![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
ज्येष्ठ नागरिकांसाठी खुशखबर! 'या' 5 बँकांमध्ये FD करा, भरघोस व्याजदर मिळवा
सध्या, खासगी क्षेत्रातील अनेक बँका ज्येष्ठ नागरिकांच्या एफडीवर उत्कृष्ट व्याजदर देत आहेत. ज्येष्ठ नागरिकांना तीन वर्षांच्या एफडीवर 8.1 टक्क्यांपर्यंत व्याज दिले जात आहे.
![ज्येष्ठ नागरिकांसाठी खुशखबर! 'या' 5 बँकांमध्ये FD करा, भरघोस व्याजदर मिळवा Bank FD News 5 Banks are giving high interest to senior citizens on up to 3 year fds ज्येष्ठ नागरिकांसाठी खुशखबर! 'या' 5 बँकांमध्ये FD करा, भरघोस व्याजदर मिळवा](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/01/02/2e211b2004a00d8c9f1bc520c17c6688170419615096578_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
FD Interest Rate: वृद्धावस्थेत, FD (फिक्स्ड डिपॉझिट) वरुन मिळणारे व्याज हे ज्येष्ठ नागरिकांसाठी महत्त्वाचे उत्पन्न असते. अशा ज्येष्ठ नागरिकांना FD वर जितके जास्त व्याज मिळते तितकाच त्यांना फायदा होतो. सध्या, खासगी क्षेत्रातील अनेक बँका ज्येष्ठ नागरिकांच्या एफडीवर उत्कृष्ट व्याजदर देत आहेत. ज्येष्ठ नागरिकांना तीन वर्षांच्या एफडीवर 8.1 टक्क्यांपर्यंत व्याज दिले जात आहे. हा व्याजदर 2 कोटी रुपयांपेक्षा कमी एफडीवर दिले जात आहे. कोणत्या खासगी बँकांमध्ये ज्येष्ठ नागरिकांच्या FD वर 8.1 टक्के व्याज दिले जात आहे ते जाणून घेऊयात.
1) DCB बँक
DCB बँक ज्येष्ठ नागरिकांना FD वर 8.1 टक्के व्याज देत आहे. हे व्याज 26 महिने ते 37 महिन्यांच्या मुदतीच्या FD वर दिले जात आहे. अशा प्रकारे पाहिल्यास, या FD मधील तुमचे पैसे 8.8 वर्षांत दुप्पट होतील.
2) RBL बँक
RBL बँक ज्येष्ठ नागरिकांना FD वर 8 टक्के व्याज देत आहे. हे व्याज ज्येष्ठ नागरिकांना 24 महिने ते 36 महिन्यांच्या कालावधीसाठी केलेल्या एफडीवर दिले जात आहे. RBL बँकेत तुमची FD रक्कम दुप्पट होण्यासाठी 9 वर्षे लागतील.
3) इंडसइंड बँक ज्येष्ठ नागरिक एफडी दर
इंडसइंड बँक ज्येष्ठ नागरिकांच्या एफडीवर 8 टक्के व्याज देत आहे. हा व्याजदर 2 वर्षे 9 महिने ते 3 वर्षे 3 महिन्यांच्या कालावधीसाठी FD वर दिला जात आहे. अशा प्रकारे, जर तुम्ही इंडसइंड बँकेत ज्येष्ठ नागरिकाची एफडी केली तर तुमचे पैसे 9 वर्षांत दुप्पट होतील.
4) IDFC बँक ज्येष्ठ नागरिक FD दर
IDFC बँक ज्येष्ठ नागरिक FD वर 7.75 टक्के व्याज देत आहे. ही ऑफर 2 वर्ष, 1 दिवस ते 3 वर्षांपर्यंतच्या FD वर दिली जात आहे. जर तुम्ही या FD मध्ये पैसे गुंतवले तर तुमचे पैसे दुप्पट होण्यासाठी 9.2 वर्षे लागतील.
5- ICICI बँक ज्येष्ठ नागरिक FD दर
तुम्ही ICICI बँकेत ज्येष्ठ नागरिकांची FD देखील करू शकता. येथे तुम्हाला 7.5 टक्के व्याजदर दिला जात आहे. हा दर 2 वर्षे, 1 दिवस ते 3 वर्षांच्या कालावधीत परिपक्व होणाऱ्या FD वर दिला जात आहे. या FD मधील तुमचे पैसे 9.6 वर्षात दुप्पट होतील.
महत्त्वाच्या बातम्या:
New Year 2024 : गुड न्यूज! नववर्षात सरकारची भेट, सुकन्या योजना आणि FD वरील व्याजदरात वाढ
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)