Aadhaar Free Update: विसरला असाल, तर वेळेत करुन घ्या आधारबाबतचं 'हे' काम; फक्त 6 दिवस बाकी, डेडलाईन संपल्यानंतर....
Aadhaar Updates : आधार कार्ड आता आपल्या ओळखीच्या पुराव्यांतील सर्वात महत्त्वाचा पुरावा बनलं आहे. ट्रेनचा पास काढणं असो वा बँक अकाउंट उघडणं, सगळ्या महत्त्वाच्या कामांसाठी आधार कार्ड आवश्यक आहे.
Aadhaar Free Updates : मुंबई : आधार कार्डचा (Aadhaar Card) समावेश आपल्या सर्वात महत्त्वाच्या ओळखपत्रांमध्ये केला जातो. सप्टेंबर महिन्यात अनेक महत्त्वाची आणि आवश्यक कामं वेळेत पूर्ण करायची आहेत. त्यामुळे लक्षात ठेवून सर्व कामं वेळत पूर्ण करा नाहीतर मुदत उलटून गेल्यानंतर मोठा भुर्दंड पडू शकतो. UIDAI सध्या 10 वर्ष जुने आधार पूर्णपणे मोफत अपडेट करण्याची सुविधा देत आहे आणि हे काम न भरता पूर्ण करण्याची अंतिम मुदत सप्टेंबर 2024 मध्येच संपत आहे (Free Aadhaar Update Deadline). त्यामुळे मोफत आधार कार्ड अपडेट करण्यासाठी आता केवळ 6 दिवस शिल्लक आहेत. जर तुम्ही 6 दिवसांत तुमचं आधार कार्ड अपडेट केलं नाही, तर मात्र तुम्हाला पैसे मोजावे लागणार आहेत.
अंतिम मुदत 14 सप्टेंबर
आधार कार्ड आता आपल्या ओळखीच्या पुराव्यांतील सर्वात महत्त्वाचा पुरावा बनलं आहे. ट्रेनचा पास काढणं असो वा बँक अकाउंट उघडणं, सगळ्या महत्त्वाच्या कामांसाठी आधार कार्ड आवश्यक आहे. पण, एका ठरावीक वेळनंतर आधार कार्ड अपडेट करणं आवश्यक आहे. जर तुमचं आधार कार्ड 10 वर्षांपूर्वीचं असेल, तर तुम्हाला ते अपडेट करणं अनिर्वाय आहे. सध्या UIDAI आधार कार्ड मोफत अपडेट करण्याची सुविधा देत आहे. यापूर्वी UIDAI नं मुदत अनेकदा वाढवल्यामुळे आता पुन्हा एकदा या कामासाठी मुदतवाढ देण्याची शक्यता फारच कमी असल्याचं बोललं जात आहे. 14 सप्टेंबर ही UIDAI नं दिलेली मुदतची अंतिम तारीख आहे. त्यामुळे जर तुम्ही 14 सप्टेंबरनंतर आधार अपडेट करण्यासाठी गेलात, तर मात्र तुम्हाला यासाठी पैसे मोजावे लागतील.
यापूर्वी अनेकदा दिलीय मुदतवाढ
यूनिक आइडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडिया (UIDAI) नं 10 वर्षांहून अधिक जुनं असलेलं आधार कार्ड (Aadhaar Cad) मोफत अपडे करण्याची सुविधा दिली आहे. याची डेडलाईन यापूर्वीच अनेकदा वाढवण्यात आली आहे. यापूर्वी, ही सेवा विनामूल्य वापरण्याची अंतिम तारीख 14 मार्च ते 14 जून 2024 पर्यंत वाढविण्यात आली होती आणि नंतर ती 14 सप्टेंबरपर्यंत तीन महिन्यांसाठी वाढविण्यात आली होती.
मुदत उलटून गेल्यानंतर भरावे लागणार पैसे
आधार कार्ड मोफत अपडेट करण्यासाठी या निश्चित मुदतीनंतर (Aadhaar Update Deadline), एक महत्त्वाचं काम करण्यासाठी तुम्हाला पैसे द्यावे लागतील. यासाठी 50 रुपये शुल्क भरावं लागणार आहे. विशेष बाब म्हणजे, UIDAI द्वारे प्रदान केलेली आधार कार्ड अपडेट करण्याची ही मोफत सेवा फक्त myAadhaar पोर्टलवर उपलब्ध आहे. ऑफलाईन अपडेटसाठी फी अजूनही लागू होते.
आधार झटपट अपडेट करण्यासाठी महत्त्वाच्या स्टेप्स :
UIDAI ची अधिकृत वेबसाईट https://uidai.gov.in/ वर जा.
होमपेजवरील My Aadhaar पोर्टलवर जा आणि आधार क्रमांक-नोंदणीकृत मोबाईल नंबरवर प्राप्त झालेल्या OTP सह लॉग इन करा.
यानंतर, तुमचे तपशील तपासा आणि तपशील योग्य असल्यास, योग्य बॉक्सवर टिक करा.
डेमोग्राफिक माहिती चुकीची आढळल्यास, ड्रॉप-डाउन मेनूमधून ओळख दस्तऐवज निवडा आणि दस्तऐवज अपलोड करा.
लक्षात ठेवा की, हा दस्तऐवज JPEG, PNG आणि PDF स्वरूपात अपलोड केला जाऊ शकतो.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
Rule Change: PPF योजनेत तीन नवे नियम; 1 ऑक्टोबरपासून बदल लागू, 'या' खात्यांवर मिळणार नाही व्याज