(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Sahara : गुंतवणूकदारांना दिलासा! सहारा रिफंड पोर्टल लाँच, लाखो नागरिकांचे अडकलेले पैसे परत मिळणार
Sahara Investment Refund : सहारा इंडिया रिफंड पोर्टल लाँच करण्यात आलं आहे. पोर्टल सुरू झाल्यामुळे आता गुंतवणूकदारांना त्यांचे जमा पैसे परत मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
Sahara India Refund Portal : सहारा समुहाच्या (Sahara Group) गुंतवणुकदारांसाठी चांगल बातमी आहे. सहारा इंडिया (Sahara India) ग्रुपमधील गुंतवणूदारांना (Sahara Investors) त्यांचे पैसे परत मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांच्या हस्ते सहारा इंडिया रिफंड पोर्टल (Sahara India Refund Portal) लाँच करण्यात आलं आहे. 18 जुलै रोजी मंगळवारी सहारा इंडिया रिफंड पोर्टल लाँच करण्यात आला आहे. या पोर्टलद्वारे गुंतवणूकदारांना त्यांचे पैसे परत मिळण्याची प्रक्रिया पूर्ण करण्यात येईल.
सहारा कंपनीच्या गुंतवणूकदारांना दिलासा
सहारा समुहाच्या गुंतवणुकीमध्ये लाखो भारतीय नागरिकांचे पैसे दिर्घकाळ अडकलेले आहेत. या कंपनीत अनेक लोकांनी सर्व बचत गुंतवली असून ही गुंतवणुकीची रक्कम परत मिळण्याची वाट पाहत होते. सहारा कंपनीच्या विविध योजनांमध्ये ग्राहकांनी पैसे जमा केले होते. सहारा समुहातीचे गुंतवणूकदार या प्रकरणी केंद्र सरकारने हस्तक्षेप करण्याची मागणी करत होते. त्यानंतर आता केंद्र सरकारकडून गुंतवणूकदारांना दिलासा मिळाला आहे. सहारा रिफंड पोर्टल सुरू झाल्यामुळे आता गुंतवणूकदारांना त्यांचे जमा पैसे परत मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. सहारा इंडिया रिफंड पोर्टलद्वारे गुंतवणूकदार त्यांचे पैसे काढू शकतात.
Union Home and Cooperation Minister @AmitShah launches 'CRCS-Sahara Refund Portal' for submission of claims by depositors of four cooperative societies of Sahara Group in New Delhi.@MinOfCooperatn pic.twitter.com/IWKHUXAIY2
— All India Radio News (@airnewsalerts) July 18, 2023
सहारा इंडिया रिफंड पोर्टल लाँच
सहारा इंडिया रिफंड पोर्टलद्वारे सहारामध्ये गुंतवणूक केलेल्या गुंतवणूकदारांना त्यांचे पैसे परत मिळतील. या रिफंड पोर्टलद्वारे, ज्या गुंतवणूकदारांची गुंतवणूक मॅच्युरिटी पूर्ण झाली आहे, त्यांना रक्कम परत केली जाईल. गुंतवणुकीच्या पैशाच्या परताव्याशी संबंधित सर्व माहिती रिफंड पोर्टलवर उपलब्ध करण्यात आली आहे.
सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर कारवाई
सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर रिफंड पोर्टल लाँच करण्यात आलं आहे. सहारा इंडियामध्ये देशभरातील लाखो गुंतवणूकदारांचे करोडो रुपये अडकले आहेत. लोक त्यांच्या गुंतवणुकीची रक्कम परत मिळण्याची वाट पाहत आहेत. सहारा इंडियामधील गुंतवणुकीची मुदत पूर्ण झाल्यानंतरही अनेक लोकांना त्यांचे पैसे परत मिळालेले नव्हते नाहीत. या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर ही कारवाई करण्यात आली आहे.
संबंधित इतर बातम्या :