एक्स्प्लोर

Adani : अदानी समूह टेलिकॉम उद्योगात उतरण्याच्या तयारीत, 5G स्पेक्ट्रमच्या लिलावात घेणार भाग

5G Mobile Services : देशात लवकरच 5G मोबाईल सेवा सुरु होणार असून त्यासाठीचा लिलाव पार पडणार आहे. या लिलावासाठीच्या शर्यतीत अदानी समूहही आहे.

5G Mobile Services : भारतातील दिग्गज व्यावसायिक गौतम अदानी यांचा अदानी समूह (Adani group) टेलिकॉम उद्योगात (Telecom Business) उतरण्याच्या तयारीत आहे. देशात लवकरच 5G मोबाईल सेवा (5G Mobile Service) सुरु होणार आहे. केंद्र सरकारकडून 5G स्पेक्ट्रमच्या लिलावाला मंजुरी देण्यात आली आहे. त्यानुसारल लवकरच हा लिलाव पार पडण्याची शक्यता आहे. आता या शर्यतीत अदानी समूहाने भाग घेण्याचा निर्णय घेतल्याचं समोर आलं आहे. या लिलावासह अदानी समूहाचा टेलिकॉम उद्योगात प्रवेश करण्याच्या विचारात असल्याचं दिसून येत आहे.

केंद्र सरकारकडून 5G स्पेक्ट्रमच्या लिलावाला मंजुरी देण्यात आली आहे. त्यानुसार या महिन्याच्या अखेरीस 5G स्पेक्ट्रमचा लिलाव होण्याची शक्यता आहे. या लिलावासाठी अदानी समूहाने अर्ज केल्याची माहिती समोर येत आहे. यासह अदानी समूह दूरसंचार उद्योगात शिरकाव तयारीत असल्याचं समोर येत आहे. 

अदानी समूहाचा लवकरच टेलिकॉम क्षेत्रात प्रवेश करण्याची शक्यता

अदानी समूहाने 8 जुलै रोजी लिलावात सहभागी होण्यासाठी अर्ज केला आहे. यामुळे अदानी समूहाचा लवकरच टेलिकॉम क्षेत्रात प्रवेश होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आता अदानी समूह इतर टेलिकॉम कंपन्यांसह 5G स्पेक्ट्रम मिळवण्यासाठी प्रयत्न करणार आहे. सुत्रांच्या या लिलावामध्ये जिओ (Jio), भारती एअरटेल (Airtel), विआय (VI) अर्था व्होडाफोन आयडिया (Vodafone Idea) या कंपन्या आधीच शर्यतीत आहेत.

चार कंपन्याकडून लिलावासाठी अर्ज दाखल

5G ​​टेलिकॉम सेवा म्हणजेच अल्ट्रा-हाय-स्पीड इंटरनेट कनेक्टिव्हिटी देण्यास सक्षम असलेल्या एअरवेव्हच्या लिलावासाठी 26 जुलैपर्यंत अर्ज करण्याची मुदत आहे. आतापर्यंत या लिलावासाठी चार कंपन्यानी अर्ज दाखल केले आहेत. Jio, Airtel आणि Vodafone Idea या कंपन्यांनी लिलावासाठी याआधी अर्ज केला होता. यानंतर आता अदान समूह लिलावासाठी अर्झ करणारी चोथी कंपनी ठरली आहे.

5G चा स्पीड 4G पेक्षा 10 पटीने जास्त

5G दूरसंचार सेवा लवकरच सुरू होण्याची अपेक्षा आहे. 5G मोबाइल सेवेचा वेग आणि क्षमता 4G मोबाइल सेवेपेक्षा सुमारे 10 पटीने जास्त असेल. स्पेक्ट्रमचे पेमेंट 20 समान वार्षिक हप्त्यांमध्ये केले जाऊ शकते जे प्रत्येक वर्षाच्या सुरुवातीला आगाऊ भरावे लागेल. यामुळे रोख प्रवाहाची आवश्यकता कमी होईल आणि या क्षेत्रातील व्यवसाय करण्याचा खर्च कमी होईल अशी अपेक्षा आहे. त्याच वेळी, स्पेक्ट्रम घेणार्‍या कंपनीला 10 वर्षांनंतर भविष्यातील कोणत्याही दायित्वाशिवाय स्पेक्ट्रम सरेंडर करण्याचा पर्याय दिला जाईल. 

महत्त्वाच्या इतर बातम्या

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Sanjay Raut : प्लॅनिंग परदेशात, अंमलबजावणी देशात, राहुल गांधींच्या सुरक्षेवरुन संजय राऊतांचा सरकारवर हल्लाबोल
प्लॅनिंग परदेशात, अंमलबजावणी देशात, राहुल गांधींच्या सुरक्षेवरुन संजय राऊतांचा सरकारवर हल्लाबोल
Gold Silver prices: पितृपक्षाच्या सुरुवातीला सोन्याचांदीचा भाव घसरला, मुंबईकरांना किंचित दिलासा, तुमच्या शहरातील भाव काय?
पितृपक्षाच्या सुरुवातीला सोन्याचांदीचा भाव घसरला, मुंबईकरांना किंचित दिलासा, तुमच्या शहरातील भाव काय?
500000 चे 1200000 रुपये करणारी LIC ची भन्नाट स्कीम, फक्त 1000 रुपयांपासून करता येते गुंतवणूक!
500000 चे 1200000 रुपये करणारी LIC ची भन्नाट स्कीम, फक्त 1000 रुपयांपासून करता येते गुंतवणूक!
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! महाराष्ट्रतील फळे व भाजीपाला गोव्यातील विक्री केंद्राला लिंक होणार, बळीराजाला होणार फायदा
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! महाराष्ट्रतील फळे व भाजीपाला गोव्यातील विक्री केंद्राला लिंक होणार, बळीराजाला होणार फायदा
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Lalbaugcha Raja Visarajan 2024 : पुढच्या वर्षी लवकर या.. लालबागच्या राजाला अखेरचा निरोपLalbaugcha Raja Visarjan : राजाची शान भारी, राजाचा थाट भारी! राजाचं विसर्जन, भक्तांचे डोळे पाणावलेLalbaugcha Raja Visarjan :खोल समुद्र..., तब्बल 50 बोटींची सुरक्षा, विसर्जनाचे Exclusive ड्रोन दृश्यंBuldhana Jalgaon Jamod : जळगाव जामोदमध्ये विसर्जन मिरवणुकीत तणाव

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sanjay Raut : प्लॅनिंग परदेशात, अंमलबजावणी देशात, राहुल गांधींच्या सुरक्षेवरुन संजय राऊतांचा सरकारवर हल्लाबोल
प्लॅनिंग परदेशात, अंमलबजावणी देशात, राहुल गांधींच्या सुरक्षेवरुन संजय राऊतांचा सरकारवर हल्लाबोल
Gold Silver prices: पितृपक्षाच्या सुरुवातीला सोन्याचांदीचा भाव घसरला, मुंबईकरांना किंचित दिलासा, तुमच्या शहरातील भाव काय?
पितृपक्षाच्या सुरुवातीला सोन्याचांदीचा भाव घसरला, मुंबईकरांना किंचित दिलासा, तुमच्या शहरातील भाव काय?
500000 चे 1200000 रुपये करणारी LIC ची भन्नाट स्कीम, फक्त 1000 रुपयांपासून करता येते गुंतवणूक!
500000 चे 1200000 रुपये करणारी LIC ची भन्नाट स्कीम, फक्त 1000 रुपयांपासून करता येते गुंतवणूक!
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! महाराष्ट्रतील फळे व भाजीपाला गोव्यातील विक्री केंद्राला लिंक होणार, बळीराजाला होणार फायदा
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! महाराष्ट्रतील फळे व भाजीपाला गोव्यातील विक्री केंद्राला लिंक होणार, बळीराजाला होणार फायदा
आमिर खानसोबत दिला होता ब्लॉकबस्टर चित्रपट, एका चुकीने उद्धवस्त झालं अभिनेत्रीचे करिअर
आमिर खानसोबत दिला होता ब्लॉकबस्टर चित्रपट, एका चुकीने उद्धवस्त झालं अभिनेत्रीचे करिअर
Pune Ganpati Visarjan: 24 तासांनंतरही पुणेकरांचा उत्साह; पुणे पोलीस अॅक्शन मोडवर
24 तासांनंतरही पुणेकरांचा उत्साह; पुणे पोलीस अॅक्शन मोडवर
Nagpur VidhanSabha: अजितदादांनी थांबवलं तरी महिला आमदाराने थोपटले दंड; भाजप आमदाराविरोधात लढण्याचा ठाम निर्धार
अजितदादांनी थांबवलं तरी महिला आमदाराने थोपटले दंड; भाजप आमदाराविरोधात लढण्याचा ठाम निर्धार
Lalbaugcha Raja Visarjan 2024: अरे ही शान कोणाची... लालबागचा राजाची! गिरगाव चौपाटीवर मुंगी शिरायलाही जागा नाही
अरे ही शान कोणाची... लालबागचा राजाची! गिरगाव चौपाटीवर मुंगी शिरायलाही जागा नाही
Embed widget