एक्स्प्लोर

Aadhaar Update : एकही रुपया न देता आधार अपडेट करा, यूआयडीएआयनं वाढवली मुदत, जाणून घ्या शेवटची तारीख

Aadhaar Update: UIDAI नं आधार कार्डमधील माहिती मोफत अपडेट करण्यासाठी आणखी एक संधी दिली आहे. मोफत आधार कार्ड अपडेटची मुदत वाढवण्यात आली आहे.  

Aadhaar Update नवी दिल्ली : आधार कार्डची नोंदणी करताना अनकेदा काही चुका राहून जातात. अनेकदा काही जणांना स्थलांतर केल्यानं आधार कार्डमधील माहिती बदलावी लागते. आधार कार्ड अनेक ठिकाणी महत्त्वाचे कागदपत्र म्हणून जमा करावे लागेत. आधार कार्डमधील माहिती बदलायची असल्यास किंवा अपडेट करायची असल्यास मोठी संधी आहे. यूआयडीएआयनं आधार कार्ड धारकांना दिलासा देणारा निर्णय घेतला आहे. आधार कार्ड मोफत अपडेट करण्यासाठी मुदत वाढवण्यात आली आहे. मोफत आधार कार्ड अपडेट करण्यासाठी 14 सप्टेंबर पर्यंत मुदत आहे. बायोमेट्रीक नोंदी अपडेट करणे किंवा फोटो बदलण्यासाठी देखील या सुविधेचा लाभ घेता येईल.  

केंद्र सरकारच्या आवाहनानुसार ज्या नागरिकांचं आधार कार्ड 10 वर्षांहून जुनं असेल त्यांना माहिती अपडेट करणं आवश्यक आहे. जर तुमचं आधार कार्ड देखील 10 वर्षांपेक्षा जुनं असेल तर त्यातील नोंदी अपडेट करण्याची गरज आहे. यूआयडीएआयनं वाढवलेल्या मुदतीमध्ये तुम्ही आधार कार्ड अपडेट केल्यास तुम्हाला कोणत्याही प्रकारची फी द्यावी लागणार नाही.  

मुदतवाढ करत असल्याची यूआयडीएआयची घोषणा

यूआयडीएआयनं आधार कार्डमधील माहिती अपडेट करण्यासाठी मुदतवाढ दिल्याची घोषणा ट्वीट करुन दिली आहे. यूआयडीएआयनं याबाबत माहिती दिली आहे. ही मुदत 14 सप्टेंबर 2024 पर्यंत वाढवण्यात आली आहे. आधार कार्ड अपडेट करण्यासाठी ही सुविधा केवळ माय आधार पोर्टलवर उपलब्ध असेल. आधार केंद्रावर जाऊन माहिती अपडेट केल्यास रक्कम द्यावी लागेल.  

आधार कार्ड अपडेट करण्यासाठी काही कागदपत्रांची आवश्यकता असते. तुमच्याकडे ओळखीचा पुरावा आणि पत्त्याचा पुरावा असणं आवश्यक आहे. ओळखीचा पुरावा म्हणून पॅन कार्ड आणि पत्त्याचा पुरावा म्हणून मतदान ओळखपत्र तुम्ही वापरु शकता. आधार कार्ड अपडेट करण्याची मुदत तिसऱ्यांदा वाढवण्यात आलेली आहे. जर तुमचं आधार कार्ड 10 वर्षांपेक्षा जुनं असेल तर तुम्हाला अपडेट करणं आवश्यक आहे.   

आधार कार्ड कसं अपडेट करायचं?

तुम्ही घरबसल्या आधार कार्ड अपडेट करु शकता. 

स्टेप 1 : तुम्ही सर्वप्रथम UIDAI ची अधिकृत वेबसाइट myaadhaar.uidai.gov.in ला भेट द्या.
स्टेप 2 :  यानंतर Update Aadhaar चा पर्याय दिसेल त्यावर क्लिक करा.
स्टेप 3 :  तिथं तुम्ही आधार नंबर नोंदवा आणि त्यानंतर ओटीपी नंबर द्या.
स्टेप 4 : यानंतर तुम्हाला कागदपत्रं अपडेट करुन पडताळणी करावी लागेल.  
स्टेप 5 : यानंतर तुम्ही तुमचं ओळखपत्र आणि पत्त्याचा पुरावा असलेली कागदपत्र स्कॅन करुन अपलोड करा.
स्टेप 6 :  आता तुम्ही Submit वर क्लिक करा आणि त्यानंतर रिक्वेस्ट नंबर जनरेट होईल. त्याद्वारे आधार अपडेटची स्थिती जाणून घेऊ शकता. 

संबंधित बातम्या : 

Old pension Vs New Pension Scheme : जुन्या पेन्शनची मागणी असताना नवी पेन्शन आली, किती पगार कापला जाणार? दोन्हीमध्ये फरक आहे तरी काय?? आपल्याला पडलेल्या 8 प्रश्नांची उत्तरे समजून घ्या!

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

निवडणुकीत जात-धर्म आणला जातो, सिल्लोडची पुढची विधानसभा लढणार नाही; अब्दुल सत्तारांची मोठी घोषणा
निवडणुकीत जात-धर्म आणला जातो, सिल्लोडची पुढची विधानसभा लढणार नाही; अब्दुल सत्तारांची मोठी घोषणा
Makar Sankranti 2025 Wishes : मकर संक्रांतीच्या प्रियजनांना द्या 'या' खास शुभेच्छा; वाढवा सणाचा गोडवा, पाठवा 'हे' हटके शुभेच्छा संदेश
मकर संक्रांतीच्या प्रियजनांना द्या 'या' खास शुभेच्छा; वाढवा सणाचा गोडवा, पाठवा 'हे' हटके शुभेच्छा संदेश
मोठी बातमी ! UGC-NET ची 15 जानेवारीला होणारी परीक्षा रद्द; लवकरच जाहीर होईल नवी तारीख
मोठी बातमी ! UGC-NET ची 15 जानेवारीला होणारी परीक्षा रद्द; लवकरच जाहीर होईल नवी तारीख
सीमा लढ्यातील ज्येष्ठ सत्याग्रही, साहित्यिक व पत्रकार कॉम्रेड कृष्णा मेणसे यांचे निधन
सीमा लढ्यातील ज्येष्ठ सत्याग्रही, साहित्यिक व पत्रकार कॉम्रेड कृष्णा मेणसे यांचे निधन
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 10 PM TOP Headlines 10 PM 13 January 2025Sanjay  Raut Meet Sharad Pawar | मिशन पालिका इलेक्शन! संजय राऊतांनी घेतली शरद पवारांची भेटCity Sixty | सिटी 60 बातम्यांचा वेगवान आढावा एका क्लिकवर सुपरफास्ट ABP MajhaSantosh Deshmukh Case | धनंजय देशमुखांचं 'शोले' स्टाईल आंदोलन, सरकारला अल्टिमेटम Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
निवडणुकीत जात-धर्म आणला जातो, सिल्लोडची पुढची विधानसभा लढणार नाही; अब्दुल सत्तारांची मोठी घोषणा
निवडणुकीत जात-धर्म आणला जातो, सिल्लोडची पुढची विधानसभा लढणार नाही; अब्दुल सत्तारांची मोठी घोषणा
Makar Sankranti 2025 Wishes : मकर संक्रांतीच्या प्रियजनांना द्या 'या' खास शुभेच्छा; वाढवा सणाचा गोडवा, पाठवा 'हे' हटके शुभेच्छा संदेश
मकर संक्रांतीच्या प्रियजनांना द्या 'या' खास शुभेच्छा; वाढवा सणाचा गोडवा, पाठवा 'हे' हटके शुभेच्छा संदेश
मोठी बातमी ! UGC-NET ची 15 जानेवारीला होणारी परीक्षा रद्द; लवकरच जाहीर होईल नवी तारीख
मोठी बातमी ! UGC-NET ची 15 जानेवारीला होणारी परीक्षा रद्द; लवकरच जाहीर होईल नवी तारीख
सीमा लढ्यातील ज्येष्ठ सत्याग्रही, साहित्यिक व पत्रकार कॉम्रेड कृष्णा मेणसे यांचे निधन
सीमा लढ्यातील ज्येष्ठ सत्याग्रही, साहित्यिक व पत्रकार कॉम्रेड कृष्णा मेणसे यांचे निधन
मंत्रालयातील ती काळी लम्बोर्गिनी कोणाची; रोहित पवारांनी नावासह कुंडलीच काढली, 700 कोटी, मुंडेंचाही संदर्भ
मंत्रालयातील ती काळी लम्बोर्गिनी कोणाची; रोहित पवारांनी नावासह कुंडलीच काढली, 700 कोटी, मुंडेंचाही संदर्भ
Education : शालेय शिक्षणामध्ये महाराष्ट्र पुन्हा नंबर 1 होणार; मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला विश्वास
शालेय शिक्षणामध्ये महाराष्ट्र पुन्हा नंबर 1 होणार; मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला विश्वास
नायलॉन मांजाने पतंग उडवाल तर तुमच्यावर येणार संक्रात; विक्रेत्यांसह पालक, मुलांवर थेट 'सदोष मनुष्यवधाच्या प्रयत्नाचा' गुन्हा
नायलॉन मांजाने पतंग उडवाल तर येणार संक्रात; विक्रेत्यांसह पालक, मुलांवर थेट 'सदोष मनुष्यवधाच्या प्रयत्नाचा' गुन्हा
OBC विद्यार्थ्यांसाठी पुण्यासह 5 शहरात उत्कृष्ठता केंद्र स्थापन होणार; मुख्यमंत्र्यांकडून महाज्योतीचा आढावा
OBC विद्यार्थ्यांसाठी पुण्यासह 5 शहरात उत्कृष्ठता केंद्र स्थापन होणार; मुख्यमंत्र्यांकडून महाज्योतीचा आढावा
Embed widget