(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Budget 2021 | अर्थसंकल्पाचे सोन्या-चांदीच्या दरावर परिणाम; जाणून घ्या सध्याचे दर
तिथं अर्थसंकल्प सादर होत असतानाच शेअर बाजारा आणि सोन्या चांदीच्या दरांतही हालचाल पाहायला मिळाली. अर्थसंकल्प सादर झाला आणि अवघ्या काही क्षणांनंतरच मल्टी कमॉडिटी एक्सचेंजमध्ये सोन्याच्या दरात घसरण दिसून आली.
Budget 2021 केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी 2021-22 या आर्थिक वर्षासाठीचा आर्थसंकल्प सादर केला. तिथं अर्थसंकल्प सादर होत असतानाच शेअर बाजारा आणि सोन्या चांदीच्या दरांतही हालचाल पाहायला मिळाली. तिथं देशाचा अर्थसंकल्प सादर झाला आणि अवघ्या काही क्षणांनंतरच मल्टी कमॉडिटी एक्सचेंजमध्ये सोन्याच्या दरात 1200 रुपयांची घसरण झाल्याची बाब निदर्शनास आली.
केंद्रीय अर्थसंकल्पामध्ये सोनं आणि चांदीच्या आयात शुल्कात 2.5 टक्क्यांनी घट करण्याच्या निर्णयाची घोषणा होताच त्याचे परिणाम सोन्या- चांदीच्या दरात दिसून आले. मुख्य म्हणजे मागील काही दिवसांपासून खिसा रिकामं करणारं हेच सोनं आता मात्र काहीशा कमी दरात खरेदी करता येईल याचा आनंद ग्राहकांमध्ये आहे. तर, दरांमध्ये घट झाल्यास किमान खरेदीदारांचा आकडा वाढेल त्यामुळं सराफा बाजारांमध्येही असंच काहीसं वातावरण पाहायला मिळत आहे.
Video | सौभाग्याची मंगल घटिका! मिताली- सिद्धार्थच्या विवाहसोहळ्याचा टीझर व्हायरल
सोमवारी सोन्याच्या दरात 1200 रुपयांची घट झाल्यामुळं हे दर 48 हजारांच्या घरात दिसले. पण, चांदीच्या दरात मात्र वाढ झाली. त्यामुळं प्रतिकिलो चांदीसाठी 72 हजारांहूनही अधिकचे पैसे मोजावे लागल्याचं चित्रं होतं. अर्थसंकल्प सादर होण्यापूर्वी मात्र या दरांचा चढता आलेख पाहायला मिळाला होता.
सोनं, चांदी, पोलादी वस्तू, तांब्याच्या वस्तू या गोष्टी स्वस्त होण्याची चिन्हं यंदाचा अर्थसंकल्प दर्शवत आहे. असं असलं तरीही वाढीव दरामुळं काही गोष्टी सर्वसामान्यांना घाम फोडणार असंच चित्र आहे. महागणाऱ्या या वस्तूंमध्ये मोबाईल फोन, फोनचे विविध भाग, चार्जर, वाहनांचे स्पेअर भाग, इम्पोर्टेड कपडे, वीजेच्या उपकरणांचा समावेश आहे.