- पुढील वर्षी सार्वजनिक क्षेत्रांतील बँकांसाठी 20 हजार कोटी रुपयांच्या निधीची तरतूद.